स्वीकार – भाग २ (अंतिम भाग)

ती पाणी घेऊन बाहेर आली. सर्वजण पाणी पिले. पण बोलायला कोणीच सुरुवात करत नव्हतं. म्हणून शेवटी जान्हवीनेच विषय काढला… ” तुम्ही इथे कसे काय येणे केले…?” ” बरं झालं तूच विचारलस…कारण नेमका विषय कुठून काढावा हे मला कळत नव्हतं…आम्ही आरुष बद्दल बोलायला आलो आहोत…” तिच्या सासुबाई म्हणाल्या. ” त्याचे नाव आरुष नाही आयुष आहे …आणि … Read more

स्वीकार

आज रविवार असल्याने जान्हवी जरा आरामात झोपेतून उठली. तिचा चार वर्षांचा मुलगा अजूनही झोपेतच होता. ती फ्रेश झाली आणि तिने स्वतःसाठी चहा केला. चहाचा कप घेऊन ती तिच्या बेडरूम मधल्या बाल्कनीत आली आणि आरामात बसून चहा प्यायला लागली.   रविवारी निवांत बाल्कनी मध्ये बसून चहा पिणे आणि आदेशच्या आठवणींमध्ये हरवून जाणे हा तिचा आवडता छंद. … Read more

काय भुललीस वरलीया रंगा – भाग ३ (अंतिम भाग)

” तू माझ्या प्रेमावर संशय घेतोस…अरे तुझ्यासाठी मी माझ्या दोन लहान मुलांना टाकून आलेय…” कावेरी म्हणाली. ” तेच तर…तू तुझ्या दोन लहान मुलांचा सुद्धा विचार केला नाहीस… मग मी असा कोण लागून गेलोय ग तुझा…बंद कर तुझी नाटकं…मी तुला कायमचा सोडून चाललोय…तुला आता काय करायचं ते तू ठरव…” अजय म्हणाला. आणि अजय खरोखर निघून गेला. … Read more

काय भुललीस वरलीया रंगा – भाग २

त्याने तिच्याशी लग्न करायला होकार दिला तशी कावेरी खूप आनंदली. तिने त्याच्यासोबत पळून जायची तयारी केली. आधी पळून जाऊन लग्न करायचे आणि नंतर काही दिवसांनी अजय मुलांना सुद्धा त्यांच्याकडे घेऊन येणार असे त्या दोघांचे ठरले होते. ठरल्या दिवशी कावेरी घरून तिचे आणि तिच्या सासूचे दागिने घेऊन एका लग्नाला जायचे म्हणून बाहेर पडली होती. सोबत नुकतंच … Read more

काय भुललीस वरलिया रंगा – भाग १

कावेरी लगबगीने सिमाताईंच्या घरी आली. बाहेर चप्पल काढून घाईने आत शिरत होती. इतक्यात सीमा ताई म्हणाल्या… ” अग सावकाश…आज कामांची इतकी घाई कसली आहे…” ” ताईसाहेब…आज आईला बरं नाही…काम आटोपलं की तिला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून घाई करत आहे…” कावेरी म्हणाली. ” बरं बाई… आटोप तुझी कामे आणि मग घेऊन जा तुझ्या आईला दवाखान्यात…” सीमाताई … Read more

अनपेक्षित

      सुमन तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला थोडी सावळी होती पण सुंदर दिसायची. तिचे बोलके डोळे, हसरा चेहरा, लांब केस, सडपातळ बांधा तिच्या सौंदर्यात भर घालायचे. सुमन अगदी मनमिळावू स्वभावाची, तिच्या बाबांची तर खूप लाडकी होती.       सुमनच्या वडिलांची परिस्थिती तशी हलाखीची होती. पण ते  सुखात होते. पण हे सुख त्यांच्या आयुष्यात फार … Read more