नमस्कार 🙏,
मी आरती लोडम- खरबडकर. माझ्या मितवा या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मी एक गृहिणी आहे. सोबतच मला वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. लेखन हे माझ्या व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे.
माझ्या लेखनाला मोम्सप्रेसोचे व्यासपीठ मिळाल्यापासून माझ्या लेखनाला एक नवी दिशा मिळाली. त्याबद्दल मी मोम्सप्रेसोची आभारी आहे.
मला माझ्या सभोवताली घडणाऱ्या घटना, एखाद्या घटनेबद्दलचा माझा वेगळा दृष्टिकोन, स्त्रियांचे आयुष्य आणि त्यांचे प्रश्न, प्रेरणादायी घटना, आणि ज्यापासून आपण बोध घेऊ शकतो अशा विषयांवर लिहायला आवडते.
माझे बालपण ग्रामीण भागात गेल्याने मला तेथील लोकांबद्दल लिहायला आवडते. ग्रामीण आणि शहरी जीवनातील मी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या प्रसंगांवर व्यक्त होण्यासाठी देखील मी लेखणीचा आधार घेते.
माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏