चुकलेली पारख

माधवीच्या सासुबाई किचन मध्ये आल्या आणि अगदी रागातच स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. मागच्या अनेक वर्षांपासून स्वतः स्वयंपाक न केल्याने त्यांना आताशा या कामांची सवय राहिलेली नव्हती. त्यामुळे त्यांची खूप चिडचिड होत होती. आणि म्हणूनच हाताला येईल ते भांडे आदळत आपटत कशीतरी स्वयंपाकाची तयारी करत होत्या. माधवी किंचित भेदरलेल्या नजरेने एका कोपऱ्यात उभी राहून त्यांच्याकडे बघत … Read more

ती सुद्धा आईच आहे…!

” अग ए शालू…पोरगा केव्हापासून रडतोय…पहिल्यांदा याला बघ…राहू दे घरातली कामं…” शकू आत्याने शालूला आवाज दिला. तेव्हा शालू जरा तणतणतच बाळा जवळ आली आणि बाळा ला जवळ घेतले आणि मनातल्या मनातच म्हणाली. ‘पोरगा लहान आहे तर रडणारच ना…आताच दूध पाजून गेली आहे…ह्यांना काय कळणार म्हणा…ह्यांना कुठे मुलबाळ आहे…ह्यांनी थोडा वेळ बाळाकडे बघितलं असतं तर काय … Read more

तिला समजून घेताना – भाग २ (अंतिम भाग)

कार्तिक संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला घर खूप सूने वाटत होते. रोज घरी आल्यावर मयुरी त्याला त्याच्या आवडीचा गरमागरम चहा करून द्यायची आणि दिवसभरात काय घडलं ह्याची विचारपूस करायची. त्यावेळी मात्र कार्तिक चिडून “तुला काय त्याचं ?” असे म्हणायचा. तरीही त्याच्यावर रागवायचे सोडून ती दुसऱ्या दिवशी प्रेमाने पुन्हा तीच चौकशी करायची. आज मात्र त्याला खूप … Read more

तिला समजून घेताना – भाग १

कार्तिक आणि मयुरी घरी आले आणि कार्तिकने रागातच स्वतःचा कोट काढून सोफ्यावर भिरकावून दिला. त्यासरशी मयुरी जरा घाबरलीच. कार्तिक मोठ्याने तिला म्हणाला. ” काय ग…एवढीही अक्कल नाही का तुला की पार्टीत जाताना कोणते कपडे घालावेत…गावंढळ कुठली…” ” मला खरंच माहिती नव्हतं की सगळ्या जणी पार्टीत वन पिस घालून येणार आहेत…म्हणून मी साडी घातली…” मयुरीने कसेबसे … Read more

शापित सौंदर्य

आम्हाला नवीन क्वार्टर मध्ये शिफ्ट होऊन महिना झाला होता. एव्हाना आजूबाजूच्या दोन चार घरांशी चांगली ओळख सुद्धा झाली होती. कधीतरी दिसल्यावर बोलणं व्हायचं. मुलगा सुद्धा इतर मुलांसोबत खेळायला जात होता. पण एकाच बिल्डिंग मध्ये अगदी दारासमोर दार असणाऱ्या तिच्याशी अजुन एकदाही बोलणं झालेलं नव्हतं. तशी बोलायला ती नेहमी नेहमी दिसायची सुद्धा नाही. कधीतरी बाहेरचा पॅसेज … Read more

किंमत नात्यांची – भाग २ ( अंतिम भाग)

भाग २- किंमत नात्यांची भावाने घरच्या कामात मदत व्हावी म्हणूनच तिला आग्रहाने पंधरा दिवस आधी बोलावून घेतले होते. आणि म्हणूनच वहिनी सुद्धा कधी नव्हते इतकी गोड वागत होती तिच्याशी. त्या दिवशी सरिता खूपच उदास झाली होती. तरीपण जड मनाने ती दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून लग्नात जायला तयार झाली. मुलांना सुद्धा तयार केले. प्रभाकर घरूनच लग्नाच्या … Read more

किंमत नात्यांची – भाग १

” अगं सरिता…अजून वेळ आहे लग्नाला…आताच जाण्याचा हट्ट का करत आहेस तू…” प्रभाकर सरिताला म्हणाला. ” अहो मला जायलाच हवं…दादाने दोनदा फोन केला मला… म्हणाला लग्नाच्या पंधरा दिवस आधी तरी ये म्हणून…” सरिता उत्साहाने म्हणाली. ” अगं पण मागच्या वेळेला काय झालं ते विसरलीस का तू…मला तरी वाटतं की तू लग्नाच्या एक दोन दिवस आधी … Read more