निर्णय – भाग १४

प्रकाशराव विचार करतच घरी गेले. शालू ताईंनी रस्त्याने त्यांचे कान भरले ते वेगळेच. शालू ताई आणि प्रकाशरावांनी घरात पाय ठेवलाच होता इतक्यात त्यांच्या घरी त्यांच्या सासुबाई आणि मोठ्या जाऊबाई आल्या. त्यांच्या जाऊबाई त्याच शहरात थोड्या अंतरावर राहायच्या. शालूताईंच्या सासुबाई कधी त्यांच्याकडे तर कधी त्यांच्या मोठ्या जावेकडे राहायच्या. जाऊबाई आणि त्यांच्या कुटुंबाचे बऱ्यापैकी पटायचे. प्रकाशरावांना तिथे … Read more

निर्णय – भाग १२

” हे बघ… आपलं लग्न झालंय हे मला मान्य आहे पण ते कोणत्या परिस्थीती त झालंय हे सुद्धा तुला चांगलेच माहिती आहे…त्यामुळे माझ्याकडून तू काही फारशा अपेक्षा न केलेल्या बऱ्या…” ” म्हणजे…?” त्याचे बोलणे न समजल्याने नंदिनीने विचारले. ” हे बघ…मला माहिती आहे की तुला सगळं कळतंय…उगाच न कळल्याचा आव नकोस आणू…” नकुल चिडत म्हणाला. … Read more

निर्णय – भाग ११

तसे पाहिल्यास दुसऱ्या दिवशी नंदिनीची मांडवपरतनी आणि सत्यनारायण करणे अपेक्षित होते पण नंदिनीच्या माहेराहून तसा काहीच फोन आला नसल्याने सरला आत्याने घरातल्या घरातच सत्यनारायणाची पूजा करून घेतली. कारण त्यांना माहिती होते की प्रकाशरावांना सध्या खूप राग आलेला आहे. आणि त्या रागाच्या भरात कदाचित ते नंदिनीला किंवा नकुलला अपशब्द बोलू शकतात आणि आधीच चिडलेला नकुल ते … Read more

निर्णय – भाग ९

” पण म्हणून काय एखाद्याच्या वजनावरून किंवा दिसण्यावरून ऐन मंडपात लग्नाला नकार द्यायचा का..?” मुलाची बहीण म्हणाली. ” तरीही ती लग्न मंडपात आली होती ना…पण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तो स्वतःला दारू पिण्यापासून रोखू शकला नाही…नवरदेव आला तेव्हा तो अक्षरशः झिंगत होता हे सगळ्यांनीच पाहिलंय…आणि अशा दारुड्या मुलाला मांडवात नकार देणे काही चुकीचे नाही…” सुनीलराव … Read more

निर्णय – भाग ८

नंदिनी या लग्नाला तयार नाही आणि कधी नव्हे ती तिची आई सुद्धा विरोधात उभी आहे त्यामुळे नंदिनीचे लग्न रवीशी लावणे तिच्या बाबांसाठी जरा कठीण झाले होते. शिवाय नवरदेवाकडील मंडळी स्वतःहून मांडवातून निघून गेल्याने त्यांच्या मनातील ते ओझं जरा कमी झालं होतं. म्हणूनच मग त्यांनी सुनीलरावांच्या प्रस्तावाचा विचार करायचे ठरवले. नंदिनीची आई तर आधीच तयार होती. … Read more

निर्णय – भाग ७

” नंदिनीचे लग्न होईल…आजच होईल…ह्याचं मांडवात…पण मुलगा मात्र तो नसेल…” सगळेजण ह्या आवाजाच्या दिशेने पाहायला लागले. तर समोर सरलाताईंचे मिस्टर म्हणजेच सुनिलराव उभे होते. त्यांना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. सरलाताई पुढे येऊन म्हणाल्या. ” म्हणजे…तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे…?” ” म्हणजे हेच की ह्या मुलाशी तिला लग्न करायचे नाहीये…पण तिने लग्न करायला मात्र नकार दिला … Read more

निर्णय – भाग ६

” म्हणजे…तुला काय वाटतं…हे लग्न आता थांबणार का…अजिबात नाही…आजपर्यंत कधी ऐकलंस का नवरदेव वरात घेऊन आल्यावर लग्न तुटलं म्हणून…आजवर कमावलेली इभ्रत चव्हाट्यावर येईल अशाने…” आजी म्हणाली. ” पण यामुळे नंदिनीचं आयुष्य खराब होईल त्याचं काय…?” सरलाताईंनी प्रश्न विचारला. ” ती तिच्या नशिबाने राहील…तसंही प्रत्येक जण आपल्या नशिबाने खातो…तिच्या नशिबात चांगलं असेल तर चांगलं होईल…आणि वाईट … Read more

निर्णय – भाग ५

नंदिनीच्या आईला सुद्धा हा काय प्रकार आहे ते कळत नव्हतं. मुलगा तब्येतीने खूपच बारीक होता. शिवाय तो दारूत आहे हे दुरूनच समजत होतं. नंदिनीच्या आईने तिच्या वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतला प्रश्न प्रकाशरावांना चांगलाच कळला होता. त्यांनी नजरेनेच उषाताईंना प्रतिसाद दिला आणि सांगतो म्हणाले. नंदिनीची आई तिच्या बाबांकडे जायला निघाली. इकडे नंदिनी पाय धुण्याच्या विधी साठी … Read more

निर्णय – भाग ४

लग्नाचा दिवस उजाडला. प्रकाशराव वधुपिता म्हणून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेवून होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं नंदिनीचं लग्न होतं. मांडव सजला होता, पाहुणे आले होते, नंदिनी सुद्धा तयार होत होती. नवरदेवाकडील मंडळी अजूनही आली नव्हती. मारुतीच्या मंदिरातून तर ते केव्हाच निघाले होते. पण रस्त्याने नवरदेव आणि त्याचे मित्र नाचत असल्याने उशीर होत होता. मुहूर्ताची … Read more

निर्णय – भाग ३

प्रकाशरावांनी ठरवल्याप्रमाणे लग्नाची चोख व्यवस्था लावण्याची तयारी सुरू सुद्धा केली होती. तसा एक महिना म्हणजे फार कमी वेळ होता. पण त्यांना सगळं काही व्यवस्थित पार पाडायचं म्हणून त्यांनी आतापासूनच तयारीला लागणे योग्य समजले होते. प्रकाशराव आनंदाने सगळ्या तयाऱ्या करत होते. आजी सुद्धा प्रत्येक कामात जातीने लक्ष देत होती. नंदिनी ची आई मात्र नंदिनी च्या सासरी … Read more