अपेक्षा – भाग १

आज निशाचे मामा अचानक तिच्या घरी आले होते. निषाचे मामा त्याच शहरात राहायचे पण कामानिमित्ताने जाणे येणे जरा कमीच व्हायचे. त्यांना पाहून निशाच्या आईला खूप आनंद झाला. निशाचे बाबा त्यांना म्हणाले. ” काय दिवाकर आज अचानक आलास… आताच माझं जेवण झालं बघ…आधी सांगितले असते तर सोबतच जेवलो असतो…” ” इथे जवळच काम होते मला…एका मित्राच्या … Read more

जोडीदार हा प्रामाणिक हवा

आज संध्याकाळीच सायलीला लग्नासाठी पाहुणे पाहायला येणार होते. सायलीला तिची आई येता जाता सारख्या सूचना करत होती. सगळं काही व्यवस्थित पार पडू दे म्हणून आजी देवाला सारखे हात जोडत होती. बाबा इतर तयारींमध्ये व्यस्त होते. पण सायली मात्र थोडी धास्तावलेली होती. सगळं काही नीट होईल का हा विचार तिच्या मनात सतत येत होता. तिला इतक्यात … Read more

उशिरा कळलेली चूक

  ” मी मागच्या वेळी माझ्या गळ्यातून काढून माझ्या कपटातच ठेवली होती बोरमाळ…मला अगदी व्यवस्थित आठवतंय…” शांता काकू रागाने बोलत होत्या.    ” अग आई…एकदा नीट बघ…तिथेच असेल…कपाटातून कुठे जाणार…? सुरेश म्हणाला.    ” कुठे जाणार…तुझ्या बायकोशिवाय कोण हात लावणार आहे माझ्या कपाटाला…घेतली असेल माझ्या कपाटातून आणि दिली असेल तिच्या माहेरच्या लोकांना…तसेही ते आहेतच मुलखाचे … Read more

न्याय – भाग २ (अंतिम भाग)

भाग २ सासुबाई श्रेया ला प्रत्येक बाबतीत टोकायची. तिने घातलेल्या कपड्यांवरून. तिच्या जेवणाच्या पद्धती वरून. तर कधी त्यांना तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या आवडायच्या नाहीत. मग तिच्या मैत्रिणींसमोरच त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. श्रेयाला आजीचे हे वागणे अजिबात आवडत नसे. पण आईने सक्त ताकीद दिलेली होती की आजीला कधीही उलटून बोलायचे नाही म्हणून ती नाईलाजाने गप्प … Read more

न्याय – भाग १

प्रतिभा आणि प्रकाशराव यांना घरी यायला थोडा उशीरच झाला होता. एव्हाना जवळचे सगळेच नातेवाईक प्रतिभाच्या आईकडून प्रतिभाची वहिनी म्हणजेच सुषमा शी भांडायला जमले सुद्धा होते. एखाद्या चांगल्या कामांसाठी भलेही थोडा उशीर होईल पण अशा न्याय निवाड्याच्या बैठकीला मात्र कुणी सहसा उशीर करत नाही. पण यात मुख्य भूमिका होती ती म्हणजे प्रतिभा आणि प्रकाशरावांची. कारण आपल्या … Read more

तिचे कर्तृत्व

आज वरदच्या बॉसच्या घरी पार्टी होती. वैभवी पार्टीसाठी छान तयार झाली होती. मागच्याच महिन्यात घेतलेली महागडी साडी नेसून वैभवी खुलून दिसत होती. तिच्या गोऱ्यापान अंगावर गुलाबी रंगाची साडी तिला शोभून दिसत होती. गळ्यात तिने महागडा हार घातला होता. हातात मॅचिंग ब्रासलेट आणखीनच शोभा वाढवत होते. बऱ्याच वेळा पासून ती स्वतःलाच आरशात न्याहाळत होती. आणि तिने … Read more

फरक – भाग २ (अंतिम भाग)

” आई…पूजेत बसल्याने खरंच कुणी थकत असतं का…आणि मी दिवसभर सांभाळले ना सगळे काही… जशी ती थकते तशीच मीही थकतेच ना…मग आज जर माझी तब्येत बरी नाही तर तुम्ही किंवा विशाखा ने केला एक दिवस स्वयंपाक तर काही बिघडणार का…?” राधा म्हणाली. आता मात्र सासूबाईंचा पारा चढला. त्या रागानेच राघवकडे पाहत म्हणाल्या. ” बघितले तुझ्या … Read more

फरक – भाग १

राघव नुकताच घरी आला होता. आज घरचे दुकान जरा उशीराच बंद केले होते. नवीन मालाची तपासणी करताना आधीच राघवला उशीर झाला होता. तितक्यात घराच्या दारात पाय ठेवताच त्याची आई त्याला म्हणाली. ” राघव…जरा चौकातून आइस्क्रीम घेऊन येतोय का…? विभासला आईस्क्रीम खायची आहे पण फ्रीज मधली संपलीय…” ” हो आई…” राघव म्हणाला. पण आता यावेळी त्याची … Read more

रक्षण नात्याचे बंधन प्रेमाचे – भाग २ (अंतिम भाग)

राधिकाचा मुलगा श्लोक थोडा मोठा झाल्यावर मात्र तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. प्रायव्हेट नोकरी मिळाली सुद्धा. पगार कमी होता पण काम चांगले होते. राधिका आता आर्थिक रित्या सक्षम होत होती. तिच्या पैशातून घराला हातभारच लावत असल्याने तिच्या सासूने ही तिच्या नोकरी करण्याला विरोध केला नाही. आणि राधिकाच्या नवऱ्याला सुद्धा चांगला पगार होता. शिवाय सासरेबुवांची पेंशन … Read more

रक्षण नात्याचे बंधन प्रेमाचे – भाग १

राधिका ऑफिसमधून घरी आली आणि तिचा लहानगा श्लोक आई आई करत तिला जाऊन बिलगला. राधिकाने सुद्धा त्याला प्रेमाने मिठीत घेतले आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. मायलेकाच हे रोजचंच होतं. श्लोक रोज संध्याकाळी आईची वाट पहायचा आणि आई दिसताच तिला जाऊन मिठी मारायचा आणि आज दिवसभर शाळेत काय घेडके आणि काय नाही ते तिला सांगायचा. त्यानंतर … Read more