नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग २ (अंतिम भाग )

” कधी सांगणार आहेस… तुझं लग्न झाल्यावर…अरे तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या घरच्यांना आपल्याबद्दल सगळं सांगितलं होतं…आता कोणत्या तोंडाने मी त्यांना सांगू की आदित्यच्या लग्नासाठी मुली पाहणं सुरू झाल्या आहेत म्हणून…कसं सांगू की आदित्य ने त्यांच्या बोलण्याला अजिबात सीरिअसली घेतलेलं नाही म्हणून…?” रेवती म्हणाली. ” अगं इतकी मोठी गोष्ट सुद्धा नाही बघ ही…आता फक्त सुरूच … Read more

नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग १

एके दिवशी अचानक आदित्यला फोन आला की त्याच्या वडिलांचा एक छोटासा ॲक्सिडेंट झालाय ताबडतोब हॉस्पिटलला या म्हणून. तो लगेच हॉस्पिटल मध्ये गेला. तिथे गेल्यावर कळले की त्याच्या वडिलांच्या हाताला थोडा मार लागलाय. डॉक्टरांनी हाताला आधीच मलमपट्टी केली होती. त्याचा मोठा भाऊ सुद्धा तिथे पोहचला होता. डॉक्टरांनी ह्याला काही औषधं लिहून दिली आणि लगेच आणायला सांगितली. … Read more

तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग ३ (अंतिम भाग)

” तू मला का टाळत आहेस…?” त्याने विचारले. ” मी कुठे टाळतेय तुला..?” स्नेहल त्याच्याकडे न बघता म्हणाली. ” मग माझ्याकडे बघून बोल ना…तू इथे माहेरी आली तेव्हापासून ती एकदाही मला स्वतःहून कॉल केला नाहीस…मी तीनदा तुला घ्यायला इथे आलो पण तू सोबत आली नाहीस…आणि आधी माझ्या शिवाय कुठेही एकटी न जाणारी तू आता मला … Read more

तुझ्या आयुष्यात माझी जागा काय? – भाग २

थोड्या वेळाने साकेत जेव्हा घरी आला तेव्हा त्याला घराला कुलूप दिसले. तेव्हा त्याने स्नेहलला कॉल केला. कॉल केल्यावर त्याला कळले की स्नेहलची तब्येत बरी नसल्याने तिला हॉस्पिटल मध्ये नेलय. साकेत सुद्धा थोड्याच वेळात हॉस्पिटल मध्ये पोहचला. तिथे तो स्नेहल ला भेटला आणि म्हणाला… ” तुला सांगितले होते ना मी आराम करायला…तू ना अजिबात ऐकत नाहीस…बघ … Read more

तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग १

“साकेत…आज मला बरं नाही…आज तू घरीच थांब ना…निदान आज आपल्या अथर्वला तरी सांभाळ…” स्नेहलने बाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या साकेतला दुरूनच आवाज दिला. ” काय ग तुझी नेहमीचीच कटकट आहे…आज आम्ही सगळे मित्र रिसॉर्ट वर फिरायला जाणार आहोत…मी नाही थांबू शकणार… एखादं औषध घे आणि आराम कर… अथर्व ला सुद्धा काही खाऊ घालून झोपवून दे…मी निघत … Read more

तू पण एक मुलगीच आहेस – भाग २ (अंतिम भाग )

” रागिणी…तू माझ्यासाठी साधारण साडी आणली हे मी समजू शकते…कारण कितीही झालं तरी आपण जावा आहोत…बहिणी नाही…पण मुलांच्या बाबतीत हा काय भेदभाव आहे ग…जाई आणि सिया साठी किती हलके कपडे आणलेस तू…माझ्या बाबतीत तू कशीही वागली तरी मी सहन करेन…पण इतक्या लहान मुलींच्या बाबतीत का अशी वागतेस तू…” साधना म्हणाली. ” मला वाटलं हे आवडतील … Read more

तू पण एक मुलगीच आहेस ना – भाग १

साधनाच्या सासुबाई आज त्यांच्या माहेराहून परतल्या होत्या. दरवर्षी त्या अगदी नियमाने वर्षातून पंधरा दिवस तरी माहेरी जायच्या. यंदाही गेल्या होत्या. आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी तिथून आपल्या नातवंडांना भरपूर खाऊ आणि भेटवस्तू आणल्या होत्या. त्यांच्या माहेराला सोनं चांगलं मिळतं असा लौकिक होता. म्हणून त्या येताना आपल्यापरीने चारही नातवंडांना काहीतरी सोन्याची वस्तू आणत. यंदाही चौघांसाठीही त्यांनी छान … Read more

लाचारी अशीही असते – भाग २ (अंतिम भाग)

” काय ग…काय झाले…तुझ्या डोळ्यात पाणी का आलं..?” सुप्रिया ने विचारले. ” काही नाही…पण खूप दिवसांनी कुणीतरी हा प्रश्न विचारला ग…खूप छान वाटलं मला…” रोहिणी म्हणाली. ” मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले…?” सुप्रिया ने विचारले. ” काही नाही ग…सहजच…तू सांग ना आणखी काही…” रोहिणी विषय टाळत म्हणाली. ” सांगायचे तर आहे…पण कसं सांगू … Read more

लाचारी अशीही असते – भाग १

ऑफिस मधून घरी जाण्यासाठी नुकत्याच बाहेर पडलेल्या सुप्रियाला तिच्या नवऱ्याचा फोन आला. तिने घाईतच फोन उचलला. तर समोरून तो म्हणाला. ” अग सुप्रिया…आईच्या वाढदिवसाचा केक मी बनवायला टाकला होता पण येताना गडबडीत तो केक घ्यायचा लक्षातच आलं नाही बघ…जरा येताना ती केक घेऊन येशील का…तुला रस्त्यातच पडेल ते दुकान…” साकेत म्हणाला. तिने त्याला होकार दिला … Read more

काही चुका सुधारता येत नाहीत

वनिताला आज जरा कामावर यायला उशीरच झाला होता पण रविवार असल्याने मी जरा निवांत होते. मी आरामात चहा पित बालकनी मधून खाली बघत होती. तितक्यात वनिता मला तिच्या नवऱ्याच्या गाडीवर येताना दिसली. सोसायटीच्या गेटच्या बाहेर त्याने तिला उतरवून दिले. आणि ती त्याच्याकडे न बघता मुकाटपणे आत निघून आली. आमच्या घराच्या समोर येऊन तिने दारावरची बेल … Read more