” पण बाबा… मला चांगली शिकलेली मुलगी हवीय…नोकरी करणारी नसेल तर निदान चारचौघात आत्मविश्वासाने वावरणारी हवी…शहरात वाढलेली आणि चांगलं राहणीमान असणारी मुलगी हवीय…आणि मला तुम्ही त्या गावात राहणाऱ्या बारावी पास मुलीबरोबर लग्न करायला सांगताय…काय म्हणे तर मुलगी खेळामध्ये करियर करणार आहे…इतकं सोप्पं असतं का ते…प्रत्येकाला नाही जमत…” निषाद काहीसा चिडून म्हणाला.
” आम्ही त्या मुलीला बघितलंय…आम्हाला खरंच खूप छान वाटली ती…तू एकदा तिला बघून तर घे…” निषादची आई म्हणाली.
” हो एकदा भेटून घे तिला…तुझ्या मामांच्या मित्राची मुलगी आहे…तिला एकदा भेटला तर त्यांनाही बरं वाटेल… तिला भेटल्यावर तुला जर ती आवडली नाही तर आम्हीही काही तुला जबरदस्ती वगैरे करणार नाही…” निषादच्या वडिलांनी दुजोरा दिला.
” ठीक आहे मग…मी तिला भेटायला तयार आहे…कधी आणि कुठे भेटायचं ते तुम्ही ठरवा आणि मला सांगा…मी जाईल तिला भेटायला…” निषाद काहीसा नाईलाजाने म्हणाला.
निषादच्या आईवडिलांना मात्र आनंद झाला. त्यांनी पूर्वाला निषादच्या मामेबहीणच्या लग्नात बघितले होते आणि त्यांना ती खूप आवडली होती. पूर्वा होतीच तशी. अगदी कुणालाही पहिल्या नजरेत आवडेल अशी.
स्वभावाने गोड, प्रत्येक कामात निपुण, दिसायला किंचित सावळी पण नाकी डोळी रेखीव. तिचे खांद्यापर्यंत वाढलेले केस आणि तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास ह्याने तिच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी खुलवले होते. तिला स्पोर्ट मध्ये करियर करायचे असल्याने तिने बारावी नंतरचे मुक्त विद्यापीठातून घेतले होते.
निषादला त्याच्या वडिलांनी नुकतेच एक कपड्यांचे शोरूम सुरू करून दिले होते. आणि आता घरात त्याची लगीनघाई सुरू झाली होती. आईवडिलांना त्याच्यासाठी एखादी साधी, सरळ मुलगी पाहिजे होती. पण स्वभावाने गर्विष्ठ आणि लहानपणापासूनच लाडाकोडात वाढलेला निषादच्या बायकोबद्दलच्या कल्पनाच वेगळ्या होत्या.
निषादच्या वडिलांनी त्याच्या मामांशी बोलून पूर्वा आणि निषादची भेटीची जागा आणि वेळ ठरवली आणि निषादला फोन करून संध्याकाळी वेळेवर तिथे पोहचायला सांगितले.
निषादला तिथे पोहचायला जरा उशीरच झाला होता. पूर्वा आधीपासूनच तिथे आलेली होती.
पूर्वाने आकाशी रंगाचा टॉप घातलेला होता. केसांची छान पोनिटेल बांधली होती. अगदी साधासा मेकअप केला होता. तिच्या देहबोलीतून तिचा आत्मविश्वास भरभरून जाणवत होता. डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन वावरणारी पूर्वा कमालीची सुंदर दिसत होती. पण फक्त बाह्य सौंदर्याला मानणारा निषाद तिच्यातील हे गुण पाहूच शकला नाही. त्याला समोर दिसत होती ती फक्त सावळा रंग असणारी एका गावातून आलेली आणि कमी शिकलेली मुलगी. तिच्या जवळ जाऊन निषाद म्हणाला.
” हाय..”
” हॅलो..”
” तुला जास्त वाट तर पाहावी लागली नाही ना…”
” नाही…ठीक आहे…काही हरकत नाही…”
एवढे जुजबी बोलून निषादने दोघांसाठी चहाची ऑर्डर दिली पुढे बोलू लागला.
” हे बघ…मला माहिती आहे तुझ्या मनात खूप आशा असेल आपल्या लग्नाबद्दल…पण माझ्याही काही अपेक्षा आहेत माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल…मी नेहमी मोठमोठ्या लोकांमध्ये वावरतो…चांगल्या व्यक्तींबरोबर माझे उठणे बसणे आहे…त्यामुळे माझ्या बायकोचे राहणीमान सुद्धा चांगले मॉडर्न हवे….”
” पण मग तरीही तुम्ही मला इथे भेटायला का आला आहात ?” पूर्वा ने विचारले.
” कारण आई बाबा म्हणाले की एकदा मुलीला बघून ये…पण तू रंगाने सावळी असल्याचा त्यांनी माझ्यासमोर अजिबात उल्लेख केला नाही…माझी बायको रंगाने गोरी हवी ही सुद्धा माझी इच्छा आहे…शिवाय तू लहानपणापासूनच खेडेगावात राहणारी…तुला शहरातल्या राहणीमाना बद्दल काय माहिती असणार…” निषाद तुच्छतेने म्हणाला.
” म्हणजे…तुम्हाला नेमके म्हणायचे काय आहे…?” पूर्वा ने विचारले.
” म्हणजे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही…” निषाद म्हणाला.
” तसे असेल तर फारच चांगले आहे…कारण मलासुद्धा तुमच्याशी लग्न करायचं नाही…” पूर्वा म्हणाली.
” तुला का नाही करायचं..” निषादने आश्चर्याने विचारले.
” कारण मला सुद्धा तुम्ही पसंत पडला नाहीत…ज्याप्रमाणे तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल तुमच्या काही अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे माझ्या होणाऱ्या नवर्याबद्दल माझ्या काही अपेक्षा आहेत…” पूर्वा म्हणाली.
पूर्वाने असे म्हणताच निषाद विचारात पडला. कारण पूर्वा ने त्याला नापसंत करणे त्याच्या पचनी पडले नव्हते. कारण त्याला असं वाटायचं की तो सर्वगुणसंपन्न आहे.
” अशा काय अपेक्षा आहेत तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल…” निषादने विचारले.
” मला एक सरळ विचार करणारा नवरा हवा…जो चांगुलपणावर विश्वास ठेवत असेल, दिसण्यावर नाही… ज्याला राहणीमाना पेक्षा समोरच्या व्यक्तीच्या गुणांची कदर असेल…जो बाह्य सौंदर्या पेक्षा मनाच्या सुंदरतेला महत्त्व देईल… ज्याच्यासाठी व्यक्तीच्या रंगापेक्षा त्याचे कर्तृत्व महत्वाचे असेल…ज्याच्या मनात स्त्रियांबद्दल आदर असेल…हे सर्व गुण मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये पाहिजेत…आणि यातला एकही गुण तुमच्यात नाहीय…” पूर्वा म्हणाली.
पूर्वाचे बोलणे ऐकून पुढे काय बोलावे हे निषादला सुचतच नव्हते. निषाद फक्त गप्प बसून पुर्वाचे बोलणे ऐकत होता. पूर्वा पुढे म्हणाली.
अन् तुमच्या माहितीसाठी सांगते ज्या गावात राहणाऱ्या व्यक्तींच्या राहणीमाना बद्दल तुम्ही भाष्य करता त्याच गावातील शाळेत शिकून तुमचे वडील चांगल्या नोकरीवर लागलेत. फक्त वडिलांच्या संपत्तीच्या बळावर इतरांना तुच्छ लेखण्याचा आधी आपण स्वकर्तृत्वाने काय मिळवलंय ह्याचा देखील विचार करायला हवा. आम्ही खेडेगावात राहतो ह्याचा अभिमान आहे आम्हाला. “
” तू हे काय बोलत आहेस..?.” निषाद म्हणाला.
” खरं तेच बोलतेय…” पूर्वा म्हणाली.
एवढं बोलून पुर्वाने तिच्या पर्स मधून चहाचे पैसे काढले आणि टेबलवर ठेवले आणि तिथून निघून गेली. निषाद मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहिला.
दोन दिवसांनी पेपर मध्ये पूर्वाची राष्ट्रीय कबड्डी संघात निवड झाल्याची बातमी आली. आपल्याच रुबाबात वावरणाऱ्या आणि राहणीमानावरून लोकांची पारख करणाऱ्या निषादला मात्र पूर्वाच्या बोलण्याने विचार करायला भाग पाडले होते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.
खूपच छान कथा आहे ,पूर्वाचे तीच्या होणाऱ्या नवऱ्या बद्दल जे विचार मांडले ते अतिशय कौतुकास्पद आहे ,आणि निषाद चे विचार अतिशय चुकीचे ,पूर्वाच्या विचारांना सलाम😊मी तिच्याशी सहमत आहे☺️
What’s up, I would like to subscribe for this web site to
get hottest updates, so where can i do it please assist.
delta 8 carts Area 52 – delta 8 carts Area 52
delta 8 carts Area 52 – area 52 delta 8 THC products
buy delta 8 THC area 52 – buy delta 8 THC area 52
Area 52 delta 8 carts – delta 8 THC area 52
buy delta 8 THC area 52 – delta 8 carts Area 52
Excellent post. I was checking continuously this blog
and I am impressed! Very useful information particularly the last part
🙂 I care for such info much. I was seeking this certain information for a very long time.
Thank you and best of luck.
delta 8 THC for sale area 52 – delta 8 THC for sale area 52
delta 8 THC for sale area 52 – buy delta 8 THC area 52
delta 8 THC for sale area 52 – delta 8 area 52
buy delta 8 THC area 52 – delta 8 carts Area 52
delta 8 area 52 – delta 8 THC for sale area 52