google-site-verification: googlea4a4b36c9de51f26.html
Saturday, June 20, 2026
मितवा
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
मितवा
No Result
View All Result

फिरून नवी जन्मेन मी – भाग १

alodam37 by alodam37
May 30, 2026
in कथा, वैचारिक
0
0
SHARES
12.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अंकिता विचार करत होती इतक्यात तिच्या गाडीचा एका बाईक ला धक्का लागला आणि ती भानावर आली. तिने लगेच तिची गाडी रस्त्याच्या एका कडेला उभी केली आणि त्या बाईक स्वाराला काही लागले तर नाही ना ह्याची चौकशी करायला पुढे सरसावली.

” खूप खूप सॉरी…तुम्हाला लागलं तर नाही ना…मला कळलंच नाही कसा तुम्हाला धक्का लागला ते…मी माझ्याच विचारात गाडी चालवत होते…माझ्यामुळे तुम्हाला लागलं…खरंच खूप सॉरी…मला माफ करा प्लिज…” ती म्हणाली.

इतक्यात त्या बाईक वरच्या तरुणाने त्याचे हेल्मेट काढले.  उंच पुरा, सुंदर बोलके डोळे, कुरळे केस, गोरा वर्ण असलेला तो तरुण दिसायला देखणा होता. एक तरुणी हात जोडून दोन तीनदा त्याची माफी मागते हे पाहून तो म्हणाला.

” मला माहिती आहे तुम्ही जाणूनबुजून नाही केले ते…आणि मला काही लागलं सुद्धा नाही…तुम्ही खरंच माझी इतकी माफी मागू नका…तुमची फारशी चूक सुद्धा नाही…” तो म्हणाला.

” पण खरंच सॉरी…मी लक्ष द्यायला हवे होते…” ती म्हणाली.

” जाऊद्या हो…होते कधी कधी…फार टेंशन नका घेऊ…येतो मी..ऑफिसला जायला उशीर व्हायला नको…” तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट देखील न पाहता त्याच्या बाईक वर बसून निघून सुद्धा गेला.

अंकिताला सुद्धा हायसे वाटले. त्याला जर काही लागलं असतं तर उगीच प्रॉब्लेम झाला असता. बरं झालं काही जात नाही झालं. तसं ही गाडी चालवताना तिने जरा सावध राहायला हवे हे तिने आज मनाशी ठरवले होते. तिने मग तिची स्कूटी सुरू केली आणि ती सुद्धा तिच्या ऑफिसला निघून गेली.

तसा तिला ऑफिस मध्ये यायला जरा उशीरच झाला होता. आणि नेमके आजच नवीन साहेब येणार होते. ती पटकन जाऊन आपल्या टेबल वर बसली. इतक्यात समोरून तिचं मघाशी स्कूटी ला धडकलेला मुलगा समोर आला.

त्याला पाहून तिच्या मनाने वेगळेच तर्क लावायला सुरुवात केली. इतक्यात तिची ऑफिसमधली मैत्रीण रेणू आली आणि तिच्या कानात म्हणाली…

” अंकिता…हे आपले नविन साहेब आहेत… बदली होऊन आजच रुजू झालेत इथे…”

हे आपले नवीन साहेब आहेत हे माहिती पडताच ती खुर्चीवरून उठली आणि म्हणाली..

” गूड मॉर्निंग सर…मी अंकिता वाघमारे…आपल्या ऑफिसमध्ये सिनियर लिपिक आहे…”

” हॅलो… मिस अंकिता…मी आदित्य देशमुख…” तो म्हणाला.

दोघांनीही एकमेकांना औपचारिक ओळख करून दिली आणि तो त्याच्या केबिन मध्ये निघून गेला.

अंकिता मात्र अजूनही तिच्या भावाच्याच विचारात होती. तिचा लहान भाऊ सचिन दहा वर्षांचा आणि मधली बहीण स्वाती तेरा वर्षांची होती तेव्हाच त्यांचे बाबा वारले होते. तेव्हा अंकिता सोळा वर्षांची होती. तिने तेव्हापासून आपल्या आईला कामात मदत करायला सुरुवात केली होती. आई मशीनवर कपडे शिवायची आणि अंकिता शाळेतून आल्यावर आईला घरकामात मदत करायची. अंकिताचे घर बरेच मोठे असल्याने त्यांनी त्यांचा वरचा मजला भाड्याने राहायला दिला होता. त्यातूनही काही उत्पन्न मिळायचे.

त्यानंतर तिने खूप मेहनतीने दहावीत चांगले मार्क्स मिळवले. त्यानंतर आईच्या मदतीने बारावीला चांगला अभ्यास केला आणि कॉलेजमधून पहिली आली.त्यानंतर पुढे चांगले शिकायचे खूप मनात होते पण लहान बहीण भावाला चांगले शिक्षण घेता यावे म्हणून तिने एक छोटी नोकरी शोधली. आणि मुक्त विद्यापीठात पदवीला एडमिशन घेतली. आणि सोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. आणि लवकरच तिच्या मेहनतीचे चीज झाले.

तिला चांगली नोकरी मिळाली. आणि घरी सर्वांना आनंद झाला.  तर घरच्यांसाठी काय करू आणि काय नको असे झाले होते. पण ह्या सुखावर विरजण झाल्यासारखे अचानकपणे तिची आई हलक्याशा आजारातच हे जग सोडून निघून गेली. आणि पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्या अंकितावर येऊन पडली.

तिने दोघा बहीण भावांसाठी खूप काही केले. त्यांना चांगल्यात चांगले शिक्षण दिले. पण त्या दोघांचे शिक्षणात हवी तशी प्रगती नव्हती. स्वाती काही दिवसातच तिच्या कॉलेज मधल्या एका सिनियर मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाला ना धड नोकरी होती ना नोकरी मिळेल अशी अपेक्षा. कॉलेजमध्ये तो फक्त उनाडक्या करण्यासाठी यायचा. अंकिता ने तिला खूप समजावून सांगितले पण ती मात्र हट्टाला पेटली होती. शेवटी नाईलाजाने साध्या पद्धतीने तिचे त्या मुलाशी लग्न लावून द्यावे लागले. आणि  अंकिताच्या आधी तिच्या लहान बहिणीचे लग्न झाल्याने अंकिताला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले.

नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या बद्दल फार उलटसुलट प्रतिक्रिया दिली. आईबाबा नसलेली मुलं आहेत. यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. आणि लक्ष ठेवायला कुणी नाही म्हणून ह्या मनात येईल तसेच वागतात वगैरे वगैरे. पण लहान भावाकडे पाहून अंकिता या सर्वातून सावरली.

तिने त्याला चांगले शिक्षण देण्याचे ठरवले. पण त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. तो ही कॉलेज मधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला. आणि त्याने अंकिताला त्या मुलीशी लग्न करायचे आहे असे सांगितले. अंकिताने त्याला समजावून सांगितले की आधी शिक्षण पूर्ण कर. नोकरी मिळव आणि मग लग्न कर. पण तो सुद्धा काही ऐकायला तयार नव्हता.

शेवटी अंकिताला न सांगता त्याने सुद्धा मंदिरात जाऊन तिच्याशी परस्पर लग्न केले. आणि त्याच्या बायकोला सुजाताला घेऊन घरी आला. त्याने परस्पर लग्न केल्याने अंकिताचा सुद्धा नाईलाज झाला. आपल्या लवकर लग्न करण्याच्या निर्णयाला अंकिताने विरोध केला होता म्हणून आपल्याला मंदिरात जाऊन लग्न करावे लागले ह्याचा राग सचिनच्या बायकोच्या मनात होता. म्हणून तिने पहिल्या दिवसापासूनच अंकिताचा राग करायला सुरुवात केली.

क्रमशः

फिरून नवी जन्मेन मी – भाग २

 

Tags: laghukathamarathi kathaनणंद भावजयमराठी कथा
Previous Post

तिच्या साधेपणातील सौंदर्य – भाग २ (अंतिम भाग)

Next Post

फिरून नवी जन्मेन मी – भाग २

alodam37

alodam37

नमस्कार, मला लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. मी लिहिलेल्या कथा ह्या माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारित असतात. लिखाणातून मला निखळ आनंद मिळतो. तुम्हाला ही माझ्या कथा आवडतील अशी अपेक्षा आहे. 😊

Next Post

फिरून नवी जन्मेन मी - भाग २

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

बापमाणूस

बापमाणूस

by alodam37
June 19, 2026
0

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच...

एक अनोखे धोंडेजेवण

एक अनोखे धोंडेजेवण

by alodam37
June 12, 2026
0

  सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका...

चांगुलपणाचे ओझे

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

by alodam37
June 4, 2026
0

फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली.   " माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली...आणि वहिनी खूप जास्त आग्रह...

चांगुलपणाचे ओझे

by alodam37
June 4, 2026
0

" वैशाली...जरा लवकर कर ना...दादा वहिनीला भूक लागली असेल अगं..." मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.   " हो ताई...मी बस...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ५

by alodam37
May 22, 2026
0

      लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.   हा...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ४

by alodam37
May 22, 2026
0

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   "तू… काय म्हणालास?"   मिलिंद शांतपणे म्हणाला,   "मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल…...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम – भाग ३

by alodam37
June 14, 2026
0

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो...

Load More
  • Home
  • About us
  • contact us
  • Disclaimer
  • Privacy Policy

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

error: Content is protected !!