Friday, August 1, 2025
मितवा
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
मितवा
No Result
View All Result

दिल ये जिद्दी हैं

Admin by Admin
July 4, 2021
in मितवा
21
0
SHARES
174
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनेश बऱ्याच वेळेपासून रेल्वे स्टेशन वर नुसताच बसलेला होता. इतक्यात मनात काहीतरी ठरवून तो एका ट्रेनमध्ये चढला. ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती तरीही तो सीट वर न बसता ट्रेनच्या दाराजवळ उभा राहिला. ट्रेन नुकतीच प्लॅटफॉर्म वरून निघत होती. अजूनही माणसांची या डब्यातून त्या डब्यात वर्दळ होती. तो तसाच ट्रेन च्या दारात उभा राहून बाहेर शून्यात बघत होता. त्याला अजूनही सर्वकाही जसेच्या तसे आठवत होते. त्याच्या लहानपणी पासून ते आजवर त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्याच्या नजरेसमोर येत होत्या.


दिनेश त्याच्या आईवडिलांचा लाडका मुलगा. त्याला दोन मोठे भाऊ होते. भावांचा सुद्धा दिनेश वर फार जीव. घरची परिस्थिती जेमतेम होती पण त्यांचे कुटुंब आनंदात होते.
दिनेश लहानपणी पासूनच अभ्यासात खूप हुशार होता. म्हणूनच त्याच्या आई वडिलांनी त्याच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले. गावात दहावी पर्यंत शाळा होती. पुढे शिक्षण घ्यायला गावापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर दूर नी असलेल्या शहरात कॉलेज मध्ये गेला. बारावी झाल्यानंतर त्याने इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला.


एका छोट्याशा खेड्यातून आलेला दिनेश शहरातील राहणीमान बघून एकदम भांबावून गेला. त्याने इंजिनिअरिंग ला प्रवेश तर घेतला पण त्याचा पुढील प्रवास त्याला वाटला तितका सोपा नव्हता. त्याला दर महिन्याला निदान चार ते पाच हजार रुपये खर्च येणार होता. त्याच्या घरची परिस्थिती तशी बरी होती पण महिन्याला चार ते पाच हजार रुपये त्याला पाठवणे हे त्याच्या घरच्यांसाठी परवडणारं नव्हतं.

तरीही घरच्यांनी त्याच्या शिक्षणासाठी जमेल तसे पैसे जमा करायचे आणि त्याला पाठवायचे. त्याच्या घरची परिस्थिती त्याच्यापासून काही लपली नव्हती. तशातच आपण इंजिनीरिंग करायचा निर्णय चुकीचा नाही ना या विचाराने त्याचे लक्ष विचलित केले. मला इंजिनिअरिंग जमलं नाही तर घरच्यांनी मेहनत वाया जाईल. ह्या विचाराने तो अस्वस्थ व्हायचा.

परिणामी अभ्यासात त्याचे लक्ष लागत नव्हते. आणि पुढे जे व्हायला नको तेच झाले. सेमीस्टर मध्ये त्याचा एक विषय राहिला. यामुळे तर त्याचा आत्मविश्वास कामी व्हायला लागला. त्या मध्ये आणखी भर म्हणजे त्याचा जवळचा मित्र आता त्याच्यापासून दुरावला होता.


पण त्याने हार मानली नाही. त्याने तिथून पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य ठेवले. आणि पुढच्याच सिमिस्टर मध्ये तो चांगल्या मार्कांनी पास झाला. एव्हाना तो कॉलेज मध्ये रुळायला लागला होता. त्याचे अनेक मित्र मैत्रिणी बनले होते.


त्यामध्येच त्याला त्याची सर्वात चांगली मैत्रीण प्रीती मिळाली. प्रीती अभ्यासात हुशार होती. दिनेश आणि ती कॉलेज मध्ये एकत्र अभ्यास करायचे. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. दिनेश ची प्रितीवर ‘प्रीती ‘ जडली. प्रीतीला सुद्धा तो आवडायचा. पण दोघांनीही आपल्या प्रेमाची वाच्यता कधीही एकमेकांसमोर केली नाही. कारण त्या दोघांनाही आधी आयुष्यात काहीतरी बनून दाखवायचे होते. त्यांच्या अभ्यासात त्यांच्या प्रेमाचा कधीच अडथळा झाला नाही. दिनेश ने ठरवले होते. नोकरी लागली की सरळ तिला लग्नाला मागणी घालायची.


दिनेश आता अभ्यासाव्यतिरिक्त एका सायबर कॅफे मध्ये पार्ट टाईम जॉब करू लागला होता. स्वतःचा राहण्या खाण्या चा खर्च तो स्वतःच भागवू लागला. त्या सायबर कॅफे च्या मालकाचा तर दिनेश वर खूप विश्वास बसला होता. दिनेश सुद्धा त्याचे काम चोख पार पाडायचा.


तदिनेशचा कॉलेज आणि अभ्यास आता चांगल्या पद्धतीने सुरू होता. त्याच्या कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. दिनेश ने ठरवले होते की इंजिनिअरिंग करून पुढे यु पी एस सी ची परीक्षा द्यायची आणि प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे.


तो दिल्लीहून परत आला तेव्हा त्याला कळले की त्याच्या मोठ्या भावाची तब्येत अचानकपणे बिघडली म्हणून. त्या वर्षी पाऊस देखील कमी झाला होता म्हणून त्यांना पिक सुद्धा झाले नव्हते. ही परिस्थिती त्याच्या सायबर कॅफे क्या मालकाला समजली. त्या मालकाने त्याला आधार देण्या ऐवजी त्याचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने दिनेशचा पगार जवळपास अर्धा केला. त्याला वाटला ह्याची अडती असल्याने ह्याला काहीही करून काम करावेच लागेल.

दिनेशला मात्र या गोष्टीचे फार वाईट वाटले. त्याने तो जॉब सोडला. यावर मात्र त्या मालकाने दिनेशला फार वाईट असे बोल सुनावले. त्याच्या गरिबी वरून. तो म्हणाला की तू आयुष्यात काहीही करू शकणार नाही. त्याचे शब्द दिनेशच्या फार जिव्हारी लागले. त्याला आता काहीतरी करून दाखवायचे होते.


दिनेश ची परीक्षा संपली. तो तिथेच राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली होती. आणि तो मुख्य परीक्षेचा अभ्यास करत होता. मात्र त्याच्या भावाची तब्येत जास्त खराब असल्याचा निरोप आला आणि तो गावी गेला. एकीकडे भावाला दवाखान्यात उपचार सुरू होते आणि दुसरीकडे शेतीवर सुद्धा लक्ष द्यायचं होतं. या सर्वांमध्ये त्याचं अभ्यासावर दुर्लक्ष होत होतं. आणि तो मुख्य परीक्षेत नापास झाला. हे सर्व कमी होतं की काय तोच एके दिवशी त्याला प्रीतीचा फोन आला.


तिने त्याला तिचे लग्न जुळल्याचे सांगितले. आणि आता यानंतर आपण कधीच बोलणार नसल्याचेही सांगितले. दिनेश ने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिचाही नाईलाज होता. तिने घरी दिनेश बद्दल सांगितले होते पण तिच्या घरचे त्यांच्या लग्नासाठी तयार झाले नाहीत. आणि प्रीती त्याच्यापासून दुरावली होती.


इतक्यात ट्रेन मधील आवाजाने ती विचाराच्या तंदृतून बाहेर आला. आता ट्रेन च्या दारात तो एकटाच उभा होता. त्याला वाटलं हीच योग्य संधी आहे. कुणाचेही माझ्यावर लक्ष नाही. आणि तो ट्रेन मधून खाली उडी टाकणार इतक्यात…..


इतक्यात त्याला मागून कुणाचा तरी स्पर्श झाला. तो मागे वळून बघतो तर एक अपंग मुलगा त्याला आवाज देत होता. जेमतेम पंधरा वर्षांचा असेल तो. त्याला दोन्ही पाय नव्हते. तो कुबड्यांचा आधार घेऊन ट्रेनमध्ये गोळ्या बिस्किटे विकत होता. त्याने दिनेश ला काही विकत घेणार का म्हणून विचारले. दिनेश ने नकारार्थी मान डोलावली आणि तो मुलगा स्मितहास्य करत तिथून पुढे निघून गेला.


दिनेश बराच वेळ त्याच्याकडे पाहतच राहिला. तो प्रत्येकाला विचारात होता काही विकत घेणार म्हणून. आणि समोरच्याने नाही म्हटले तरीही त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य जसेच्या तसे टिकून होते. दिनेश ला आता स्वतःचीच लाज वाटली. हा मुलगा इतक्या कमी वयात स्वतःच्या अपंगत्वावर मात करून आत्मनिर्भर बनला होता. पण आपण मात्र धडधाकट असूनही केवळ प्रेमात आलेल्या अपयशामुळे स्वतःचा जीव द्यायला निघालो होतो ह्याचा आता त्याला पश्चात्ताप झाला. त्याला त्याच्या आईची खूप आठवण आली. तो तडक तिथून आपल्या घरी गेला.


आता त्याने ठरवले होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे. त्याच्या आईवडिलां च्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा त्याला पूर्ण करायच्या होत्या. त्याने आता पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. त्याच्या दादावर सुद्धा उपचार सुरू होते. त्याचा दादा आता ठीक व्हायला लागला होता.
आणि एकदा अचानक योगायोगाने तो एका सेमिनार मध्ये पोहचला. तेथे त्यांना स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा याबद्दल मार्गदर्शन केले जात होते.

दिनेशला अचानक काहीतरी सुचले. त्याने स्वतः काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्याने स्वतःचा एक सायबर कॅफे सुरू करायचा निर्णय घेतला. तो एका सायबर कॅफे मध्ये पार्ट टाइम जॉब करायचा तेव्हा त्याने ह्या कामातील सर्व बारकावे समजून घेतले होते. त्याला ह्या विषयातील संपूर्ण माहिती होती.


त्याने या बाबतीत कराव्या लागणाऱ्या सर्व प्रक्रिया समजून घेतल्या. आणि बॅंकेतून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्यात जवळपास सहा महिने गेले. पण त्याने सातत्याने त्याचे प्रयत्न सुरू ठेवले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या घरच्यांना मात्र कर्ज काढून स्वतःचा व्यवसाय सुरु करणे जरा जोखमीचे वाटले. पण दिनेश त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्याची जिद्द पाहून त्याच्या घरचे सुद्धा त्याच्यामागे ठामपणे उभे राहिले.


आणि बघता बघता बँकेने त्याचे कर्ज मंजूर केले. त्याच्या हाती जेव्हा बँकेने पहिला चेक दिला होता तेव्हा त्याला खूप आनंद झाला. बघता बघता सर्व बाबींची पूर्तता केली. आणि त्याने स्वतःचा सायबर कॅफे सुरू केला. त्याने त्याच्या आई वडिलांच्या हातून त्याच्या कॅफेचे उद्घाटन केले. त्याच्या आई वडीलांना त्याचे खूप कौतुक वाटले.


कॅफे तर एकदाचा सुरू झाला होता. पण त्याच्याकडे ग्राहक मात्र येत नव्हते. यायचे पण अगदी कमी. जवळपास महिनाभर तरी कॅफे अगदी रिकामा वाटत होता. पण दिनेश ने त्यावर सुद्धा युक्ती शोधून काढली. त्याने दुकानाच्या बाहेर इथे फोन चे रिचार्ज होईल असा फलक लावला. तिथे लोक फोनचा रिचार्ज करायला यायला लागले. आणि मग दिनेश त्यांना त्याच्या कॅफे मध्ये काय काम होतं हे समजावून सांगायचा. हेच त्याचं साधं सरळ मार्केटिंग होतं.


हळूहळू त्याच्याकडे ग्राहक यायला लागले. विद्यार्थ्यांचा ओघ वाढत गेला. आणि दुसऱ्याच महिन्यात त्याचा सायबर कॅफे अगदी जोमात सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला व तो यशस्वी करून दाखवला.

समाप्त.

Previous Post

अनपेक्षित

Next Post

अपशकुनी ? – भाग १

Admin

Admin

Next Post

अपशकुनी ? - भाग १

Comments 21

  1. Dinesh Bhagat says:
    5 years ago

    अप्रतिम लेखन….

    Reply
    • aarti kharbadkar says:
      5 years ago

      धन्यवाद

      Reply
  2. Sagar ingole says:
    5 years ago

    Outstanding dinesh brother

    Reply
  3. Ashwini Vasantrao Thakre says:
    5 years ago

    Nice Writing 👌👌👍

    Reply
    • aarti kharbadkar says:
      5 years ago

      Thanks

      Reply
  4. Shubham bhagat says:
    5 years ago

    Mind blowing dada

    Reply
  5. वैभव says:
    5 years ago

    खूप छान आहे माझा मित्र दिनेश भगत ची success story

    Reply
  6. Gayatri Ashokrao Hole says:
    5 years ago

    Nice

    Reply
  7. Sagar jahirav says:
    5 years ago

    Bhagat bhau cha Wishaich welga..love you dinya….kanadikar

    Reply
  8. Sagar jahirav says:
    5 years ago

    Aarti Madam khup chaan…..keep it up….. believe in yourself…..

    Reply
    • aarti kharbadkar says:
      5 years ago

      Thanks 😊

      Reply
  9. Namrata says:
    5 years ago

    Waw…nice wonderful story…

    Reply
    • aarti kharbadkar says:
      5 years ago

      Thanks

      Reply
  10. Pavan Taturkar says:
    5 years ago

    Awesome Dinesh Dada…I didn’t even know what happened cause u always gave us Smile & Behind that smile all this thing’s had been happening…..
    This is True Inspiration
    & About author she is Awesome too😊

    Reply
    • aarti kharbadkar says:
      5 years ago

      Thank you 😊

      Reply
  11. Mahesh korde says:
    5 years ago

    आयुष्यात आलेल्या कशी मात करावी पुढचे पाऊल कसे टाकावे खुप चांगलं सांगितले… दिनेश सर ur great 🙏🙏

    Reply
  12. Sanket Wankhade says:
    5 years ago

    प्रेरणादायी कथा,❤️👌

    Reply
  13. Umesh jahirav says:
    5 years ago

    Mind blowing Story yrr dinesh bhau .

    Reply
  14. Milind ingle says:
    5 years ago

    सुंदर लिहिलंय , मनात आत्मविश्वास असला की माणूस शून्यातून ही पुढे जाते हे दिनेश वरून सिध्द झाले. थोडे कोठे कोठे टाईप मिस्टीक झाले आहे. कमी ऐवजी कामी,च्या ऐवजी क्या,
    ह्या बारीक गोष्टी लेखकाने पाहूनच हाताळायला हवे , पुर्ण वाचूनच साहित्य पोस्ट करायला हवे, नाहीतर व्याकरणात दोष असलेल्या सारखं वाटतं. नाही तर घाई केली असे दिसून येते.
    असो पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    मिलिंद इंगळे (साहित्यिक व चित्रकार)
    मो.८४८५८६१६२०

    Reply
    • aarti kharbadkar says:
      5 years ago

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद…तुम्ही दिलेल्या सूचना मी नक्कीच लक्षात ठेवेन…

      Reply
  15. Harsh patil says:
    4 years ago

    Very nice and inspirational story didi…keep going. आम्ही दिनेश ला खूप जवळून बघितले आहे.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

मराठी कथा – इभ्रत

मराठी कथा – इभ्रत

by alodam37
July 15, 2025
0

  कावेरीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरू होती. कावेरीची मुलगी आनंदी सुद्धा खूप उत्साहात लग्नघरात बागडत होती. इतक्यात तिच्याकडून...

मराठी कथा – आळ

मराठी कथा – आळ

by alodam37
May 28, 2025
0

नंदिनी घाई घाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून तिला ती गोंधळली. आता पाऊण तासापूर्वी बाहेर पडली तेव्हा घरी...

ओळख खऱ्या प्रेमाची – भाग २ ( अंतिम भाग)

by alodam37
April 23, 2025
0

त्यानंतर विनयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवायचा खूप प्रयत्न केला की विनयचा ह्यात काहीच हात नाही म्हणून. पण तक्रार आहे म्हटल्यावर...

ओळख खऱ्या प्रेमाची

by alodam37
April 23, 2025
0

लग्नानंतर महिन्याभरात शीतल माहेरी आली तेव्हा काहीशी उदास वाटत होती. आईने तिला काळजीने विचारले तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला...

एक चुकलेला निर्णय – भाग १

एक चुकलेला निर्णय – भाग २ (अंतिम भाग)

by alodam37
February 1, 2025
0

शिल्पाला वाटायचे की मीचांगल्या श्रीमंत घरातून आले आहे त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत...

एक चुकलेला निर्णय – भाग १

एक चुकलेला निर्णय – भाग १

by alodam37
February 1, 2025
0

" किती निर्लज्ज बायका असतात ना...आधी माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद केलं आणि आता पुन्हा बोहल्यावर चढणार आहे मेली..." शारदाताई बडबडत...

चुकलेली पारख

चुकलेली पारख

by alodam37
August 27, 2024
0

  " आई...मला प्रीती खूप आवडते गं...माझं खूप प्रेम आहे तिच्यावर...आणि मी तिला आजच नाही ओळखत... मागच्या सात वर्षांपासून आम्ही...

Load More
  • Home
  • About us
  • contact us
  • Disclaimer
  • Privacy Policy

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

error: Content is protected !!