Thursday, June 4, 2026
मितवा
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
मितवा
No Result
View All Result

चांगुलपणाचे ओझे

alodam37 by alodam37
June 4, 2026
in मितवा
0
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

” वैशाली…जरा लवकर कर ना…दादा वहिनीला भूक लागली असेल अगं…” मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.

 

” हो ताई…मी बस पोळ्या करते आता…मग लगेच जेवण वाढते…” वैशाली कामाचा वेग वाढवत म्हणाली.

 

तिने लगेच पोळ्या केल्या आणि पाहुण्यांना जेवायला बोलावले. मीनाच्या वहिनीला तिच्या हातची पुरणपोळी आवडते म्हणून आज तिने पुरणपोळ्या बनवल्या होत्या. सोबत आमटी, खीर, भाजी, मसालेभात आणि कोशिंबीर केले होते. आज तिच्या मोठ्या जावेचा भाऊ आणि वहिनी घरी आले होते. मीना सकाळपासून त्यांच्यासोबत हॉल मध्ये बसून होती. नंतर वहिनीला घेऊन थोडावेळ रूम मध्ये गप्पा करायला घेऊन गेली.

 

इकडे वैशाली एकटीच काम करत होती. पाहुण्यांजवळ बसायला म्हणून मीना ने आज स्वयंपाकघराकडे पाठ फिरवली होती. फक्त वैशालीला सूचना द्यायला किचन मध्ये जात होती. वैशालीने मात्र आनंदाने मीनाच्या दादा वहिनीचे आदरातिथ्य केले होते. आल्यावर चहा नाश्ता आणि आता स्वयंपाक. सगळं काही अगदी हसतमुखाने केले होते वैशालीने. मीनाच्या दादा आणि वहिनीला जेवण खूप आवडले होते. जेवल्यानंतर थोडा वेळ थांबून मीनाची दादा आणि वहिनी निघून गेले.

 

त्यानंतर संध्याकाळी वैशालीच्या नवऱ्याने गिरीशने तिला फोन करून सांगितले की त्याने त्या दोघांसाठी एक नवीन चित्रपटाच्या दोन तिकीट काढल्या आहेत. ती छान तयारी करून त्याची वाट बघत होती. तेवढ्यात मीना तिथे आली आणि तिला म्हणाली.

 

” तू कुठे जात आहेस का…एवढी तयार झाली आहेस..?”

 

” हो ताई…ह्यांच्यासोबत पिक्चर बघायला जात आहे…” वैशाली उत्साहाने म्हणाली.

 

” आज मला जरा बरं वाटत नाही आहे ग…दिवसभर पाहुणे होते त्यामुळे थकायला झालंय अगदी…माझ्याच्याने काही रात्रीचा स्वयंपाक केल्या जाणार नाही…आनंदीला सुद्धा सांभाळावं लागेल…तू आजचा प्लॅन कॅन्सल कर ना…नंतर जा कधीतरी…” मीना म्हणाली.

 

हे ऐकून वैशाली हिरमुसली. पण मीनाताईला बरं नसताना आपण असं पिक्चर ला जाणे बरे दिसत नाही म्हणून ती म्हणाली.

 

” ठीक आहे ताई…मी जाईल नंतर कधीतरी…मी करते स्वयंपाक…तुम्ही काळजी करू नका…”

 

त्यानंतर तिने गिरीशला सांगितले की आजचा पिक्चर चा प्लान कॅन्सल करावा लागेल. यावर त्यानेही जरा चिडचिड केली पण वैशालीने त्याला प्रेमाने समजावून सांगितल्यावर तो जरा शांत झाला.

 

वैशाली सहा महिन्यांपूर्वी या घरात सून बनून आली होती. मीना ही तिची मोठी जाऊ. वैशालीने मीनाला अगदी मोठ्या बहिणीसारखे मानले होते. ती प्रत्येक बाबतीत मीनाचा सल्ला घ्यायची. तिचा आदर करायची. तिने एखादे काम सांगितले तर मनापासून करायची.

 

वैशाली घरात आल्यापासून मीनाला खूप आराम मिळाला होता. वैशाली स्वतःहून घरातली जास्तीत जास्त कामे उरकून घ्यायची. आनंदीची शाळेची तयारी करून तिला स्कूलबस पर्यंत सोडायला सुद्धा जायची. आनंदीची जबाबदारी तिने आनंदाने स्वीकारली होती. त्यामुळे मीना आता सकाळी आरामात उशीरा उठायची. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.

 

 दोघी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहत आहेत हे पाहून तिच्या सासूने सुद्धा घराची जबाबदारी दोघींवर सोपवून संसारातून लक्ष काढून घेतले होते.  सगळं काही वरवर सुरळीत दिसत होतं. पण एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्याने बरंच काही बदललं.

 

वैशालीची मोठी बहीण तिला भेटायला आली होती. बहिणीला पाहून वैशालीला खूप आनंद झाला. एकमेकींची विचारपूस आणि थोड्या गप्पा झाल्यावर वैशालीच्या लक्षात आले की ताईला अजून तिने चहा नाश्ता दिला नाही. ती लगेच हॉल मधून स्वयंपाकघरात आली. गॅसवर चहा ठेवला आणि मीनाच्या रूम मध्ये जाऊन मीनाला म्हणाली.

 

” ताई…माझी मोठी बहीण आली आहे…मी तिच्यासाठी चहा नाश्ता करून आणते…तोवर तुम्ही हॉलमध्ये त्यांच्याजवळ जाऊन बसता का…सासूबाई सुद्धा आज शेजारच्या काकूंसोबत दवाखान्यात गेल्या आहेत…नाहीतर त्यांना सांगितले असते..?”

 

” अगं तुझी बहीण माझ्या फार ओळखीची नाही ग…मी काय बोलणार आहे तिच्याशी…त्यापेक्षा तूच जाऊन बस ना तिच्याजवळ…” मीना जांभई देत म्हणाली.

 

मीनाताई असे काही बोलेन ह्याची अपेक्षा नसलेल्या वैशालीला हे ऐकून जरा विचित्र वाटले. तरीपण ती म्हणाली.

 

” ठीक आहे ताई…मी जाऊन बसते…तुम्ही जरा चहा नाश्त्याच बघा किचन मध्ये जाऊन…”

 

” ही वेळ माझ्या झोपण्याची आहे…मला कंटाळा आलाय आता किचन मध्ये जायचा…तू बघून घे ना चहा नाश्त्याच… नाहीतर तुझ्या बहिणीलाच घेऊन जा ना किचन मध्ये…गप्पा पण होतील आणि चहा नाश्ता पण होईल…तुझी बहीण उलट मदतच करेल तुला कामात…” मीना बेफिकीरपणे म्हणाली.

 

वैशालीला हे ऐकून धक्काच बसला. एरव्ही गोड बोलणारी मीनाताई अशी कशी वागू शकते ह्याचे तिला नवल वाटले. त्यांच्या पाहुण्यांना हिने कधीच परके मानले नव्हते. त्यांचे आदरातिथ्य करायला ही एका पायावर उभी असायची. आणि आज आपल्या बहिणीला किचन मध्ये बसवायची भाषा करत आहेत. आपण ज्यांना मोठी बहीण मानलं त्या अशा बोलू शकतात ह्यावर अजूनही वैशालीचा विश्वास बसत नव्हता. ती काहीही न बोलता तिथून जायला निघाली. तेव्हा मीना तिला म्हणाली.

 

” जाताना दार लावून घे जरा…आणि आवाज जरा कमी करा…माझी झोप मोडेल…”

 

वैशाली काहीही न बोलता तिथून निघून स्वयंपाकघरात आली. मीनाचे शब्द आठवून तिचे डोळे भरून आले होते. पण स्वतःला सावरून तिने लवकरच चहा नाश्ता बनवला आणि तिच्या बहिणीसोबत हॉल मध्ये जाऊन बसली. दोघींनी बराच वेळ गोष्टी केल्या. तिची बहीण जायची वेळ झाली तोवर सासूबाई सुद्धा आल्या होत्या. त्यांची पण भेट घेऊन वैशालीची बहीण निघून गेली. पण मीना रूम मधून बाहेर आली नाही. वैशालीला वाईट वाटले.

 

त्यानंतर थोड्या वेळाने मीना अगदी काहीच न झाल्याच्या अविर्भावात रूमच्या बाहेर आली आणि वैशालीला म्हणाली.

 

” वैशाली…तुझ्या हातचा एक गरम चहा घेऊन ये…डोकं जड वाटत आहे जरा…”

वैशालीला दुपारच्या त्यांच्या वागण्याचे वाईट वाटले होते पण तिने बोलून दाखवले नाही. ती काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. त्यानंतर बरेच दिवस ती मीनाशी मनमोकळेपणाने बोलत नव्हती. पण आपल्याच विश्वात राहणाऱ्या मीनाच्या ते लक्षातसुद्धा आले नव्हते.

वैशालीचा राग मात्र काही दिवसांनी निवळला. जास्त दिवस कुणावरतरी नाराज राहणे तिला जमतच नव्हते. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायची सवय असल्याने ती फार वेळ मनात राग धरून ठेवू शकत नव्हती. त्यामुळे पुन्हा दोघी आधीसारख्याच बोलायला लागल्या.

काही दिवसांनी मीनाच्या माहेरी तिच्या भाच्याचा वाढदिवस असल्याने वहिनीने मीनाला वाढदिवसाला निमंत्रण देण्यासाठी फोन केला.

” मीना ताई…तुमच्या लाडक्या भाच्याचा वाढदिवस आहे…त्यामुळे तुम्ही वेळेच्या आधीच या बरं…आणि तुमच्या ओळखीत असेल तर एखादी कामासाठी बाई सुद्धा सुचवा मला त्या एका दिवसा साठी…”

” कामासाठी बाई…” मीना बोलतच होती की तिच्या नजरेत स्वयंपाकघरात काम करणारी वैशाली पडली.

” तू काळजी नको करुस वहिनी…मी सोबतच घेऊन येईल कामवाल्या बाईला…” मीना मिश्किल हसत म्हणाली.

क्रमशः

Previous Post

हरवलेलं प्रेम – भाग ५

Next Post

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

alodam37

alodam37

नमस्कार, मला लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. मी लिहिलेल्या कथा ह्या माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारित असतात. लिखाणातून मला निखळ आनंद मिळतो. तुम्हाला ही माझ्या कथा आवडतील अशी अपेक्षा आहे. 😊

Next Post
चांगुलपणाचे ओझे

चांगुलपणाचे ओझे - भाग २ (अंतिम भाग)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

चांगुलपणाचे ओझे

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

by alodam37
June 4, 2026
0

फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली.   " माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली...आणि वहिनी खूप जास्त आग्रह...

चांगुलपणाचे ओझे

by alodam37
June 4, 2026
0

" वैशाली...जरा लवकर कर ना...दादा वहिनीला भूक लागली असेल अगं..." मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.   " हो ताई...मी बस...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ५

by alodam37
May 22, 2026
0

      लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.   हा...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ४

by alodam37
May 22, 2026
0

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   "तू… काय म्हणालास?"   मिलिंद शांतपणे म्हणाला,   "मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल…...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम – भाग ३

by alodam37
May 22, 2026
0

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम – भाग २

by alodam37
May 22, 2026
0

    तो घरी आला आणि तडक आपल्या रूम मध्ये गेला. मनिषा सुद्धा रात्रभर झोपली नव्हती. आता काय होईल ह्याची...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम

by alodam37
May 22, 2026
0

लग्नमंडपात गजबज होती. सगळीकडे फुलांची सजावट, रोषणाई आणि गाण्यांचा आवाज. पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते. मुलं इकडेतिकडे पळत होती. वातावरणात...

Load More
  • Home
  • About us
  • contact us
  • Disclaimer
  • Privacy Policy

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

error: Content is protected !!