google-site-verification: googlea4a4b36c9de51f26.html
Sunday, July 5, 2026
मितवा
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
मितवा
No Result
View All Result

गोष्ट एका पैठणीची

वर्षभर भिशी टाकून मंजिरीने तिच्या स्वप्नातील पैठणी घेतली होती. पण नणंदेच्या एका हट्टामुळे तिच्या आनंदावर विरजण पडले. शेवटी निनादने घेतलेला निर्णय घरातील प्रत्येकाला नात्यांची खरी किंमत शिकवून गेला…

alodam37 by alodam37
May 21, 2026
in कथा, कौटुंबिक, नारीवाद, प्रेम
0
गोष्ट एका पैठणीची
0
SHARES
5.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज मंजिरी खूप आनंदात होती. तिने 11 महिने भिशी टाकून एक सुंदर पैठणी खरेदी केली होती. तिच्याकडे लग्नात घेतलेली एक पिवळी पैठणी होती. पण त्यानंतर ती पैठणी घेऊनच शकली नव्हती. तिच्या एका मैत्रिणीने तिला या भिशीबद्दल सांगितले तेव्हा तिच्या डोक्यात कल्पना आली की अशा प्रकारे का होईना ती पैठणी घेऊच शकते की. म्हणून तिने मागच्या वर्षी भिशी टाकायला सुरुवात केली आणि वर्षभराने आता तिचा पैठणी साठी नंबर लागला होता.

 

तिने मस्तपैकी जांभळ्या रंगाची आणि सोनेरी किनार असलेली पैठणी निवडली. अशीच पैठणी तिने एकदा एका लग्नात बघितली होती. तेव्हापासूनच हा रंग तिच्या आवडीचा बनला होता. आज जेव्हा साडीला तिने प्रत्यक्षात पाहिले तेव्हा तिची कळी खुलली. तिचा नवरा निनाद सुद्धा तिला एवढं आनंदात पाहून सुखावला होता. तिला कधी एकदा पैठणी नेसण्याचा प्रसंग येतोय आणि कधी पैठणी घालतोय असे झाले होते.

 

दुसऱ्या दिवशी दुपारी दारावरची बेल वाजली आणि दार उघडल्यावर समोर बघते तर तिची नणंद निधी दारात उभी. तिला पाहून मंजिरी उत्साहाने म्हणाली.

 

” अगं निधी…तू अचानक कशी…?”

 

” तुम्हा सर्वांची आठवण आली आणि भेटायला निघून आले.. एकच शहरात असल्याचा काहीतरी फायदा नको का…” निधी हसत म्हणाली.

 

” हो…ते एक छान आहे बरं…तू बस..मी लगेच तुझ्यासाठी चहा टाकते…”

 

” चहा नको अगं…तू सरळ जेवायलाच वाढ…” निधी म्हणाली आणि तिच्या आईच्या म्हणजेच मंजिरीच्या सासूबाईंच्या खोलीत निघून गेली.

 

मंजिरी थोड्याच वेळात सर्वांसाठी जेवण वाढून घेतले. जेवण आटोपल्यावर लगेच निधी ने विषय काढला.

 

” काय ग वहिनी…आई सांगत होती की तू पैठणी विकत घेतलीस ते…”

 

” विकत नाही अगं…मी मागच्या वर्षीपासून भिशी टाकत होते ना… त्यातूनच…” मंजिरी सांगतच होती तेवढ्यात निधी ने तिला मध्येच थांबवत म्हटले.

 

” ते काही असू दे…तू पैठणी आण ना दाखवायला…”

 

” हो…लगेच आणते…” असे म्हणत मंजिरी ने लगेच पैठणी आणून निधी ला दाखवली.

 

निधी ने उत्साहाने पैठणीची घडी मोडून तिचा पदर खांद्यावर घेऊन आरशात बघितले. आणि म्हणाली.

 

” अगं किती सुंदर दिसतेय ना…मला तर खूपच आवडली आहे…मी ठरवलंय की माझ्या मावस नंदेच्या लग्नात हीच साडी घालणार आहे…तू मला ही पैठणी पॅक करून दे…”

 

निधीचे बोलणे ऐकून नंदिनी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिली. ही अशी कशी म्हणू शकते ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. निधी चांगल्या श्रीमंत घरात सून बनून गेली होती. आणि तिच्याकडे महागड्या साड्यांची काहीच कमतरता नव्हती.

 

मग एवढं असताना सुद्धा तिच्याकडे असलेल्या एकमेव पैठणीवर तिने कशाला डोळा ठेवावा. मी एवढे महिने पैसे साठवून ही पैठणी घेतली आहे आणि हिने सरळ मला न विचारता ठरवले सुद्धा की साडी ती घेऊन जाईल. निदान विचारले असते तर काही विचार तरी केला असता. पण हे कसले वागणे झाले. मंजिरी ने मनात विचार केला आणी निधीला म्हणाली.

 

” पण निधी… अगं मी पण माझ्या भावाच्या लग्नात ही साडी नेसायचं ठरवलं आहे…आजी दोन्ही लग्न जवळपास एकाच वेळेला पडतील…त्यामुळे सध्या मी तुला ही साडी नाही देऊ शकत अगं…तू नंतर कधीतरी ने ना…”

 

मंजिरी नाही म्हणेल ह्याची तिच्या सासूबाईने आणि निधीने कधी कल्पनाच केली नाही.

 

” तू माझ्या मुलीला नाही म्हणतेस…हे तिचं घर आहे आणि इथल्या प्रत्येक वस्तूवर तिचा अधिकार आहे…त्यामुळे तू तिला नाही म्हणू शकत नाहीस…” तिची सासू म्हणाली.

 

” बघ ना आई…लग्नाला फक्त सहा महिने झालेत माझ्या…पण इतक्यातच वहिनीने माझा या घरावरचा हक्क नाकारला आहे बघ…” निधी रडवेला चेहरा करत म्हणाली.

 

” मी नाही म्हणतेय असे नाही आई…फक्त तिला म्हणतेय की तू नंतर कधीतरी घेऊन जा साडी…आता मला हवीय माझ्या भावाच्या लग्नात नेसायला…” मंजिरी समजावणीच्या सुरात म्हणाली.

 

” दुसरी कुठलीतरी साडी नेस ना…ही साडी निधीला आवडली आहे तर तीच घेऊन जाईल…आणि ती सुंदर आहे तर तिला शोभून दिसेल ती साडी…तुझा रंगाला शोभणार नाही ती साडी…” सासूबाई म्हणाल्या.

 

मंजिरीच्या गव्हाळ वर्णाला कमी लेखण्याचा एकही संधी सासूबाई सोडत नसत. आता मात्र मंजिरी हिरमुसली. एकतर आधीच निधी ने साडीसाठी हट्ट केल्याने तिचा कालपासून असलेला उत्साह मावळला होता. त्यावर सासूबाईंनी पुन्हा एकदा तिला तिच्या रंगावरून टोमणा मारल्याने तिचा आत्मविश्वास मावळला होता.

 

संध्याकाळी निनाद घरी आला तेव्हा घरात जरा तणावपूर्ण वातावरण आहे हे त्याला कळून चुकले होते. निधी सुद्धा घरात हसून खेळून वावरत नव्हती. आईसुद्धा फार काही बोलत नव्हती आणि मंजिरीचा चेहरा सुद्धा कोमेजला होता. कालचा उत्साह तिच्यात अजिबात दिसत नव्हता. आधी त्याने काही विषय काढला नाही. पण रात्री झोपायला बेडरूम मध्ये गेल्यावर त्याने तिला विचारले.

 

” काही झालंय का मंजू…तू अशी नाराज का दिसत आहेस…?”

 

” काही नाही… थोडी थकले आहे आज…”

 

” गोष्ट फक्त एवढीशी नाही मंजू…तू नाराज वाटत आहेस…मला नाही सांगणार का काय झालंय ते…”

 

निनाद चे बोलणे ऐकून मंजिरीच्या डोळ्यात पाणी आले. मग त्याच्या कुशीत शिरून मंजिरीने त्याला दुपारी घडलेली घटना सांगितली. आणि म्हणाली.

 

” मी खरंच साडी द्यायला नकार नाही दिला हो…पण मला माझ्या भावाच्या लग्नात हौसेने ती साडी घालायची होती…तुम्हाला माहिती आहे ना माझ्याजवळ असलेली ती सगळ्यात चांगली आणि महागातली साडी आहे आजपर्यंतची…म्हणून मी म्हटलं की नंतर कधीतरी घेऊन जा…पण तिला आणि आईला वाईट वाटले…आज दिवसभरापासून दोघीसुद्धा माझ्याशी बोलत नाहीयेत…मला खूप वाईट वाटतंय…माझं खरंच चुकलं…मी तिला द्यायला पाहिजे होती साडी…”

 

” तू काहीच चुकीच वागलेली नाहीयेस मंजू…तुझ्याजागी कोणीही असती तर अशीच वागली असती…त्यामुळे जास्त विचार करू नकोस…आणि तू माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस हे विसरू नकोस…” निनाद तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.

 

निनादचे बोलणे ऐकून मंजिरी सुखावली. तिने मनातल्या मनात ठरवले की तिला सुंदर दिसण्यासाठी महाग साडीची गरज नाही. तिच्या नवऱ्याच्या नजरेत ती तशीच खूप सुंदर आहे. तिने ठरवले की सकाळी ती निधीला साडी देऊन देईल.

 

सकाळी ती झोपेतून उठली तेव्हा थोडा उशीरच झाला होता. उठल्यावर अंघोळ उरकून तिने भरभर घरातील कामे आवरली. निधीच्या आवडीचा नाश्ता तयार केला आणि निधीला चहा नाश्त्यासाठी बोलवायला गेली. निधीने जरा नाराजीनेच नाश्त्यासाठी होकार दिला.

 

थोड्या वेळाने निधी आणि सासूबाई दोघीही नाश्त्याला आल्या. दोघींनीही जाणीवपूर्वक मंजिरी शी बोलणे टाळले होते. मंजिरी अधून मधून काही विचारत होती पण दोघीही उत्तरे देत नव्हत्या. मग थोड्याच वेळात निनाद सुद्धा नाश्त्यासाठी आला तेव्हा निधी त्याला म्हणाली.

 

” दादा…तुझ्यामागे वहिनी माझ्याशी कशी वागते ते बघ ना..?”

 

” काय झालंय…कशी वागली मंजिरी…?” निनाद ने काहीही माहित नसल्याचा आव आणत म्हटले.

 

” अरे तिने नवी साडी घेतली आहे…मी म्हटलं मला माझ्या मावस नंदेच्या लग्नात घालायला दे…तर चक्क नकार दिला तिने…आता तूच सांग हे काय वागणं झालं का…आजवर तू मला कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हटले नाही पण वहिनी ने मात्र मला क्षणात परके केले…” निधी साळसूदपणे म्हणाली.

 

” हे काय ऐकतोय मी मंजिरी…तू निधीला नकार का दिलास…जा आण ती साडी आणि निधीला देऊन टाक…” निनाद म्हणाला.

 

आता मात्र निनाद चे बोलणे ऐकून मंजिरीला धक्का बसला. हा काल रात्री काहीतरी वेगळं बोलत होता आणि आता काहीतरी वेगळं बोलत आहे ह्याचे तिला आश्चर्य वाटले. पण तिनेही ती साडी निधीला देण्याचे ठरवले होते म्हणून ती रूम मध्ये गेली आणि ती साडी आणून निधीच्या हातात ठेवली.

 

” थँक्यू सो मच दादा…मला माहिती होतं तू मला नाराज करणार नाहीस…”

 

” अगं यात काय मोठी गोष्ट आहे…तुला लग्नात नेसायला हवी होती म्हणून दिली…आणि राहिली गोष्ट मंजिरी तिच्या भावाच्या लग्नात कोणती साडी नेसणार ह्याची तर तू तुझ्या नंदेच्या वास्तुशांती मध्ये घालायला म्हणून नाशिकवरून जी साडी घेतली होती ती तू मंजिरी ला नेसायला दे…” निनाद म्हणाला.

 

हे ऐकून निधीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती लगेच निनादला म्हणाली.

 

” ती साडी…ती तर मी अजून एकदाही घातली नाही…आणि किती महाग आहे ती साडी…मी नाही देणार ती साडी वहिनीला…पुढच्या महिन्यात नंदेची वास्तुशांत आहे तेव्हा नेसणार मी ती साडी…”

 

” मग तू तुझी साडी द्यायला तयार नाही आहेस तर मंजिरी ने तिची सगळ्यात महागातली साडी तुला द्यावी ही अपेक्षा का करतेस तू तिच्याकडून…?” निनाद ने तिला पाहत विचारले.

 

” का नाही करणार मी तिच्याकडून अपेक्षा… हे घर माझं आहे… आणि माझ्या घरातला प्रत्येक वस्तूवर माझा अधिकार आहे…ही साडी घेण्यासाठी तूच वहिनीला पैसे दिले असतील ना…मग माझा दादाने घेतलेल्या साडीवर माझा हक्क नाही का…?” निधी चिडून म्हणाली.

 

” जसं हे घर तुझं आहे तसंच मंजिरीचे सुद्धा आहेच ना…मग तिच्यासाठी म्हणून, तिने साठवलेल्या पैशातून आलेल्या वस्तूवर तू स्वतःचा अधिकार सांगायचा हे योग्य आहे का…ती पैठणी मंजिरीने थोडे थोडे पैसे साठवून विकत घेतली आहे…तिच्याजवळ असणारी ती एकमेव पैठणी आहे…तिने खूप वाट पाहिली होती की तिच्या भावाच्या लग्नात ती ही पैठणी नेसून मिरवेन…

 

आणि राहिली गोष्ट तुझी तर तुझ्याकडे महागातल्या अशा कितीतरी साड्या आहेत…तुझ्या लग्नात जेव्हा तुझ्यासाठी साड्या घ्यायला गेलो होतो तेव्हा मी एकच पैठणी घेण्याचा विचार करून गेलो होतो. पण tula तिथे तीन पैठण्या आवडल्या होत्या…तेव्हा माझं बजेट नसताना सुद्धा मी तुला तीन पैठण्या घेऊन दिल्या आहेत ना… तेव्हापण मंजिरी एक शब्दाने सुद्धा नाही म्हणाली की तिला सुद्धा एक साडी हवीय…तिला माहिती होते की तेच पैशांची गरज पडेल म्हणून तिने साधीशी साडी घेतली होती…

 

तुझ्या सासरचे लोक सुद्धा बरेच श्रीमंत आणि हौशी आहेत…तुला कितीतरी चांगल्या साड्या दिल्यात त्यांनी…मग तुझी नजर तुझ्या वहिनीच्या साडीवर कशी काय पडली…आज जर तुला तुझ्या वहिनीची साडी घालायची असेल तर तुझ्याकडची साडी सुद्धा तुझी वहिनीला द्यायची तुझी तयारी असायला हवी ना…” निनाद म्हणाला.

 

हे ऐकून निधी खजील झाली. तिच्या सासूबाई सुद्धा गप्प बसल्या. निधी मंजिरी जवळ गेली आणि म्हणाली.

 

” वहिनी माझी खरंच चूक झाली…आईने जसे सांगितले की तू महाग पैठणी विकत घेतली आहेस ते ऐकून मी आधीच ठरवले होते की ती साडी मी घेऊन येईल…पण मी हा विचारच केला नव्हता की तुझी सुद्धा इच्छा असेल ती साडी घालण्याची…तू आजवर मला कधीच परके समजले नाही…मी मात्र तुझ्याशी अशी वागले…मला माफ कर…मी यापुढे कधीच तुझ्याशी अशी वागणार नाही…सॉरी…”

 

” अगं तू सॉरी नको म्हणूस…होतात कधी कधी चुका माणसांकडून…आणि तू तर लहान आहेस माझ्यापेक्षा…त्यामुळे मला माझ्या लहान बहिणी सारखीच आहेस…त्यामुळे मी तुझ्यावर रागावले नाहीच मुळी…” मंजिरी तिला म्हणाली.

 

” मलापण माफ कर सुनबाई… निधीला मीच सांगितले होते तू नवीन पैठणी घेण्याचे…आणि तिच्या मावस नंदेच्या लग्नात ती साडी नेसायला घेऊन जा हे सुद्धा मीच सुचवले होते…तू इतक्या हौसेने आणि इतक्या वर्षांनी ही पैठणी घेतलीस ह्याचा मी जराही विचार केला नाही…” सासूबाई खजील होत म्हणाल्या.

 

” आई तुम्ही माफी नका मागू प्लीज…मला वाईट वाटतंय तुम्हाला असे माफी मागताना बघून…” मंजिरी म्हणाली.

 

” चला आता तुम्हा सगळ्यांना तुमची चूक कळली आहे तर ह्या गंभीर वातावरणाचा शेवट गोड करण्यासाठी माझ्या आवडीचा शिरा बनवूया…” निनाद वातावरणाला हलके करण्यासाठी म्हणाला.

 

” चल मी पण येते…आज आपण दोघे बहीण भाऊ वहिनीसाठी छान शिरा करूयात…” निधी म्हणाली.

 

” येतो का तुला बनवता…की आधी करायची तशीच कच्च जेवण बनवते अजूनही…” निनाद तिला चिडवत म्हणाला.

 

” काय तू पण ना…एकदा माझ्या हातचा शिरा खाऊन बघ म्हणजे कळेल तुला…” निधी त्याला म्हणाली.

 

असे म्हणून निनाद आणि निधी दोघेही स्वयंपाकघरात गेले. जाताना निनादने मंजिरीकडे पाहून हलकेसे स्मितहास्य केले. मंजिरीला तिच्या नवऱ्याचे खूप कौतुक वाटत होते. ज्या पद्धतीने त्याने परिस्थिती हाताळली होती त्यावरून आता ती स्वतःला खूप नशिबवान बायको समजत होती.

 

समाप्त.

 

©®आरती निलेश खरबडकर.

 

ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद 😊

Previous Post

पुन्हा उमललेल नातं

Next Post

हरवलेलं प्रेम

alodam37

alodam37

नमस्कार, मला लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. मी लिहिलेल्या कथा ह्या माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारित असतात. लिखाणातून मला निखळ आनंद मिळतो. तुम्हाला ही माझ्या कथा आवडतील अशी अपेक्षा आहे. 😊

Next Post
हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

निर्णय – भाग ६

निर्णय – भाग 22

by alodam37
July 3, 2026
0

  "का..? काय झालं..? ती तुमची मैत्रीण असून तुमच्या सोबत येऊ शकते तर मी बायको असून का नाही येऊ शकत...?"...

निर्णय – भाग ६

निर्णय – भाग २३

by alodam37
July 3, 2026
0

  "अगं तू काय बोलते आहेस... रविचं बाळ आहे ते... तुझं सुद्धा कोणीतरी आहेच ना...तुला तर आनंदच व्हायला हवा की...

निर्णय – भाग ६

निर्णय – भाग १९

by alodam37
June 27, 2026
0

  नकुल नंदिनीला घ्यायला तिच्या कॉलेजसमोर आला. त्याने नंदिनीला कॉल करून आपण आल्याचे कळवले. नंदिनी तशीच धावत गेट जवळ गेली....

निर्णय – भाग ६

निर्णय – भाग १७

by alodam37
June 27, 2026
0

  दुसऱ्या दिवशी सकाळीच उषाताईंनी घरातील कामे आटोपली. स्वयंपाक वगैरे करून ठेवणीतील नवी साडी घालून तयार झाल्या. प्रकाशराव सुद्धा तयार...

निर्णय – भाग ६

निर्णय – भाग १३

by alodam37
June 27, 2026
0

    समोर रवीची आई उभी होती. त्यांना पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. ते शालू ताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.  ...

निर्णय – भाग ६

निर्णय – भाग १०

by alodam37
June 27, 2026
0

  सरलाताईंनी गरम गरम स्वयंपाक करून नंदिनीला वाढून दिले. सुरुवातीला संकोचणारी नंदिनी नंतर व्यवस्थित जेवली. उषाताईंनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन...

बापमाणूस

बापमाणूस

by alodam37
June 19, 2026
0

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच...

Load More
  • Home
  • About us
  • contact us
  • Disclaimer
  • Privacy Policy

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

error: Content is protected !!