शेवटी मंदारने एके ठिकाणी गाडी थांबवली आणि म्हणाला.
” हे बघ…किती सुंदर वातावरण आहे…आणि तुझी सोबत असल्याने हे सगळं आणखीनच सुंदर वाटत आहे…”
एवढे बोलून तो तिच्या जवळ गेला. आणि हलकेच तिच्या मानेवर किस केला. आणि ती घाबरून लांब पळाली. इतक्यात तो म्हणाला.
” अगं यात घाबरण्या सारखं काय आहे…की तुझा होणारा नवरा आहे…आणि माझा अधिकार आहे तुझ्यावर…”
” मला फक्त घरी जायचं आहे…मला घरी सोडा…” मनस्वी म्हणाली.
” काही नाही होत…एवढं तर चालतच ना…” मंदार म्हणाला.
” ते सगळं लग्न झाल्यावर…आता नाही…आणि मला घरी जायचं आहे…तुम्ही प्लिज मला घरी सोडा…” मनस्वी म्हणाली.
मनस्वी चे बोलणे ऐकुन मंदारला राग आला. पण तिने घरी जाण्याचा हट्ट केल्यावर त्याचाही नाईलाज झाला. त्याने तिला गाडीवरून घरी सोडले. पण तिथून मात्र तो रागानेच तिच्याशी काहीही न बोलता निघून गेला. मनस्वी मनातून खूप घाबरली होती. तिला मंदारचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते. पण घरी सुद्धा ती काहीच सांगू शकली नाही.
मंदार दोन दिवस तिच्याशी बोललाच नाही. पण नंतर मात्र त्याने तिला फोन करायला सुरुवात केली. पण आता मात्र तो सतत तिला फोन करून तू कुठे आहेस, काय करतेस ह्याची चौकशी करायचा. ती कुठे जातेय ?, कुणाला भेटते ? ह्यावर पाळत ठेवायचा. तरी कधी तिला व्हिडिओ कॉल करून खात्री करून घ्यायचा. मनस्वी मात्र तो आपला होणारा नवरा आहे म्हणून सगळंच सहन करायची.
एके दिवशी मनस्वी च्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी होती. आणि तिथे मनस्वीला आमंत्रित केलं होतं. मनस्वी सुद्धा छान तयार होऊन तिथे गेली होती. पार्टीत सगळेच खूप एन्जॉय करत होते. मनस्वीच्या मैत्रिणींसोबत तिचे एक दोन मित्र सुद्धा पार्टीला आलेले होते. मनस्वी चे लग्न ठरले म्हणून सगळेच तिचे अभिनंदन करत होते आणि तिला स्पेशल ट्रीटमेंट सुद्धा देत होते.
इतक्यात तिला मंदारचा फोन आला. तिने कॉल उचलला तेव्हा त्याने तिला विचारले की ती कुठे आहे. तेव्हा तिने सांगितले की तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी आहे तिथे आलेली आहे. हे ऐकून मंदार आधी तर तिच्यावर जवळ जवळ ओरडलाच. त्याला सांगून का नाही आली म्हणून. पण तिने सांगितले की यायचं वेळेवर ठरलं तेव्हा मात्र तो थोडा शांत झाला. आणि पार्टी कुठे आहे वगैरे एक दोन प्रश्न विचारून त्याने फोन ठेवून दिला.
त्यानंतर बऱ्याच दिवसांनी सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटल्याने सगळ्यांच्या छान गप्पा सुरू होत्या. आणि गप्पा करताना वेळ कसा निघून गेला हे त्यांना कळलंच नाही. तेव्हढ्यात तिचे लक्ष तिच्या फोनवर गेले. मंदारचे दोन मिस्ड कॉल होते. तिने लगेच त्याला फोन केला. तेव्हा तो खूपच चिडलेला होता. ती त्याच्याशी बोलली तेव्हा तो मोठ्याने च तिला म्हणाला.
” तू बाहेर ये…मला तुझ्याशी बोलायचं आहे…”
” पण तुम्ही कुठे आहात…?” मनस्वी ने विचारले.
” मी बाहेर उभा आहे…तू लगेच ये…” मंदार म्हणाला.
आणि मनस्वी ने बाल्कनी तून बाहेर बघितले तेव्हा खरोखर मंदार बाहेर उभा होता. ती लगेच बाहेर आली आणि त्याला म्हणाली.
” तुम्ही असे अचानक बाहेर…काही काम होतं का इकडे…?”
” तुझं काय चाललंय ते पाहायला आलो होतो..इतकंच सगळं करायचं होतं तर त्या दिवशी माझ्यासमोर का साधी भोळी बनत होतीस…?” मंदार म्हणाला.
मंदारचे बोलणे ऐकून मनस्वीला धक्काच बसला. त्याच्या मनात हे सगळं सुरू आहे ह्याची तिला कल्पनाच नव्हती. ती म्हणाली.
” अहो…हे काय बोलत आहात तुम्ही…मी तर माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला आले आहे इथे…” मनस्वी भीतभीतच म्हणाली.
” ते तर दिसतंय…पार्टी काय करताय… नाच गाणं काय सुरू आहे…आणि सोबतीला मुलं पण आहेत…” मंदार म्हणाला.
” ते फक्त क्लास मेट्स आहेत…” मनस्वी पुन्हा भित म्हणाली.
” ते सगळं कळतं मला…आम्ही पण होतोच की कॉलेजला…पण त्या दिवशी तर माझ्यासोबत होती तेव्हा खूपच सती सावित्री असण्याच नाटक करत होतीस…आणि आज रात्रीचे आठ वाजले तरीही बाहेर मित्र मैत्रिणींसोबत मजा मारत आहेस…आता लाज नाही वाटत का तुला…” मंदार रागात म्हणाला.
” तुम्ही काय बोलताय…तोंड सांभाळून बोला…” आतापर्यंत भित असलेली मनस्वी रागाने म्हणाली.
मनस्वी चे बोलणे ऐकुन मंदार म्हणाला.
” माझ्याशी उंच आवाजात बोलतेस काय…थांब तुला दाखवतोच…”
आणि तो तिच्यावर हात उचलणार इतक्यातच त्याचा हात कुणीतरी वरच्यावर पकडला. मंदारने रागातच तिकडे पाहिले तर मनस्वीचे बाबा होते. हे मनस्वी ला घ्यायला येथे आलेले होते. त्यांना पाहून मंदार ने आपला हात मागे घेतला.
” बाबा…तुम्ही इथे…?”
” हो…मी इथे…तुम्हाला काय वाटलं…माझ्या मुलीशी तुम्ही कसेही वागाल तरीही तुम्हाला कोणी च अडवणार नाही का…?”
” तसं नाही बाबा…ही मनस्वी इथे काय करत होती तुम्हाला नाही माहित…इथे मुलांसोबत पार्टी करत होती ही…” मंदार म्हणाला.
” माझी मुलगी काय करते आणि काय नाही मला चांगलच माहिती आहे…आणि तिला इथे यायला मीच परवानगी दिली होती…आणि तिला घ्यायला यायला मलाच उशीर झाला म्हणून ती इथे आहे…पण बरं झालं की इथे वेळेवर पोहोचलो…नाहीतर तुमचा खरा चेहरा मला कधी दिसलाच नसता…” मनस्वीचे वडील म्हणाले.
” तुम्ही हिला बोलायचं सोडून मला का बोलत आहात ?…मला हिचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही…आणि ही जर अशीच वागत राहिली तर की हिच्याशी लग्न करणार नाही…” मंदार जरा रागातच म्हणाला.
” आणि तुम्हाला काय वाटतं…इतकं सगळं ऐकल्यावर मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावून देणार का…? तुमचं सगळं बोलणं मी ऐकलंय…आणि तुम्ही कसे आहात हे कळल्यावर सुद्धा मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावून देईल असे तुम्हाला वाटत असेल तर तो केवळ तुमचा गैरसमज आहे…माझी मुलगी मला भार नाही…पण जो व्यक्ती तिचा जरासुद्धा आदर करत नाही अशा व्यक्तीशी की तिचे लग्न अजिबातच लावून देणार नाही…” मनस्वी चे बाबा म्हणाले.
त्यांचे बोलणे ऐकून मंदार जरा वरमलाच. मग तो समजवणीच्या सुरात म्हणाला.
” हे काय बोलताय बाबा तुम्ही…एवढं जास्त काहीही झालेलं नाही आहे…तुम्ही अचानक हे लग्न मोडू नका…मला माझ्यापेक्षा जास्त काळजी तुमचा इभ्रतीची आहे…साखरपुडा झाल्यावर लग्न मोडल तर मनस्वीची बदनामी होईल…” मंदार म्हणाला.
” बदनामीच्या भीतीने मुलीचं लग्न अशा व्यक्तीसोबत नाही लावू शकतं जो तिचा आणि तिच्या सन्मानाचा आदर राखू शकतं नाही…त्यामुळे तुम्ही आमचा विचार करू नका आणि पुन्हा कधीच माझ्या मनस्विशी बोलायचा प्रयत्न करू नका…” मनस्वीचे वडील त्याला म्हणाले.
आणि तो रागातच तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर मनस्वीला खूप रडू आले. तेव्हा तिला सांभाळताना तिचे वडील म्हणाले…
” रडू नकोस बाळा…यात तुझी काहीच चूक नाही…”
” पण माझ्यामुळे हे लग्न मोडलं ना बाबा…आता तुमची खूप बदनामी होईल…” मनस्वी रडतच म्हणाली.
” अगं वेडाबाई…तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही…आणि माझ्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी मला जर थोडीफार बदनामी जरी सहन करावी लागली तरी मला त्याचा आनंदच होईल…जिथे माझ्या लेकीचा सन्मान केला जात नाही अशा घरी मी माझी मुलगी कधीच देणार नाही…मुलीला समजून घेणारा, सुखात ठेवणारा जोडीदार मिळावा हीच प्रत्येक बापाची इच्छा असते…आणि असा जोडीदार तुला जोवर मिळत नाही तोवर मी माझा शोध नक्कीच सुरू ठेवेन…” मनस्वीचे वडील तिला म्हणाले.
बाबांचे बोलणे ऐकून मनस्वीला खूप बरे वाटले. तिच्या मनावरील ओझे हलके झाले होते.
दुसऱ्या दिवशी मनस्वीच्या वडिलांनी मंदारच्या बाबांना फोन करून त्यांना लग्नासाठी नकार कळवला. पण त्यांच्या नकार कळवन्यामुळे समरचे वडील त्यांच्यावर नाराज झाले होते. तेव्हा समरने त्यांना सांगितले की मंदार चे आजवर चे मुलींसोबत वागणे चांगले नव्हते. त्याचे आधी सुद्धा एक लग्न तुटले होते.
आजवर समरने मंदार बद्दल बरेच काही ऐकले होते. पण त्याला वाटले होते की मंदार आता सुधारला असेल. आणि ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवावा म्हणून तो फार काही बोलला नाही. पण आता तो मनस्वीसोबत जसा वागला त्यावरून तो अजून हि तसाच आहे हे सगळ्यांना कळून चुकले होते. आणि सत्य जाणून घेतल्यावर त्यांना मनस्वी च्या वडिलांचा निर्णय अगदी योग्य वाटला. आणि समाजाची पर्वा न करता त्यांनी आपल्या मुलीच्या सन्मानाची पर्वा केली ह्याबद्दल त्यांचे कौतुक सुद्धा वाटले.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला फॉल्लो करायला विसरू नका.