घ’टस्फो’टाच नाव ऐकून राधा एकदमच सैरभैर झाली. ती तिच्या बाबांना म्हणाली.
” बाबा…हे काय बोलताय तुम्ही…? घ’टस्फो’ट…?”
” होय घ’टस्फो’ट…?” बाबा म्हणाले.
” पण बाबा…?” राधाला काहीतरी म्हणायचे होते.
” पण बिन काही नाही…तू आतमध्ये जा…” बाबा म्हणाले.
तरीही राधा तिथेच आ वासून उभी होती. बाबांना काय बोलू ते तिला कळत नव्हते. मग तिचे बाबाच तिला म्हणाले.
” तू आतमध्ये जा राधा…” मग तिच्या आईकडे पाहून म्हणाले.” शालिनी हिला आतमध्ये घेऊन जा…”
आपल्या नवऱ्याला इतकं रागात बघून शालिनीमामी सुद्धा राधाला घेऊन आतमध्ये निघून गेल्या.
राधा आतमध्ये गेल्यावर सुलोचनाताई राधाच्या वडिलांना म्हणाल्या.
” मला माहिती आहे की कालच्या प्रकाराने तुला खूप राग आलाय…पण त्याच्यावर हा उपाय आहे का…? घ’टस्फो’ट हा खूप मोठा निर्णय असतो…आणि आपल्या मुलांचा संसार तर आताच सुरू झालाय…इतकी लवकर असा विचार सुद्धा नको करुस…मी तुझी माफी मागते…माझ्या कडून पुन्हा अशी चूक होणार नाही…”
” कशावरून…? कशावरून चूक होणार नाही…? आज दुसऱ्याचं ऐकून तू माझ्या मुलीला घरातून हाकलून लावलेस…वेळीच सत्य बाहेर आलं म्हणून बरं…पण पुढे जर पुन्हा असेच काहीतरी झाले आणि तेव्हा सत्य बाहेर आलच नाही तर काय…?आज मी आहे म्हणून राधाला हक्काचं घर तरी आहे यायला…पण मी उद्या नसलो तर…? काय होईल माझ्या राधाचं..?” राधाचे बाबा राधाच्या दोन्ही काका काकूंकडे पाहत म्हणाले. त्यासरशी त्यांच्या माना खाली गेल्या.
” असा नको बोलूस…परमेश्वर तुला खूप आयुष्य देवो…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” हे ऐकायला कितीही कटू असले तरीही ह्याची शक्यता नाकारता येत नाही आक्का…इतक्या कमी वयात इतकं मोठं दुःख पाहिलेल्या माझ्या राधाला मी आणखी दुःख भोगायला पुन्हा तिथे नाही पाठवणार…माझ्याच्याने राधाच्या बाबतीत आधी बऱ्याच चुका झाल्या…पण यापुढे नाहीत होणार…माझ्या मुलीच्या आयुष्याशी आता मी कोणालाच नाही खेळू देणार…” राधाचे वडील म्हणाले.
” पुन्हा असे कधीच होणार नाही…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” मी ती वेळही येऊ देणार नाही…माझं ठरलंय…आणि मला वाटतं आता तुम्हीही समजून घ्यायला हवं…आता हे नातं टिकवण्याची धडपड व्यर्थ आहे…” राधाचे वडील म्हणाले.
” असे नका म्हणून मामा…माझं खूप चुकलं…ह्यात आईची खरंच काही चुकी नव्हती…हे सगळं माझ्यामुळे झालंय…मी तुमची माफी मागते…हवं तर हात जोडते, पाया पडते पण राधाला आमच्या सोबत पाठवा…” मीनाक्षी हात जोडत म्हणाली.
” नाही पोरी…जे काही झालं त्यात नियतीचा इशारा होता…ते झालं नसतं तर माझी आक्का राधा सोबत अशीही वागू शकते ते मला कळलं नसतं…म्हणून तू सुद्धा आता फारसा विचार करू नकोस…जे झालं ते विसरून माधव सोबत सुखाने संसार कर…” राधाचे बाबा म्हणाले.
” पण मामा…?” माधव म्हणाला.
” पण बिन काही नाही माधवा…माझा निर्णय झालाय…? आणि आता ह्यात बदल होणे नाही…तुम्ही आलाच आहात तर दुपारचं जेवण करून जा…येतो मी…” राधाचे वडील म्हणाले.
असे म्हणून राधाचे बाबा आपल्या खोलीत निघून गेले. सुलोचनाताईंनी त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. राधाच्या काकूंनी सगळ्यांना चहा घेण्याचा आग्रह केला आणि शेवटी चहा घेऊन सगळेच घरी निघून आले. राधाच्या काका काकूंना आता टेंशन यायला लागले होते.
राधाचे वडील वेगळं निघण्याचा विचार करतील असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. ते वेगळे निघाले तर ह्यात तिच्या दोन्ही काकांचा तोटाच होता. राधाच्या मोठ्या काकांना एक मुलगा अन् एक मुलगी होते आणि लहान काकाला सुद्धा एक मुलगा अन् एक मुलगी होते. राधाच्या बाबांना मात्र दोन्ही मुलीच. शिवाय सगळं कारभार एकत्रच होता.
त्यामुळे साहजिकच सगळ्यांना वाटायचे की कावेरी आणि राधा चे लग्न झाले की राधाच्या बाबांच्या हिस्स्याचे सगळेच आपसूकच दोन्ही काकांच्या मुलांना मिळेल. पण जर काका आपला हिस्सा घेऊन वेगळे झाले तर पुढे जाऊन तो हिस्सा त्यांच्या दोन्ही मुलींना मिळेल. आपल्या अशा वागण्याने आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे आता त्यांच्या लक्षात आले होते.
राघव कितीतरी वेळेपासून एकाच जागी बसून ह्या सगळ्यांच्या परत येण्याची वाट पाहत होता. ह्यांना परत आलेलं बघून राघव ने आशेने ह्यांच्याकडे पाहिले. त्याला वाटले की राधा आली असेल. पण राधा आलेली नाही हे पाहून तो पुन्हा निराश झाला.
राघवशी नेमके काय बोलावे ते सुलोचना ताईंना कळतच नव्हते. म्हणून त्या आपल्या खोलीत जाऊन बसल्या. माधव मीनाक्षी सोबत बोलत नव्हता म्हणून मीनाक्षी सुद्धा गपचुप किचन मध्ये जाऊन काम करू लागली. केशवराव सुलोचना ताईंजवळ आले आणि म्हणाले.
” काय झालं…काय म्हणाले राधाचे बाबा…?”
” अडून बसलाय तो…राधाला परत पाठवणार नाही असे म्हणतोय…काय तर म्हणे घ’टस्फो’ट हवाय त्यांना…” सुलोचना ताई म्हणाल्या.
” काय…?” केशवराव अक्षरशः उडालेच.
” हो ना…काय म्हणावं या आडमुठेपणाला…मी जाऊन माफी मागितली ना तिची…तरीही पाठवायला तयार नाही…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” तुला हा आडमुठेपणा वाटतोय सुलोचना…अजूनही तुला तुझ्या वागण्याचं गांभीर्य कळलेलं दिसत नाहीये…नाहीतर त्याचा स्वाभिमान तुला आडमुठेपणा वाटला नसता…” केशवराव म्हणाले.
” म्हणजे…मी आणखी काय करायला हवे होते असे तुम्हाला वाटते…?” सुलोचना ताईंनी विचारले.
” तुझ्याकडून त्यांचा जो अपमान झाला, जो त्रास झाला, जी मानहानि झाली त्याची तीव्रता तू मागितलेल्या माफीच्या कितीतरी पट जास्त होती…तू फक्त उपकार केल्यासारखी माफी मागून आल्याने त्यांचं समाधान होणार आहे का ? मुळात इतकी मोठी जखम क्षणात भरणे शक्य आहे का…?” केशवराव म्हणाले.
” मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतं…?” सुलोचना ताईंनी विचारले.
” आता तू विशेष काहीही करू शकत नाहीस…कारण तुझ्या हातून चूक झालेली आहे…आणि तुला माफ करणं वा न करणं सर्वस्वी तुझ्या भावाच्या हातात आहे…तू फक्त एवढंच करू शकतेस की आधी केलेल्या चुकीतून बोध घेऊन पुन्हा तशी चूक तुझ्याकडून घडू देऊ नकोस…आपल्या छोट्याश्या चुकीने किंवा चुकीच्या निर्णयाने आपल्या मुलाच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो…
म्हणून आपल्याला एकच चूक पुन्हा पुन्हा करणे टाळायला हवे…किंवा काही निर्णय हे आपल्या मुलांवरच सोडवलेले बरे…आता आपण फक्त वाटच बघू शकतो…सगळं काही चांगली होण्याची…ही वेळ आणि ही परिस्थिती जरा नाजूक आहे…आणि अशात आपल्याला चूक करण्याची जराही मुभा नाही बघ…” केशवराव समजावणीच्या सुरात म्हणाले.
केशवरावांचे बोलणे ऐकून सुलोचना ताई विचारातच पडल्या. केशवराव अगदीच योग्य बोलत होते. कावेरीच्या लग्नापासून त्या स्वतःच्या भावाशी खूपच जास्त विचित्र अन् वाईट वागली होत्या. पण लहान भाऊ असल्याने भावाने मनावर घेतले नाही. मग राधाला सुद्धा स्वीकारले नाही. अन् राधाबद्दल मन बडकात असतानाच शनाया , धीरज आणि मीनाक्षी च ऐकून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते.
एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिच्या वडीलांसमोर तिला हाताला धरून बाहेर काढले होते. शिवाय वरून जे सुनावले ते वेगळेच. त्यामुळे राधाच्या बाबांना झालेल्या दुःखाची कल्पना करावी तितकी थोडीच होती. या सगळ्यांवर फक्त वेळ हेच औषध होते. वेळेबरोबरच दुःखाची तीव्रता कमी झाली असती आणि राधाच्या परतीची शक्यता वाढली असती.
इकडे राधा तिच्या आईला म्हणाली.
” आई…मला घ’टस्फो’ट नाही घ्यायचा…”
” त्यांनी इतकं सगळं केल्यावरही तुझी तीच इच्छा आहे का…? तू त्यांना माफ करू शकतेस का…?” राधाच्या आईने विचारले.
” वाईट फक्त राघवच्या घरचे वागले आहेत…पण राघव खूप चांगला आहे आई…राघव साठी मी सगळं काही विसरू शकते…” राधा म्हणाली.
” अगं पण संसार करायचा म्हटलं की सगळ्याच गोष्टी पाहायच्या असतात…फक्त नवरा अन् बायको एवढंच नसतं…घरचे सुद्धा चांगले असावे लागतात…” राधाची आई म्हणाली.
” आई…राघव व्यतिरिक्त मामंजी, माधवदादा सुद्धा खूप चांगले आहेत ग…आणि राघव घरी नव्हता म्हणून हे सगळं झालं…ती असता तर असं काहीच होऊ दिलं नसतं…” राधा म्हणाली.
” तू बोलत आहेस ते सुद्धा पटतंय बघ मला…पण तुझ्या बाबांचा राग सुद्धा चुकीचा नाही…” राधाची आई म्हणाली.
” राग वगैरे सगळं ठीक आहे आई… पण मला राघव पासून घटस्फोट नकोय…माझं प्रेम आहे आई राघव वर…” राधा म्हणाली.
आता मात्र तिच्या आईने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. राघव वर असणाऱ्या प्रेमापायी ती सुलू आत्याने केलेला अपमान विसरायला तयार होती म्हणजेच तिचं राघववर असणारं प्रेम निश्चितच तिच्या स्वाभिमाना पेक्षा मोठं होतं. आणि ते असणं ह्यात काही नवल नव्हतं. आपल्या नवर्यावर प्रेम करणं अजिबात चुकीचं नव्हतं. शिवाय राघव खूप चांगला मुलगा होता. राधाचा आणि त्याचा घटस्फोट व्हावा असे त्यांना अजिबात वाटत नव्हते. त्यांनी वेळ पाहून राधाच्या बाबांना समजावून सांगायचे ठरवले.
इकडे राघव काहीही न जेवता त्याच्या रूम मधल्या बाल्कनीत बसलेला होता. तेव्हा माधव त्याच्याजवळ आला आणि म्हणाला.
” राघव…आज तू जेवायला खाली आला नाहीस…?”
” इच्छा नव्हती…” राघव म्हणाला.
” इतक्या लवकर हार सुद्धा मानलीस तू…?” माधव म्हणाला.
” म्हणजे…? मला काही कळलं नाही दादा…” राघवने विचारले.
” अरे स्वतःच्या प्रेमासाठी लढ…अशी हार मानू नकोस…”माधव म्हणाला.
” पण मी काय करू दादा ?…मला कळत नाहीये…” राघव ने विचारले.
” तू नेमकं काय करायला हवं हे तर तूच चांगलं ठरवू शकतोस…पण माझ्या भावाने प्रेमाची लढाई जिंकावी ह्यासाठी त्याचा हा भाऊ नेहमीच त्याच्या पाठीशी आहे…” माधव म्हणाला.
” खरंच दादा…” असे म्हणून राघवने माधवला मिठी मारली.
त्याची मिठी सोडवत माधव म्हणाला.
” मग ही लढाई जिंकण्यासाठी ताकद नको का यायला…?”
” म्हणजे…?” राघवने पुन्हा विचारले.
” अरे म्हणजे जेवायला चल आता…” माधव म्हणाला.
आणि दोघेही भाऊ दिलखुलास हसले. अनेक जेवायला खाली निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच राघवने एका लहान बॅगेत स्वतःचे दोन ड्रेस ठेवले आणि गरजेच्या वस्तू घेऊन बाहेर जायला निघाला. त्याला तसे जाताना पाहून केशवरावांनी त्याला विचारले.
” राघव…इतक्या सकाळी बॅग घेऊन कुठे चालला आहेस…?”
” लढाईवर…” असे म्हणून त्याने माधवकडे बघून छान स्माइल केली.
” लढाई…? कुठली लढाई..?” सुलोचनाताईंनी विचारले.
” प्रेमाची लढाई आई…आणि ही लढाई जिंकूनच परतेन…” असे म्हणून राघव ने आई बाबांचा आशिर्वाद घेतला आणि निघाला.
क्रमशः
राघवच्या मनात नेमके काय असेल…? ही प्रेमाची लढाई तो जिंकेल का…? राधाचे वडील आता नेमके काय करतील…?” जाऊन घेण्यातही पुढील भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकर.
खुप छान
धन्यवाद 😊🙏