आयसीसीच्या महिला वर्ल्डकपच्या सुरुवातीलाच भारताच्या महिला क्रिकेट टीम ने पाकिस्तानी महिला क्रिकेट टीमला १०७ रन्स नी हरवले. मात्र त्यानंतर थोड्याच वेळात एका पाकिस्तानी मुलीने मात्र टीम इंडियाचे मन जिंकून घेतले.
पाकिस्तान महिला क्रिकेट टीमची कर्णधार बिस्माह मारुफ ही आपल्या सात महिन्यांच्या मुलीसह स्टेडियम वर आली होती. त्यासाठी तिचे कौतुक सुद्धा करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्या महिला क्रिकेट टीम मध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा १०७ रन्स ने पराभव केला.
मात्र त्यानंतर भारतीय महिला खेळाडूंनी पाकिस्तान महिला टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन पाकिस्तान महिला संघाची कर्णधार असलेली बिस्माह मारुफ हिच्या सात महिन्यांच्या मुलीला जवळ घेत तिचे खूप लाड केले. तसेच या सगळ्यांनी फातिमा सोबत फोटोज् सुद्धा काढले.
त्यांचे हे फोटोज् सोशल मीडिया मध्ये खूप व्हायरल होत आहेत. दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींना ह्या फोटोंनी भुरळ घातली आहे. आयसीसीने सुद्धा त्यांच्या आधिकारिक ट्विटर हॅण्डल वर त्यांचा हा फोटो शेअर केला आहे.