एकाच ह्या जन्मी जणू – भाग ६

” तुम्ही…तुम्ही इथे कशाला आलात…?” प्रीतीने विचारले. ” तुला आणि आपल्या मुलाला सोबत घेऊन जायला…” पंकज म्हणाला. ” तुम्हाला काय वाटतं…तुम्ही काहीही बोलाल आणि की तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या बरोबर येईल…?” प्रीतीने विचारले. ” मला माहिती आहे…मी तुझ्याशी ज्याप्रकारे वागलो ते पाहता ती माझ्याशी असेच वागणे अपेक्षित आहे…पण मला खरंच माझ्या चुकांची जाणीव झाली आहे…तू … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ५

” हो आई…मला कळत आहे मी काय बोलत आहे ते…आता मी त्यांच्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही…” पंकज म्हणाला. ” तिच्या भावांनी तुझ्या आईचा अपमान केला होता हे विसरलास का…?”  आई म्हणाली. ” आई…चूक तिची नाही तर तिच्या भावांची होती…प्रीती तर तुला काहीच बोलली नव्हती ना…आणि तू वाईट नको वाटून घेऊ पण त्या दिवशी … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ४

आज जे झालं त्यामुळे प्रीती विचलित झाली होती. पंकज असे काही वागेल हे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. आधी त्याने तिची मागितलेली माफी आणि मग त्याची खराब तब्येत. आताच तर प्रीती थोडीफार सावरली होती पण तिचं आयुष्य एकाच दिवसात यु टर्न घ्यायला बघत होतं.   तसा पंकजच्या डोळ्यात पश्चात्ताप तिलाही दिसला होता. पण त्याच्यामुळे तिने जे … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ३

प्रीती फक्त बारावी पर्यंत शिकलेली होती आणि तिला घरकामा व्यतिरिक्त काही विशेष काम येत नव्हते. पण तिने आधी घरच्या शेतीत काम केले असल्याने तिला शेतीतील कामांची सवय होती. तिने शेतात मजुरीला जायचे ठरवले. लाडाकोडात वाढवलेली मुलगी तिच्या दोन वर्षाच्या बाळाला घरी ठेवून मजुरीला जाईल हे ऐकुन तिच्या आईचे काळीज तीळ तीळ तुटत होते. तिच्या आईने … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग २

प्रितीच्या वडिलांना वाटायचे की प्रीतीने स्वतःहून तिच्या सासरी निघून जावे. कारण विवाहित मुलगी माहेरी राहणे त्यांना पटत नव्हते. लोक काय म्हणतील हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आणि ह्या विचाराने त्यांनी कधीच प्रितीच्या डोक्यावरून मायेचा हात सुद्धा फिरवला नाही. प्रीतीचा आधार आता फक्त तिची आई होती. तिला माहेरी येऊन सात महिने झाले तरीही पंकज … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग १

प्रीती तिच्या आई बाबांची लाडकी होती. दोन भावांच्या प्रेमाच्या सावलीत वाढलेली होती. मागच्या वर्षीच तिच्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते. वहिनी सुद्धा प्रितीचे खूप लाड करायची. तिला हवं नको ते विचारायची. प्रीती सुद्धा वहिनीला खूप मान द्यायची. प्रीती नुकतीच बारावी पास झाली होती. शिक्षणात तिची फारशी प्रगती नसल्याने आणि तिला पुढे शिकण्यात फार रस नसल्याने … Read more

वैदेही

वैदेहीने तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. आणि तिच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी व्हायला लागली. वैदेही आठव्या वर्गात असेल तेव्हाच तिची आई हे जग सोडून गेली होती. तेव्हापासून आपसूकच तिच्यावर सर्व घराची जबाबदारी येऊन पडली.   तिच्या घरी ती, तिचा मोठा भाऊ सागर, आणि तिचे बाबा एवढे तिघेच होते. शिक्षणात बऱ्यापैकी हुशार असणारी वैदेही … Read more

घटस्फोट म्हणजे खेळ नाही

सत्यघटनेपासून प्रेरित साधारण पाच वर्षाआधी ची गोष्ट असेल. मी एका मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला गेले होते. लग्न खूप थाटामाटात पार पडले होते. नवरी आणि नवरदेव दोघेही खूप खुश होते. त्यानंतर जवळपास एका वर्षाने परत त्या मैत्रिणीच्या घरी जाण्याचा योग आला. तेव्हा तिची ताई तिच्या माहेरी होती. मी त्यांच्याशी बोलले तेव्हा त्या जरा उदास वाटल्या मला. मी … Read more