आईपणाचा प्रवास

रश्मी आज खूप खुश होती. बऱ्याच दिवसानंतर ती आज बाहेर गेली होती. तिचा नवरा सुबोध नाही म्हणाला पण तिने हट्ट केला. मागच्या चार महिन्यांपासून ती घराच्या बाहेर पडलेली नव्हती. काल मात्र सुबोध च्या मित्राच्या घरी एक लहानसा समारंभ होता. इथे तिच्या बऱ्याच मैत्रिणी झाल्या होत्या. त्यासुद्धा समारंभाला येणार होत्या. रश्मीला तिथे जाण्याचा मोह आवरला नाही. … Read more

अरे संसार संसार

  अनुच्या लग्नाला १५ दिवस झाले होते. घरी तसे सर्वजण चांगले होते. एव्हाना सर्व पाहुणे निघून गेले होते. घरच्यांनी अनु आणि आशिष ला बाहेर फिरायला पाठवायचे ठरवले. आशिष ने कामाचे निमित्त्य सांगून बाहेर फिरायला जाणे टाळले. अनु ला वाटले की  कामाचा ताण असेल.     पण हळूहळू तिला जाणवायला लागले की आशिष तिला सतत टाळण्याचा प्रयत्न … Read more

माहेरची आठवण

        दुपारी सर्व कामे आटोपून दीपा तिच्या रूम मध्ये आराम करायला जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली. दीपाने दरवाजा उघडला तर समोर तिची शेजारीण सुधा होती.      ” मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. म्हणून मी माहेरी जातेय. एका महिन्यानंतर परत येईल. तोपर्यंत घराकडे जरा लक्ष ठेवशील.” सुधा म्हणाली.      ” हो.” दीपाने होकारार्थी मान डोलावली.         एवढे … Read more

बाळाचे वजन

गेल्या काही दिवसांपासून मी खूप टेन्शन मध्ये होते. माझ्या मुलाचं म्हणजेच अर्णवच वजन बरंच कमी झालं होत…आठ महिन्यांचा होईपर्यंत त्याच वजन व्यवस्थित वाढत होते…पण मध्येच त्याला कफ चा त्रास झाला आणि त्याच वजन कमी झालं. मी त्याला घेऊन कुठेही बाहेर गेले की फक्त एकच वाक्य कानावर पडायचं…” काय ग! खूपच बारीक झालाय अर्णव. माझ्या शेजारी … Read more

अग्गबाई सासूबाई – भाग २

प्रतापने तिचे काहीही ऐकुन न घेता तिला गुन्हेगार ठरवले होते. तिने इतके दिवस सासूबाईंना आपली आई म्हणून त्यांच्या प्रत्येक टोमण्याकडे दुर्लक्ष केले होते. तिने त्यांची मुलगी बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण त्या मात्र तिची आई होऊ शकल्या नाहीत. आणि आज प्रताप ने तिचं मन दुखावलं होतं. सासूचे सततचे टोमणे, तिच्या माहेरच्या परिस्थिती बद्दल सतत … Read more

पूर्वग्रह

आज निशा च्या घरी पाहुणे येणार होते. तिची दूरची आत्या आणि मामा. निशाच्या आईने सगळी आवराआवर करून ठेवली होती. निशा आणि तिच्या लहान बहिणीने समिक्षाने तिच्या आईला स्वयंपाकात मदत केली होती. सर्वकाही तयार होते. इतक्यात निशाचे बाबा पाहुण्यांना घेऊन घरी आले. पाहुण्यांना चहापाणी दिले आणि थोड्या वेळात लगेच जेवण झाले. जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉल मध्ये … Read more

ती भयाण वाट

परवा रियाच्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होता. रियाचे आईवडील आज तिच्या मामाच्या गावी जाण्यासाठी निघणार होते. रियाच्या मामाचे गाव पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर होते. उद्या रियाचा पेपर असल्यामुळे रिया जाऊ शकणार नव्हती. रिया तिच्या आजी आजोबा सोबत घरीच थांबणार होती.         तिचे आईबाबा दुपारी गावाला निघून गेले. तिचे आईबाबा गेल्यावर तिला घरी अजिबात करमत नव्हते. तो … Read more