निर्णय (मराठी कथा)- भाग २९

दुकानाला चांगले दिवस आले होते. हळूहळू सुजाताच्या डिलिव्हरीची तारीख सुद्धा जवळ आली होती. सुजाताचे सासू सासरे आता खूपच उत्साहात होते आणि एके दिवशी अचानक सुजाताच्या पोटात दुखायला लागले. दिलेल्या तारखेच्या दहा दिवस आधीच सुजाता ने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळाला पाहून सुजाता आजवरच्या सगळ्या वेदना, सगळे दुःख विसरली. मातृत्वाने तिच्या … Read more

निर्णय (मराठी कथा )- भाग २८

रवी ने सुजाता चा एवढा विचार केला होता हे माहीत झाल्यावर त्याचे आई बाबा कृतकृत्य झाले होते. आपला मुलगा मनाने वाईट नव्हता हे ते जाणून होते. फक्त व्यसनामुळे तो तसा बनला होता. पण स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्ये त्याला आयुष्याच्या शेवटच्या घडीला सुद्धा ठावूक होते आणि त्याने आपले कर्तव्य बजावले सुद्धा. तरीही जाताना त्याला ह्या गोष्टीची … Read more

निर्णय (मराठी कथा) – भाग २७

रेवा घरी आल्यावर तिच्या बाबांनी तिच्या जवळ विषय काढला. पण आणि तिच्या सासूबाईंना कळू द्यायचे नव्हते म्हणून बाहेरच्या बागेत त्यांचे बोलणे सुरू होते. ते रेवाला म्हणाले. ” रेवा…मला तो नवीन हायवे च्या जवळचा प्लॉट विकायचा आहे…माझा एक मित्र त्यासाठी खूप चांगली किंमत देत आहे…मी सौदा पक्का करून घेतो…तुला फक्त खरेदीच्या दिवशी यावं लागेल सही करायला…” … Read more

निर्णय ( मराठी कथा ) – भाग २६

सुजाताचे सासरे ओठात एक आणि पोटात एक अशा प्रकारे सुजाताशी वागायचे. सुजाताची सासू मात्र पूर्णपणे बदलली होती. सुजाता खूप आनंदात होती. ती तिच्या सासू सासर्यांमध्ये  तिच्या आई बाबांना पाहायची. इतक्या दिवसांनी तिच्या आयुष्यात स्थैर्य आले होते. रेवा आता तिच्या माहेरी जरा कमीच यायची. आली तरी सुजाताशी थोडी बरी वागायची. आईला वाटायचं की रेवा तिच्या संसारात … Read more

निर्णय – भाग २४

” म्हणजे…तुमच्या मनात नक्की काय सुरू आहे बाबा…” रेवा ने विचारले. ” हेच की सुजाताशी सध्या गोड बोलून, चांगले बोलून तिचा विश्वास संपादन करावा आणि बाळ जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा तिला थोडे पैसे देऊन परत माहेरी पाठवायचे…” रेवा चे बाबा म्हणाले. ” काय…? पण ती जायला तयार होईल का…?” रेवा ने प्रश्न केला. ” … Read more

निर्णय – भाग २१

रवीचे बाबा म्हणाले. ” ते तुमचं तुम्ही पाहा…पण आम्हाला आता तुमची मुलगी आमच्या घरात नकोय…घरी न्या…आमच्या मुलाला तर नाही वाचवू शकली…ना त्याची दारू सोडवू शकली…काही फायदा नाही झाला हिच्याशी लग्न करून…घेऊन जा हिला…” सुजाताच्या बाबांनी अनेकदा विनंती केली की सुजाताला इथेच ठेवा म्हणून. पण रवीचे आईबाबा काही ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला. आता … Read more

निर्णय – भाग २०

आजीला आज खरोखरच खूप जास्त पश्चात्ताप होत होता. शालू ने जे काही केले ते उषा ला माहिती होते तरीही ती गप्प राहिली. तिच्या जागी कुणी दुसरी असती तर ह्या गोष्टीचा फायदा घेऊन घरात कलह केला असता. उषा आधीपासून खूपच सहनशील आणि संयमी व्यक्ती आहे हे आजी आधीपासूनच जाणून होत्या. पण त्यांना ते कबूल करायचे नव्हते. … Read more

निर्णय – भाग १८

नकुल आल्यावर नंदिनीच्या बाबांनी औपचारिकता म्हणून त्याची विचारपूस केली. सगळे जण नकुलसाठी जेवायला थांबले होते. मग सगळ्यांनी एकत्र जेवायला सुरुवात केली. सगळेच आनंदात होते. मात्र नकुलच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. जेवण वगैरे झाल्यावर सगळे जण गप्पा करत बसले. थोड्या वेळाने नंदिनी चे आई बाबा घरी जायला निघाले. निघताना ते सुनील रावांना म्हणाले. ” लग्न … Read more

मराठी कथा निर्णय – भाग १६

सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा प्रकाशरावांना कळत होत्या. ते म्हणाले. ” मला कळलंय की माझं चुकलं…खूप चुकलं… मी उषा सोबतच तुम्हा साऱ्यांचा गुन्हेगार आहे…मी तुमचं मन दुखावलंय…” ” अहो तुम्ही माफी का मागताय…जे झालं त्यात तुमची चूक नव्हतीच…सगळं काही त्या वेळच्या परिस्थितीमुळे झाले…आपण सगळेच हतबल होतो…” उषाताई म्हणाल्या. ” हो ना…तुमच्या जागी आणखी कोणी असते तर त्यांनी … Read more

निर्णय – भाग १५

आत्याचा आवाज ऐकून नंदिनी बाहेर आली. आत्या तिला म्हणाली. ” नंदिनी… मी आज खूप खुश आहे…तू आमची मान उंचावलीस बघ…” काहीही न कळल्यामुळे नंदिनी तिथेच उभी होती. मग आत्या पुढे म्हणाली. ” अगं कॉलेजातून पहिली आलीस तू…” ” खरंच…” नंदिनी आश्चर्याने म्हणाली. ” हो तर.. हा नितीन आताच सांगत आलाय मला…” आत्या म्हणाली. ” हो … Read more