मनोदीप उजळवणारी दिवाळी

गौरी एका लहान शहरात वाढलेली मुलगी. पाच महिन्यांपूर्वी साधना ताईंची सून बनून मुंबईला आली. मुंबईसारख्या शहरात राहून इथल्या चालीरीती शिकत होती. सर्वांशी जुळवून घेत होती. तिचा नवरा सर्वेश नोकरीनिमित्ताने सकाळीच घराबाहेर पडायचं आणि रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळत नसे. म्हणून साधनाताई स्वतः आवर्जून दोघांनाही रविवारी कुठेतरी बाहेर फिरायला पाठवत असे. … Read more

तू मला विसरून जा

“तुला किती दिवसांपासून सांगतेय प्रताप…अरे निदान आता तरी लग्न करून घे…चांगला 30 वर्षांचा झाला आहेस तू…” प्रतापची आई. “काय ग आई…आज सकाळी सकाळी तोच विषय पुन्हा…आपण नंतर बोलू ना यावर कधीतरी.” प्रताप आईला म्हणाला. “नंतर कधी बोलायचं… तुझ्यासोबतच्या सर्व मुलांची लग्न उरकली आहेत…आधी म्हणायचास आधी नोकरी लागू दे…आता तर चांगला साहेब झालास तू…मग काय हरकत … Read more

संपत्तीवर अधिकार कुणाचा ?

    चिंतामण काकांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. ते कालच हॉस्पिटल मधून घरी आले होते. चिंतामण काका एव्हाना बरेच थकलेले वाटत होते. तसे काका फक्त पंचावन्न वर्षांचे होते पण रमाकाकू गेल्यापासून त्यांच्या तब्येतीची जरा हेळसांड झाली.     त्यांना सुजय आणि सानिका अशी दोन मुले. दोघांचीही लग्न झालेली. सुजयचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र … Read more

हे काम फक्त बायकांचं आहे ?

       ” केदार, मी स्वयंपाक करतेय तोवर जरा बाळाला पाहशील का..?” पल्लवी ने किचनमधून केदार ला आवाज दिला.        ” मी जरा महत्त्वाच्या कामात आहे…आणि तसंही मुलांना सांभाळणे बायकांचं काम असतं…” केदार म्हणाला.        ” अरे पण मी कामातच आहे ना…हे एवढं झालं की घेतेय त्याला…बघ ना थोडा वेळ…” पल्लवी म्हणाली.        ” काय ग…एक … Read more

प्रेम नव्हे…ही तर विकृती

   ” तुला कितीदा सांगितलंय कीर्ती…असे कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलणे बरे नाही…बोलणे तर बोलणे…तू तर स्वतःची पूर्ण माहिती देऊन टाकते समोरच्याला…निदान बोलण्यापूर्वी थोडा तरी विचार करावा…” कीर्तीची आई कीर्तीला समजावत म्हणाली.    ” आई…तू पण ना…उगाच काळजी करतेस ग…आणि प्रत्येकाला संशयाच्या नजरेने बघणे काही बरे नाही…आणि की काय आता लहान आहे का…मला सर्व कळतं…सो यू … Read more

लक्ष्मी जेव्हा दुर्गा बनते

लक्ष्मीला उठायला आज थोडा उशीर झाला होता. तिची सासू उठली तरीही लक्ष्मी झोपलेलीच होती. हे पाहून तिच्या सासूचा पारा चढला. त्या हॉल मधून लक्ष्मीच्या नावाने  शिव्यांची लाखोली वाहत होत्या. सकाळी सकाळी देवाचे नामस्मरण करण्याच्या वयात त्या अगदी खालच्या थराला जाऊन शिव्या देत होत्या.      त्यांच्या आवाजाने लक्ष्मीची झोप उडाली. अजूनही तिचं डोकं ठणकत होतं. तिची … Read more

लग्नगाठ

रोहित एका चांगल्या सधन कुटुंबातील मुलगा. आई, वडील, आणि एक लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब. रोहित एक हुशार होता आणि तितकाच जबाबदार देखील. रोहित अभ्यासात हुशार होता. पण मितभाषी असल्याने त्याचे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. लहानपणापासून त्याची श्रद्धा ही फक्त एकच मैत्रीण होती. अगदी पहिल्या वर्गापासून दोघे सोबत होते. रोहित आणि श्रद्धा एकमेकांना फार जीव … Read more

मानलं तर जावा, जाणलं तर बहिणी

” तुमच्या घरच्यांना काही कळतं की नाही. जाऊबाईंची लायकी तरी आहे का कार्यकारिणीत सामील व्हायची. कधी घराच्या स्वयंपाकघरातून बाहेर तरी आल्या का त्या. साधं कुणासमोर काय बोलावं आणि कसं वागावं हे सुद्धा नाही कळत त्यांना. आणि म्हणे त्यांना शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करणार…” नंदिनी रागारागाने बोलत होती. ” तू शांत राहतेस का थोडावेळ. पप्पांनी काहीतरी … Read more

अशी घडवली अद्दल

कविता सातव्या वर्गात शिकणारी एक हुशार मुलगी होती. ती तिच्या आई, वडील व लहान भावासोबत एका छोट्याशा गावात राहायची. गाव शहरापासून वीस किलोमीटर च्या अंतरावर होत. कविता तशी हुशार होती पण तिला एक वाईट सवय होती. ती घरातील प्रत्येक लहानसहान गोष्ट बाहेर सर्वांना सांगायची. घरात नवीन काहीही आणले तरी सगळीकडे सांगत सुटायची. तिला कित्येकदा तिच्या … Read more

सोड तो अट्टाहास

जयाचे मागच्या वर्षीच लग्न झाले होते. लग्न अगदी थाटामाटात पार पडले होते. दोघांचे लव्ह मॅरेज होते. लग्नात ताई खूप खुश दिसत होती. पण तिच्या सासूला मात्र ती पसंत नव्हती. पण आपल्या मुलाच्या पसंती समोर त्या जास्त बोलल्या नाही. जयाच्या लग्नापासूनच तिच्या आणि तिच्या सासुमध्ये खटके उडायला लागले होते. सासूबाईंना तिच्या प्रत्येक कामामध्ये चूक दिसायची. जयाचे … Read more