निर्णय – भाग २

शालूताईंनी दुसऱ्याच दिवशी फोन करून मुलाकडचे दहा दिवसांनी येऊन नंदिनीला पाहून जातील असे सांगितले. त्यांनी जणू आधी मुलाकडच्यांना नंदिनीचा फोटो दाखवला होता तो त्यांना खूपच आवडला हे सुद्धा त्यांनी सांगितले. घरचे तर खुपच खुश होते. नंदिनीच्या आजीला तर कधी लग्न ठरतंय आणि मी कधी सगळ्यांना सांगतेय की माझ्या मुलीने नंदिनीची सोयरिक एवढ्या मोठ्या घरात जुळवून … Read more

निर्णय – भाग १

प्रकाशराव बाहेरून आले. अंगणातल्या ओसरीवर ठेवलेल्या बादलीतील पाणी पायावर घेतले आणि बाहेरच्या झोपाळ्यावर येऊन बसले. ते बराच वेळ तिथे बसून होते तरीही उषाताई चहा घेऊन आल्या नव्हत्या. नाहीतर रोज त्यांची येण्याची चाहूल लागताच उषाताई सगळ्यात आधी चहाचं आधण ठेवायच्या. रोजचा नियम काही चुकायचा नाही. पण आज मात्र बराच वेळ झाल्यावर ही त्या आल्याच नाही हे … Read more

गुपित – भाग ६ (अंतिम भाग)

अरुण हात जोडत त्यांना म्हणाला. तेव्हा त्याचे दोन्ही हात हातात घेत अबोलीचे वडील म्हणाले. ” मी तुम्हाला केव्हाच माफ केलंय अरुणराव…तुमच्या डोळ्यात मला पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता…तुमची चूक तुमच्या लक्षात आली आणि तुम्ही ती सुधारली सुद्धा…शिवाय वेळेसोबत सगळं काही ठीक होतंच…पण अबोली काही ऐकायला तयार नाहीये म्हटल्यावर माझा सुद्धा नाईलाज झाला…तुम्हा दोघांना ही असं … Read more

गुपित – भाग ५

कोर्टाच्या तारखेला दोन दिवस बाकी असताना प्रीती अबोलीला भेटायला गेली. तिला पाहून अबोली म्हणाली. ” हे बघ…तू मला समजावण्यासाठी आली असशील तर मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये…” ” नाही ग… मी तुला समजावून सांगण्यासाठी वगैरे आलेली नाहीये…उलट मी तर तुझी माफी मागायला आली आहे…” प्रीती म्हणाली. ” माफी…? ती कशाबद्दल…?” अबोलीने आश्चर्याने विचारले. ” मी … Read more

गुपित – भाग ४

त्यानंतर तिथे अबोली आणि प्रीतीच्या माहेरची मंडळी सुद्धा प्रीतीला भेटायला आली. सगळ्यांना प्रितीची अवस्था पाहून काळजीच वाटली. त्यांची काळजी पाहून मग उलट प्रितीनेच सगळ्यांना धीर दिला आणि जास्त काही लागले नाही म्हणून समजावून सांगितले. प्रीतीचा कणखरपणा पाहून अबोलीला स्वतःच्या वागणुकीबद्दल आणखीनच वाईट वाटत होते. थोड्या वेळाने जेव्हा सगळे घरी जायला निघाले. तेव्हा अबोली म्हणाली. ” … Read more

गुपित – भाग ३

आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे अरुणने सुद्धा आपली चूक सुधारली होती. अरुणने प्रशांतला सुद्धा सगळं काही खरं खरं सांगितलं आणि त्यालाही आश्वासन दिले की तो यापुढे कधीही असे वागणार नाही. त्याच्या वागणुकीत पश्चात्ताप दिसून येत होता म्हणून प्रशांत आणि प्रीती झालं गेलं सगळं विसरून गेले. पण अबोलीचा गैरसमज मात्र दूर झाला नाही. ती प्रीतीला चुकीचंच समजत होती. … Read more

गुपित – भाग २

” अगं अबोली मी काय जीजूंना ना ओळखत नसेल का…? मी त्यांना पाहिलंय म्हणूनच तुला सांगायला आली असेल ना…” प्रीती म्हणाली. ” अगं पण असं कसं होऊ शकतं…?” अबोलीच्या बोलण्यातून आता काळजी झळकत होती. ” असेच आहे बघ…” प्रीती म्हणाली. ” पण मग ते माझ्याशी खोटे बोलत असतील का…?” अबोली स्वतःशीच विचार करत म्हणाली. ” … Read more

गुपित – भाग १

सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत असतानाच अरूणचा फोन वाजला. त्याने घाईतच फोन रिसिव्ह केला आणि हॅलो म्हटले. त्यानंतर त्याने समोरून हे म्हटले ते ऐकून अरुण जोरात म्हणाला. ” काय…?” समोरचा व्यक्ती जे काही म्हणाला त्यानंतर अरूणचा चेहरा गंभीर बनत गेला. अबोलीने त्याचा आवाज ऐकला आणि त्याला विचारले. ” अहो काय झालंय…कुणाचा फोन होता…तुम्ही असे अचानकच सिरीयस … Read more

जिवलगा – भाग २१ (अंतिम भाग)

ती जीप जवळ आली तेव्हा राघवच्या लक्ष्यात आले की ती पोलिसांची पेट्रोलिंग जीप होती. ती जीप त्यांच्या जवळ येऊन थांबली तेव्हा आणि त्यातील एक पोलीस उतरून त्यांच्या जवळ गेले आणि राघवला विचारले. ” कुठे चाललात..? आणि अंधार पडल्यावर इथे का थांबलेले आहात..?” ” सर आम्ही मुंबई ला जातोय…आणि गाडी पंक्चर पडली म्हणून इथे थांबलो आहोत…” … Read more

जिवलगा – भाग २०

” आई…तू हे काय बोलते आहेस…?” राधा आईला म्हणाली. ” योग्य तेच बोलते आहे…” राधाची आई म्हणाली. ” पण मला हे पटत नाहीये मामी…” राघव म्हणाला. ” मलापण नाही पटत आहे आई…” राधा म्हणाली. ” मी सगळा विचार करूनच बोलतेय…राधाचे बाबा आता काहीच ऐकण्या पलीकडे गेले आहेत…एरव्ही खूप चांगले असणारे राधाचे बाबा या मान अपमानाच्या … Read more