“अरे सुयश…अजुन तयार सुद्धा झाला नाहीस…खरेदीला जायला उशीर होतोय आपल्याला… मुलीकडच्यांची तयारी सुद्धा झाली असेल…आपण उशिरा जाणे बरे दिसणार नाही…” वृंदा काकू सुयशला आवाज देत म्हणाल्या.
” हो आई…मी तयारच होत आहे…दहा मिनिटात आवरून खाली येईल…” सुयश म्हणाला.
इतक्यात त्यांची मोठी सून पल्लवी आवरून हॉल मध्ये आली आणि म्हणाली…
” आई…तसा आपल्याला फारसा उशीर झालेला नाही…अर्ध्या तासाने निघालो तरी वेळेवर पोहचू आपण…”
” हो ग…पण लवकर निघालेले बरे…” वृंदाकाकू म्हणाल्या.
इतक्यात वृंदा काकूंची नणंद जी लग्नाच्या निमित्ताने त्यांच्या घरी पाहुणी म्हणून आली होती ती म्हणाली.
” अग पल्लवी…वहिनी बरोबर बोलत आहे…वेळेच्या आधी गेलेलं बरं… तसंही सुयशच्या लग्नातच वहिनीला काय ती हौस पूर्ण करायला मिळतीये वहिनीला…तुमच्या लग्नात तर काही करायला मिळालं नाही…निदान या वेळी तरी वहिनीला सर्व काही तिच्या मनाप्रमाणे करायला मिळतंय…”
त्यांचे बोलणे ऐकून पल्लवीचा चेहरा पडला. आतापर्यंत ती ज्या उत्साहाने लग्नाच्या तयारीत वृंदाकाकुंची मदत करत होती तो उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसेनासा झाला. ती काहीतरी कामाचे निमित्त काढून किचन मध्ये निघून गेली.
” काय तुम्हीपण शारदा ताई…आता त्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत…आता पल्लवी आपल्या घराचा एक भाग आहे…त्यामुळे आता या जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही…” वृंदा काकू त्यांच्या नणंदेला म्हणाल्या.
” मी तर बाई सहजच बोलून गेले…पल्लवीला दुखावण्याचा हेतू नव्हता माझा…पण सूयशच्या लग्नाच्या निमित्ताने सुमित आणि पल्लवीच्या लग्नाच्या आठवणी पण ताज्या झाल्या म्हणून बोलून गेले…” नणंदबाई म्हणाल्या.
आपल्या नणंदेचे बोलणे ऐकुन वृंदाताई भूतकाळात हरवून गेल्या. सुमितने त्याचे आणि पल्लवीचे प्रेमप्रकरण घरी सांगितल्यावर केवढा गोंधळ झाला होता घरात. तो पल्लवीशी लग्न करण्यावर ठाम होता. वृंदा काकूंनी सुमितला खूप समजावले. त्या रागावल्या, चिडल्या, त्यांनी सुमितशी बोलणे सोडून दिले पण सुमित मात्र त्याच्या निर्णयावर ठाम राहिला.
शेवटी नाईलाज म्हणून वृंदाकाकू लग्नाला तयार झाल्या. पण त्यांनी सुमितच्या लग्नाच्या तयारी मध्ये अजिबात भाग घेतला नाही. लग्नाचा कपडा खरेदीच्या दिवशी तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुमित वृंदा काकूंना विनवत होता पण त्या मात्र खरेदीला गेल्या नाहीत.
लग्नात सुद्धा पाहुण्या सारख्या एका बाजूला उभ्या होत्या. सुमित आणि पल्लवीला खूप वाईट वाटले होते. पण वृंदा काकू मात्र त्यांचा राग सोडायला तयार नव्हत्या. शेवटी लग्न करून पल्लवी घरात आल्यावर वृंदा काकू तिच्याशी तुटकच बोलत. पण पल्लवी मात्र वारंवार त्यांना खुश करायचा प्रयत्न करायची.
या चार वर्षात पल्लवीने अगदी मनभावापासून घरच्यांची सेवा केली होती. सर्वांना आपले मानून तिने सर्वांच्या मनातील राग घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि तिच्या प्रयत्नांना यश देखील आले. इतर घरच्यांना प्रमाणे वृंदा काकूंनी सुद्धा पल्लवीचा स्वीकार केला होता.
आपण सुरुवातीला पल्लवी सोबत चांगले वागलो नाही ह्याचे राहून राहून वृंदा काकूंना वाईट वाटायचेच.
तसे पाहिल्यास पल्लवीला नाकारण्याचे असे काही विशेष कारण नव्हते. पल्लवी एका चांगल्या घरातील शिकलेली मुलगी होती. पल्लवी आणि सुमित लहानपणापासून सोबत शिकलेले होते. एकमेकांना चांगले ओळखायचे. एकमेकांसाठी पूरक होते.
पल्लवीचा स्वभाव सुद्धा खूप गोड होता. वृंदा काकू कितीही रागात बोलल्या तरीही ती मात्र हसून उत्तर द्यायची. वृंदा काकूंनी सुरुवातीला पल्लवीचा राग राग केला. त्यांच्या लग्नात सुद्धा मनात अढी ठेवली होती. पण पल्लवीने आजवर कधीच तक्रार केली नाही. पण पल्लवीला मनातून ह्याचे वाईट वाटलच असेल ह्याची वृंदा काकूंना जाणीव होती.
सर्वकाही चांगले सुरू होते. मात्र अधून मधून पल्लवीच्या लग्नाचा विषय निघायचा आणि पुन्हा वृंदा काकूंना आपण पल्लवी आणि सुमितच्या बाबतीत चुकल्याची जाणीव व्हायची. आणि आता सुयशच्या लग्नाच्या निमित्ताने तर जुन्या आठवणी पुन्हा एकदा आठवायच्या. पल्लवी मात्र हसतमुखाने सुयशच्या लग्नाची तयारी करत होती.
” आई… माझं आवरून झालंय…निघायचं का..?”. सुयश म्हणाला.
सुयशच्या आवाजाने वृंदा काकू विचाराच्या तंद्रीतून बाहेर आल्या.
” हो… चल निघूयात..पल्लवी चल आपल्याला निघायचंय…” वृंदा काकूंनी पल्लवीला हाक मारली.
पल्लवी बाहेर आली आणि सर्व मिळून खरेदीच्या ठिकाणी पोहोचले. नवऱ्या मुलीने तिच्यासाठी साड्या पसंत केल्या. लग्नासाठी एक भारी तला शालू पसंत केला. सर्व खरेदी मनाप्रमाणे उरकली आणि संध्याकाळी उशिरा सर्वजण जेवण करून परत घरी आलेत.
दुसऱ्या दिवशी सकाळीच वृंदा काकूंनी पल्लवीला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. आणि तिच्या हातात एक पिशवी दिली.
” हे काय आहे आई..?” पल्लवी ने विचारले.
” उघडून तर बघ…वृंदा काकू म्हणाल्या.
पल्लवी ने उघडून बघितले तर आतमध्ये एक भारितला शालू होता.
” आई…हा तर लग्नाचा शालू आहे…पण काल तर आपण दुसरा शालू घेतला होता…हा दुसरा कुणासाठी ?”
” तुझ्यासाठी…”
” माझ्यासाठी…पण…आई….” पल्लवी ला आता बोलणे सुचत नव्हते.
” हो…तुझ्यासाठी…तुझ्या लग्नात तुझं कोडकौतुक करताच आलं नाही बघ…लग्नात अगदी खाष्ट सासू म्हणून वावरले ग मी…माझं जरा चुकलच…तुझ्या लग्नाच्या तयारीत सुद्धा हातभार लावला नाही मी…मला माहिती आहे तुझी खूप इच्छा होती लग्नात माझ्या पसंतीचा शालू नेसायची…तेव्हा नाही जमलं…पण सुयशच्या लग्नात तू हा शालू घाल…मला खूप बरं वाटेल…” वृंदा काकू म्हणाल्या.
” आई…खरंच खूप थँक्यू…मला हा शालू खूप आवडलाय…मी अगदी आयुष्यभर जपून ठेवणार आहे हा शालू…कारण आज खऱ्या अर्थाने तुमचा माझ्यावरील राग गेला असे वाटतेय…” हे बोलताना पल्लवीच्या डोळ्यात पाणी आले होते.
” तुझ्यावर राग नव्हता ग…फक्त थोडा रुसवा होता…आणि तो केव्हाचा निघून गेलाय…आता झाले गेले सर्व काही विसरून पुन्हा नव्याने आपल्या नात्याची सुरुवात करुयात…”
वृंदा काकूंनी असे म्हणताच पल्लवीने त्यांना मिठी मारली. चार वर्ष ज्या क्षणाची तिने वाट पाहिली होती तो क्षण अखेर आज आला होता. ह्या सासू सुनेची कहाणी सुफळ संपूर्ण झाली होती.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.
Khup chaan story 👌
Every weekend i used to pay a visit this web site, as i
want enjoyment, as this this web site conations genuinely good funny material too.
delta 8 area 52 – delta 8 area 52
delta 8 area 52 – delta 8 THC for sale area 52
delta 8 area 52 – delta 8 area 52
delta 8 area 52 – buy delta 8 THC area 52
delta 8 THC area 52 – Area 52 Delta 8 THC
Howdy superb blog! Does running a blog like this require a massive amount work?
I have very little knowledge of programming but I was hoping to start my own blog soon. Anyway, should you have any recommendations or tips for new blog owners please share.
I know this is off subject however I simply had to ask.
Thanks!
buy delta 8 THC area 52 – buy delta 8 THC area 52
buy delta 8 THC area 52 – delta 8 carts Area 52
delta 8 area 52 – buy delta 8 THC area 52
buy delta 8 THC area 52 – area 52 delta 8 THC products
delta 8 area 52 – delta 8 carts Area 52
If you are going for most excellent contents like me, only pay a visit this site daily since it presents feature contents, thanks
delta 8 carts Area 52 – delta 8 carts Area 52
delta 8 carts Area 52 – Area 52 Delta 8 THC
buy delta 8 THC area 52 – Area 52 Delta 8 THC
buy delta 8 THC area 52 – area 52 delta 8 THC products
delta 8 THC for sale area 52 – delta 8 area 52