अधिकार – भाग २(अंतिम भाग)

तसेच समर्थ ने सुद्धा आजी म्हणून त्यांना मान द्यायला हवा, त्यांच्या मागेपुढे करायला हवं असं त्यांना वाटायचं. समर्थ नुसता आई आई करतो हे त्यांना आधी जरा खटकायचं. पण जेव्हापासून त्या त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन आल्या तेव्हापासून त्यांना वाटत होतं की त्यांच्या बहिणीची नातवंडं जशी आईपेक्षा आजीच्या जवळ जास्त राहतात तसं समर्थने सुद्धा राहावं. शाळेतून आला … Read more

मराठी कथा – अधिकार

सुरेखाताई जरा तणतणतच घरात आल्या आणि सोफ्यावर येऊन बसल्या. चार दिवसांसाठी म्हणून बहिणीच्या घरी राहायला निघाल्या तेव्हा त्या खूपच उत्साहात होत्या. पण आता मात्र त्यांचा मूड काही ठीक वाटत नव्हता. सुहासने त्यांची बॅग त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. मंजिरीने त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि लगेच त्यांना नेऊन दिला. सुरेखाताईंनी काहीही न बोलता मंजिरीच्या हातून चहा घेतला. त्यांचं … Read more

वर्चस्व – भाग १६ (अंतिम भाग)

बराच वेळ झाला तरीही सुमेधा काही घरी आलीच नाही. निशांत मात्र आता तिला भेटायला, तिची माफी मागायला उतावीळ झाला होता. त्याने आईला विचारले. ” आई…कधी येईल ग ही…?” ” अरे येईल ना…नाहीतर तू तिला फोन लावून स्वतःच विचारून घे ना…?” ” ठीक आहे…” असे म्हणून निशांत ने तिला फोन लावला. पण ती फोन सुद्धा उचलत … Read more

वर्चस्व – भाग १५

मनीषाचे कॉल पाहून निशांतला कल्पना आली होती की सुमेधा तिथेही नसेल. तरीही त्याने एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सुमेधा च्या फोन वरून मनिषाला कॉल केला. दुसरीकडून मनीषा म्हणाली. ” हॅलो…सुमेधा ताई…अहो काल परत जाताना आईंनी तुमच्यासाठी दिलेला लाडवांचा डबा घरीच विसरून आल्यात की तुम्ही…” निशांत ला काय बोलू आणि काय नको ते कळत नव्हते. तो … Read more

वर्चस्व – भाग १४

सगळी कामे आटोपून सुमेधासुद्धा तिच्या रूम मध्ये गेली. रूम मध्ये जाऊन बघते तर निशांतने आधीच स्वतःची झोपण्याची व्यवस्था खाली केली होती. आणि दुसरीकडे चेहरा करून गाडीवर झोपी सुद्धा गेला होता. म्हणजे तो फक्त असे दाखवत होता की तो झोपला आहे. पण खरे तर त्याला अजिबात झोप येत नव्हती. एकीकडे त्याची तीव्र इच्छा होत होती की … Read more

प्रेरणादायी…कामावरून परतताना रस्त्याने धावत असणाऱ्या मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल… नेटकऱ्यांचे जिंकले मन

दिग्दर्शक विनोद कापरी यांना मध्यरात्री दिल्लीतील रस्त्यावर एक मुलगा धावताना दिसतो. त्याला काहीतरी मदत पाहिजे असेल म्हणून मग ते त्याच्याजवळ येऊन गाडी थांबवता त आणि त्याला म्हणतात की मी तुला कारने तुझ्या घरी सोडून देतो. त्यावर तो मुलगा म्हणतो की त्याला दिवसभर धावण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून तो यावेळी धावत आहे. त्यांनी जर त्याला लिफ्ट … Read more

मर्यादा : फक्त तिच्यासाठीच का ?

” सूनबाई…अजुन चहा झालाच नाही का…किती वेळ वाट पाहू मी…” सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असलेल्या सासुबाई त्यांच्या सुनेला शारदाला म्हणाल्या. ” आणतेच आहे आई…” शारदा म्हणाली आणि चहाचा कप घेऊन येऊ लागली. ती स्वयंपाक घरातून बाहेर निघणार इतक्यात तिचा तीन वर्षाचा मुलगा शर्विल बाहेरून खेळून आला आणि पाणी प्यायचे म्हणून सरळ स्वयंपाक घरात शिरला. पण … Read more