दिग्दर्शक विनोद कापरी यांना मध्यरात्री दिल्लीतील रस्त्यावर एक मुलगा धावताना दिसतो. त्याला काहीतरी मदत पाहिजे असेल म्हणून मग ते त्याच्याजवळ येऊन गाडी थांबवता त आणि त्याला म्हणतात की मी तुला कारने तुझ्या घरी सोडून देतो. त्यावर तो मुलगा म्हणतो की त्याला दिवसभर धावण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून तो यावेळी धावत आहे. त्यांनी जर त्याला लिफ्ट दिली तर त्याची रोजची सवय मोडून जाईल. मग त्यावर ते त्याला विचारतात की तू असा धावत का आहेस. तेव्हा तो मुलगा उत्तर देतो की त्याला आर्मीत जायचंय आणि त्याच्या प्रॅक्टिस साठी त्याला दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून तो यावेळी धावत आहे. त्यावर विनोद कापरी त्याचे उत्तर ऐकून थक्क होतात. मग ते त्या मुलाचा व्हिडिओ बनवतात.
ह्या मुलाचे नाव आहे प्रदीप मेहरा. मूळचा उत्तराखंड मधील अल्मोडा येथे राहणारा प्रदीप कामानिमित्ताने मोठ्या भावासोबत दिल्लीत राहतो आहे. आईवडिल अल्मोडा येथेच असतात. त्याची आई आजारी आहे. हे दोघेही भाऊ दिल्लीत राहून नोकरी करतात. प्रदीप सकाळीच उठून दोघा भावांचा स्वयंपाक करतो आणि सकाळी आठ वाजता कामावर हजर होतो.
तो दिल्लीतील सेक्टर 16 येथे मॅकडोनाल्ड येथे जेवण बनवण्याचे काम करतो. पण त्याला आयुष्यभर हेच करायचे नाही आहे. त्याचे एक स्वप्न आहे. त्याला आर्मी त जायचंय. पण सकाळच्या धावपळीत त्याला धावण्याचा सराव करायला वेळच मिळत नसल्याने मग तो रात्री घरी परतताना सुमारे दहा किलोमीटर एवढे अंतर धावत जातो. घरी जाऊन पुन्हा दोघा भावांचा स्वयंपाक करतो.
त्याला धावताना पाहून विनोद कापरी त्याला म्हणतात की आज मी तुला सोडतो उद्यापासून तू पुन्हा धावायला सुरुवात कर. त्यावर तो मुलगा त्यांना नम्रपणे नकार देतो आणि म्हणतो की असे केल्याने माझी सवय खराब होईल म्हणून. मग विनोद त्याला विचारतात की तो जेवण कधी करणार आहे. त्यावर तो सांगतो की घरी जाऊन जेवण बनवणार आणि मग जेवण करेन.
त्यावर विनोद कापरी त्याला पुन्हा स्वतःसोबत जेवायला चालण्याचा प्रस्ताव देतात. त्यावर तो पुन्हा नम्रपणे नकार देतो आणि म्हणतो की अशाने त्याचा मोठा भाऊ उपाशी राहील. आणि मग तो पुढे सांगतो की त्याचा मोठा भाऊ नाईट शिफ्ट मध्ये काम करतो आणि मला त्याच्यासाठी सुद्धा स्वयंपाक करावा लागणार आहे.
त्याचे बोलणे ऐकून विजय कापरी थक्क होतात. ते त्याला म्हणतात की तुझा हा व्हिडिओ व्हायरल होईल बघ. त्यावर तो पुन्हा आत्मविश्वासाने म्हणतो की व्हायरल झाला तर होऊ देत, मी कोणतं चुकीचं काम करत नाही आहे.
त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. त्याच्या या व्हिडिओ ने अनेकांचे मन जिंकून घेतले आहे. हा कष्टाळू, स्वप्नाळू, प्रामाणिक आणि घरच्यांचा विचार करणारा मुलगा सगळ्यांनाच आवडलाय. त्याच्या कामाच्या बाबतीत असणारा प्रामाणिकपणा, आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठीची धडपड हे सगळच प्रेरणादायी आहे.