वर्चस्व – भाग १

” काय करताय सुधिरची आई…” साठे काकू दारातून आत येत म्हणाल्या. ” काही नाही हो…आज जरा बरं वाटत नाही आहे…म्हणून म्हटलं थोडा आराम करावा…” वृंदाताई म्हणजेच मनिषाच्या सासुबाई म्हणाल्या. ” आता या वयात इतकी कामे कराल तर तब्येत तर बिघडणारच ना…” साठे काकू मनीषा कडे तिरकस पाहत बोलल्या. तसे मनिषाच्या सासूबाईंनी तिला किचन मध्ये जाऊन … Read more

किंमत नात्यांची – भाग १

घरी महेशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. राजेश आणि त्याची बायको राधिका घरातील प्रत्येक कामात जातीने लक्ष देत होते. सगळं काही ऐन भरात सुरू असताना राजेशच्या आई वडिलांनी राजेश आणि राधिकासाठी एक अनपेक्षित घोषणा केली. राजेशचे वडील त्याला म्हणाले. ” हे बघ राजेश…आता महेशचे लग्न होणार आहे…तुला तर माहिती आहे आपल्या घरी फक्त एकच चांगली … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ६

” माझ्यासमोर तोंड वर करून बोलण्याआधी तू हे लक्षात ठेव की कायद्याने तू अजूनही माझी बायको आहेस…त्यामुळे मी जे म्हणेल तुला तसेच करावे लागेल…” सागर म्हणाला. ” आज मी तुमचा माझा नवरा असण्याचा हक्क नाकारत आहे…शिवाय कायदेशीर रित्या सुद्धा लवकरच तो हक्क संपेल…पण माझ्या मनातून तुम्ही केव्हाच उतरले आहात…या आधी तुमचं सगळं काही निमूटपणे ऐकुन, … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ३

त्यामुळे त्या दिवशी सगळेजण घरी निघून गेले. कोर्टाने पुन्हा दोन महिन्या नंतरची तारीख दिली होती. कोर्टात हजर राहायच्या आदल्या दिवशी सागरच्या दुचाकीला अपघात झाला होता. आणि त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. म्हणून त्याचा नाईलाज झाला त्या दिवशी. आणि तो कोर्टात हजर नाही राहू शकला. घटस्फोट पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे तो मनातल्या मनात बराच चरफडला. पण … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग १

” काय आहे हे…अशी असते का भाजी…साधी भाजी कशी करावी हे सुधा कळत नाही का तुला…तुझ्या हाताला चवच नाही… हाताला काय तुझ्या कोणत्याच गोष्टीला चव नाही…मूर्ख कुठली…” सागर ओरडला आणि तसाच न जेवता जेवणाच्या ताटावरून उठून गेला. सावीला खूप वाईट वाटले. आजकाल हे नेहमीचेच झाले होते. सागरला सावीची कुठलीच गोष्ट आवडत नव्हती. सुरुवातीला हे प्रमाण … Read more

मर्यादा : फक्त तिच्यासाठीच का ?

” सूनबाई…अजुन चहा झालाच नाही का…किती वेळ वाट पाहू मी…” सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असलेल्या सासुबाई त्यांच्या सुनेला शारदाला म्हणाल्या. ” आणतेच आहे आई…” शारदा म्हणाली आणि चहाचा कप घेऊन येऊ लागली. ती स्वयंपाक घरातून बाहेर निघणार इतक्यात तिचा तीन वर्षाचा मुलगा शर्विल बाहेरून खेळून आला आणि पाणी प्यायचे म्हणून सरळ स्वयंपाक घरात शिरला. पण … Read more

माझिया माहेरा

वैशाली बस मधून उतरली आणि तिच्या मुलाला सार्थकला कडेवर घेऊन खाली मानेने एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होते की दरवेळी प्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली आहे तिला. जुनाट साडी, हाती सामानाची लहानशी बॅग, अंगभर … Read more

प्रेमाची संपत्ती

सुधा आणि सुरेशच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. सुरेशची परिस्थिती जेमतेमच होती. घरी थोडी शेती होती. सुरेश दिवसभर राबायचा आणि आपल्या परिवाराला चांगल्यातल चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. सुरेशच्या घरी त्याचे आईवडील, बायको सुधा आणि तो असे चारच जण होते. सुरेशचे आईवडील सुद्धा त्याला जमेल तसे त्याच्या संसारात मदत करत होते. पण सुद्धा मात्र या संसारात … Read more

लोक काय म्हणतील ? – भाग १

  गौरीच्या आईने तिला पोटाशी धरलं. आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्या रोखू शकल्या नाहीत. त्यानंतर दोघीही मायलेकी बराच वेळ काहीच बोलल्या नाहीत. गौरीच्या आईने स्वयंपाकघरात जाऊन सकाळचे जे काही शिल्लक अन्न होते ते गौरीसाठी आणले. आणि गौरीने ते अगदी हपापल्या सारखे खाऊन टाकले. तोवर गौरीची लहान बहीण चंदा सुद्धा घरी आली. गौरीताईला असे अचानक समोर … Read more

तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग ३ (अंतिम भाग)

” तू मला का टाळत आहेस…?” त्याने विचारले. ” मी कुठे टाळतेय तुला..?” स्नेहल त्याच्याकडे न बघता म्हणाली. ” मग माझ्याकडे बघून बोल ना…तू इथे माहेरी आली तेव्हापासून ती एकदाही मला स्वतःहून कॉल केला नाहीस…मी तीनदा तुला घ्यायला इथे आलो पण तू सोबत आली नाहीस…आणि आधी माझ्या शिवाय कुठेही एकटी न जाणारी तू आता मला … Read more