” नाही आत्या…त्रास वगैरे नाही झाला…” राधा म्हणाली.
” जा मग किचन मध्ये…आणि स्वयंपाकाला सुरुवात कर…” सुलोचना ताई म्हणाल्या.
तशी राधा किचन मध्ये जायला निघाली. तेवढ्यात मीनाक्षी ने मागून आवाज दिला आणि म्हणाली.
” आधी ती भांडी घासून घेशील…”
” हो…” एवढे बोलून राधा किचन मध्ये निघून गेली. मीनाक्षी स्वतःच्या हुशारी वर गालातल्या गालात हसत होती. राधा कडून घरातली सगळी कामे करून घ्यायची आणि आपण नुसतं बसून राहायचं अशी आयडिया तिनेच सुलोचना ताईंना दिली होती. त्या दोघींना वाटले की कामांना कंटाळून ती स्वतःच भांडून निघून जाईल.
राधाने सिंकमध्ये घासायला ठेवलेली भांडी पाहिली. सिंक मध्ये भांड्यांचा गराडा पडलेला होता. सकाळपासून भांडी घासली गेली नसावीत ह्याचा अंदाज येतच होता. आधी घरी तिने कामे तर केलेली होती पण कधी हे काम तर कधी ते काम. एकदमच इतके सगळे काम ते ही एकामागून एक करायची सवय नव्हतीच तिला. पण तरीही तिने कंबर कसली.
कारण सासूबाईंनी तिला काम सांगितले ह्या गोष्टीचा तिला मनापासून आनंद झाला होता. कामाच्या निमित्ताने का होईना आत्याने तिला सून मानले ही तिच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती. तिने पटापट भांडी घासायला सुरुवात केली. आणि बघता बघता भांडी घासून झाली सुद्धा. मग स्वयंपाकाचं सुद्धा तसचं.
आत्याचे किचन राधासाठी अनोळखी नव्हते. अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आत्याकडे यायची. म्हणून कोणतं साहित्य आणि कुठली भांडी कुठे ठेवलेली आहे ह्याची कल्पना तिला होतीच. चांगल्या मूड मध्ये स्वयंपाक केल्याने तो सुद्धा लवकरच झाला. राधाने झालेला स्वयंपाक छानपैकी टेबल वर सजवला. तेवढ्यात तिथे केशवराव आले. केशवराव राधाला म्हणाले.
” वा राधाबाई…आज स्वयंपाक बनवलाय वाटतं…”
” हो…म्हणजे प्रयत्न केलाय फक्त…कसा बनलाय काय माहित…?” राधा म्हणाली.
” तू मनापासून प्रयत्न केलाय म्हणजे चांगलाच झाला असेल…” केशवराव म्हणाले.” पण इतक्या लवकर घरातील कामांना सुरुवात करायची काय गरज होती…हे तर तुमचे एकमेकांना जाणून घ्यायचे दिवस आहेत…” केशवराव म्हणाले.
” मला आवडतं म्हणून…” राधा म्हणाली.
तशा सुलोचना ताई राधाकडे पाहतच बसल्या. त्या दिवशीचा स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता. माधव आणि केशवराव ह्यांनी राधाची खूप स्तुती केली. तसा मीनाक्षीचा जळफळाट झाला. सुलोचना ताईंना सुद्धा राधा च्या हातचे जेवण आवडले होते. पण त्यांचा अहंकार त्यांना ते कबूल करू देत नव्हता.
सगळ्यांचं जेवण झाल्यावर राधाने भांडी घासली, स्वयंपाक घर आवरून ठेवले आणि झोपायला तिच्या रूम मध्ये निघून आली. राघव बेडवर झोपलेला होता. म्हणजे तो फक्त झोपायचे नाटक करत होता. तसा तो जागीच होता. राधाने त्याला बेडवर झोपलेले पाहिले आणि तिच्या मनात हुश्श झाले.
हा झोपलेला आहे म्हणजे त्याच्यासमोर एकाच खोलीत वावरताना अवघडलेपणा जाणवणार नाही. असे म्हणून तिने वॉशरूम मध्ये जाऊन कपडे बदलले आणि झाली फरशीवर चादर आणि उशी टाकून झोपली. दिवसभरच्या कामाने आणि प्रवासाने थकलेल्या राधाला लगेच झोपसुद्धा लागली. राघव मात्र विचार करत बसला होता.
राधाच्या वागण्यातून तिच्या मनाचा काही थांगपत्ताच लागत नव्हता. तिने हे लग्न स्वीकारलंय की नाही ते त्याला कळतच नव्हते. आणि क्षणात त्याच्या मनात विचार आला की राधाच्या मनात धीरज बद्दल काही भावना असतील का. हा विचार येऊन त्याचे मन चल बीचल झाले. आणि त्याची झोपच उडाली.
शेवटी मध्यरात्रीच्या सुमारास त्याला झोप लागली. सकाळी राधाला उठायला जरा उशीरच झाला होता. राघवसुद्धा अजूनही झोपलेला होता. राधा आवरून घाई घाईने खाली गेली. सुलोचना ताईंनी रागानेच तिच्याकडे पाहिले. मीनाक्षी ने तिला पाहिले आणि म्हणाली.
” काय जाऊबाई…सकाळी उठायची सवय नाही वाटतं…की जाणूनबुजून झोपली होतीस…?”
” तसं नाही वहिनी…म्हणजे ताई…आज जरा उशीरच झाला मला…” राधा गोंधळून म्हणाली. माधव च्या बायकोला आधी ती वहिनी म्हणायची पण आता नेमकं जय म्हणावं हे सुचत नसल्याने तिचा गोंधळ उडाला होता. मीनाक्षी तिला म्हणाली.
” या आता…चहाची वाट पाहत आहेत आई…” मीनाक्षी म्हणाली.
आणि राधा किचनमध्ये गेली. राधाने आधी घर झाडून काढले, आधी चहा, मग नाश्ता मग त्याची भांडी घासणे, मग स्वयंपाकाची सुरुवात केली. इतक्या वेळात सुलोचना ताई आणि मीनाक्षी ने किचन मध्ये येऊन सुद्धा पाहिले नव्हते. इतक्या जणांचा स्वयंपाक एकटीने बनवणे राधाला जरा अवघड जात होते. पण त्याला आता काही इलाज नव्हता.
सुलोचना ताईंना राधाला त्रास देण्याचा तोच एक उपाय चांगला वाटत होता. हे असे अनेक दिवसांपासून सुरूच होते. घरातील पुरुषमंडळी बाहेरच्या कामात राहायचे. त्यामुळे घरात नेमकं काय चाललंय ह्यांच्याकडे त्यांचे लक्षच राहत नव्हते. राघव ची मनापासून इच्छा असायची की राधाने आपल्याशी बोलावे, आपल्याला वेळ द्यावा. पण राधा मात्र रात्री उशिरा खोलीत यायची आणि आली की लगेच झोपी जायची.
साधारण महिनाभर हे असेच सुरू होते. दोघा नवरा बायकोने काही हौसमौज किंवा सोबत वेळ घालवणे जा प्रकारचं माहिती नव्हता जणू. राधाला घरकामातून वेळ मिळेना आणि राघव सुद्धा त्याच्या नवीन बिझिनेसची रूपरेषा ठरवत होता. अशातच एके दिवशी बाहेर कसला तरी मोठ्याने झालेला आवाजाने सगळे जण बाहेर गेले.
बाहेर पाहतात तर काय. धीरज शनायाला घेऊन घरी आला होता. आणि धीरजची आई शनायाला घरात घ्यायला नकार देत होती. राधाचे लक्ष धीरजकडे गेले आणि तिच्या चेहऱ्यावर तीव्र संताप दिसून आला. ती लगेच घरात आली. धीरजला पाहून त्याला एक कानाखाली वाजवायची जोरदार इच्छा होत होती तिची. पण आपण सासरी आहोत ही मर्यादा तिला गप्प बसू देत नव्हती.
तिकडे सगळे जण मात्र धीरजच्या घराबाहेर उभी राहून त्यांची बोलणी ऐकत होते. धीरजची आई मोठमोठ्याने ओरडत होती.
” मी हिला माझ्या घरात अजिबात पाय ठेवू देणार नाही…”
” अगं आई…असे काय करत आहेस…सगळे बघत आहेत ग…आपण आतमध्ये बसून बोलुयात ना…” धीरज गयावया करत म्हणाला.
” सगळे पाहत आहेत तर पाहू दे…ह्या सगळ्यांच्याच समोर तू आम्हाला मान खाली घालायला लावलीस ना…हिच्या नादाला लागून असा वागलास ना तू…अरे कोणत्या जन्मीच्या पापाची शिक्षा म्हणून तू असं वागलास रे आमच्याशी…” धीरजची आई त्याला म्हणत होती.
” आई…मी तुला सगळं समजावून सांगतो बघ…पण इथे बाहेर नाही…आतमध्ये चल ना…” धीरजने पुन्हा एकदा आईला समजावण्याचा प्रयत्न केला.
” नाही म्हणजे नाही…ह्या अवदसेला मी माझ्या घरात अजिबात घेणार नाही…आणि हिला लग्नच करायचं होतं तुझ्याशी तर आधी का नकार दिला…मला हिचा चेहरा सुद्धा पाहायचा नाहीये…हिला जायला सांग इथून…” धीरज ची आई ओरडुन म्हणत होती. आजूबाजूची सगळी लोक बाहेर उभे राहून त्यांच्याकडे पाहत होती. इतक्यात शनाया धीरजच्या आईला म्हणाली.
” ओ मदर इन लॉ…काय लावलय तुम्ही हे…मी ऐकून घेत आहे म्हणून तुम्ही माझ्या फार डोक्यात जाऊ नका बरं…आणि घरात पाय नाही ठेवू देणार म्हणजे काय…हे घर धीरज चे आहे म्हणजे माझे सुद्धा आहेच…आज ना उद्या मीच या घराची मालकीण होणार आहे…तुम्ही सरळ मार्गाने मला येऊ देणार नाही तर मी कायदेशीर पद्धतीने येईल…म्हणून म्हणतेय बाजूला व्हा आणि मला घरात जाऊ द्या…बाहेर खूप उन आहे…” असं म्हणत धीरजच्या आईला हाताने बाजूला करत शनाया घरात गेली सुद्धा.
धीरज, त्याचे आई बाबा, सुलोचना ताई, मीनाक्षी, माधव, केशवराव, राघव, आणि सगळेच शेजारी हे नुसते बघतच राहिले होते. धीरज ला तर काय बोलू आणि काय नको ते सुचतच नव्हते. शनाया आईशी डायरेक्ट अशी बोलेल असे धीरज ला स्वप्नात देखील वाटले नव्हते. आपण गावात येऊन चूक तर नाही ना केली हा विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला. तो काहीही न बोलता शनायाची बॅग घेऊन घरात गेला.
घरात जाऊन तो शनायाला म्हणाला.
” ही काय पद्धत झाली शनाया…माझ्या आईशी असे वागण्याची हिम्मत तरी कशी झाली तुझी…”
” तिला माझं वागणं दिसलं…पण सगळ्या गावातल्या लोकांच्या समोर त्या माझ्याशी कशा वागत होत्या आणि कशा बोलत होत्या ते नाही का दिसलं तुला…?” शनाया म्हणाली.
” अगं ती आई आहे…थोड्या वेळ बोलली असती नी मग आपोआप घरात घेतलं असतं तिने…” धीरज म्हणाला.
” अन् तोवर माझा जो अपमान केला असता त्याचं काय…?” शनाया म्हणाली.
‘ हे बघ…तू खूप वाईट वागली आहेस आईशी… आत्ताच्या आत्ता जाऊन तिला सॉरी म्हण…”
” मी नाही म्हणणार…मी काहीच चुकीची वागले नाही…माफी मागायची असेल तर त्यांनीच माझी मागावी…नाहीतर आपण उद्याच्या उद्या इथून निघून जाऊ…” शनाया म्हणाली.
आता मात्र धीरजचा नाईलाज झाला. शनाया आईची माफी मागायला तयार नव्हतीच. त्याने विचार केला होता की झाल्या घटनेला महिना पूर्ण झाला म्हणजे झालेल्या प्रसंगाची तीव्रता आणि आई वडिलांची नाराजी कमी झालेली असेल. शिवाय राधाचे लग्न राघवशी लागले हे देखील त्याला समजले होतेच. म्हणून त्या दिशेने सुद्धा अती निश्चिंत झाला होताच.
आई बाबांना शनायाशी लग्न केल्याचे फायदे समजावून सांगेल म्हणजे आया बाबा सुद्धा काही बोलणार नाहीत. उलट आई बाबांना आपल्यावर गर्वच वाटेल असे वाटून धीरज स्वतःवरच खुश झाला होता. पण आईने तर काही ऐकून घेण्याची तयारी दर्शवली नाही. त्यातच शनाया आईशी असे वागली. आता आईला समजावणे त्याच्यासाठी कठीण झाले होते.
मग त्याने बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने बाबांना सगळे काही समजावून सांगितले. बाबांना त्याची कृती अजिबात पटली नव्हती. पण तरीही त्यांनी त्याला जास्त विरोध दर्शवला नाही. जे काही झालं ते स्विकारण्या वाचून त्यांच्याकडे दुसरं गत्यंतर नव्हतंच मुळी.
मग धीरजच्या बाबांनीच धीरजच्या वतीने त्याच्या आईला समजावून सांगितलं. आईच्या पुढे सुद्धा दुसरा काही पर्याय शिल्लक नव्हताच. धीरज त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग आई बाबांनी सुद्धा मोठ्या मनाने धीरज आणि शनायाचे लग्न स्वीकारले.
शनायाला खरंतर या गावात येऊन राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण धीरजने खूप वेळा आग्रह केल्यावर आठ दिवसांसाठी ती या गावी आली होती. पण यामागे तिचाही एक उद्देश होताच. तिला राधाला पाहायचे होते. जिच्यासाठी धीरज तिला विसरायला निघाला होता ती नेमकी होती तरी कोण हे तिला भेटून पाहायचे होते.
इकडे धीरजच्या परत येण्याने राधा ची अस्वस्थता वाढतच चालली होती. पण राघव ने तिला समजावले. धीरज चा जास्त विचार करायचा नाही म्हणून. पण काहीही झाले तरी धीरजच्या येण्याने नात्यांमधील हा गुंता वाढतच जाणार होता.
क्रमशः
धीरज च्या परत येण्याचा उद्देश काही वेगळा असेल का…? राधा आणि राघवच्या आयुष्यात धीरज येऊन काही गोंधळ निर्माण करेल का…? ह्या गोष्टीचा कुणी गैरफायदा तर नाही ना घेणार…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचायला विसरु नका.
Next part
Nice story’but next part