तुझ्याविना मी – भाग ८ ( अंतिम भाग)

इतकी वर्षे लाडाकोडात वागवलेल्या आपल्या मुलीचे आपण स्वतःहून अशा माणसाशी लग्न लावणार होतो ह्या जाणिवेने त्यांच्या काळजात धस्स झाले. स्वतःच्या चुकीची जाणीव आणि निशा ला दिलेल्या वाईट वागणुकीचा पश्चात्ताप एकत्रच त्यांच्या डोळ्यात तरळला. आता त्यांना निशाला भेटण्यावाचून चैन पडणार नव्हते. ते तसेच तिथून निघायला लागले. इतक्या वेळ ह्या दोघांच्याही गोष्टी ऐकत असलेली वृषाली अचानक वसंतरावांच्या … Read more

तुझ्याविना मी – भाग ७

” मी सुद्धा इथे थांबायला नाही आलोय…पण निशाची ईच्छा होती की आमच्या लग्नाला तुमचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आलो आहे…तुमचा राग मला कळतोय…पण तुम्ही एकदा शांतपणे आमच्या निर्णयाचा विचार करा…मग तुम्हालाही कळेल आम्ही हे सगळे का केले ते…” साकेत म्हणाला. ” मला काहीच ऐकून घ्यायचे नाही…तुम्ही जा इथून…” वसंतराव स्वतःच्या खोलीत जात म्हणाले. त्यासरशी निशा आणि … Read more

तुझ्याविना मी – भाग ६

निशाला अचानक समोर पाहून काय बोलावे आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे साकेतला काही कळत नव्हते. तिला पाहताच भूतकाळाच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळल्या. क्षणात त्याच्या डोळ्यात राग आणि प्रेम ह्या दोन्ही भावना दाटून आल्या. पण प्रेमावर रागाच्या भावनेने विजय मिळवला आणि तो तिथून निघून जायचे म्हणून परत फिरला. तोच निशा घाईने त्याच्या समोर येऊन उभी राहिली. … Read more

तुझ्याविना मी – भाग ५

एकदा निशाला तिच्या एका मैत्रिणीचा रेणुकाचा फोन आला. तिचे नुकतेच बाळंतपण झाल्याने ती सध्या माहेरीच होती. सहज म्हणून तिने निशाला फोन लावला आणि बोलता बोलता घरी भेटायला हे असे म्हणाली. एरव्ही कुणाच्याही घरी लवकर जायला तयार न होणारी निशा लगेच तयार झाली. त्याचे मैत्रिणीला ही नवल वाटले. कारण कॉलेज मध्ये निशा नेहमीच तोऱ्याने वागायची. तिच्या … Read more

तुझ्याविना मी – भाग ४

आता तर हळूहळू वृषाली घरात रुजू लागली होती. स्वतःचा अधिकार गाजवू लागली होती. अशातच तिला गोड बातमीची चाहूल लागली. ह्या बातमीने घरात आनंदी आनंद झाला. वसंतराव तर अगदी हरखून गेले होते. घरात बाळ येणार हे ऐकून निशाला ही खूप आनंद झाला होता. अर्थातच यामुळे वृषालीचे घरातील महत्त्व खूप जास्त वाढले होते. आता स्वयंपाक फक्त वृषालीच्या … Read more

तुझ्याविना मी – भाग ३

निशाला आपल्या कडून डिव्होर्स हवाय हे ऐकून साकेत एकदम बिथरलाच होता. आपण तिच्यावर एवढे प्रेम केले ह्याची तिला अजिबात जाणीव नाही हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याला आताशा निशाचा भयंकर राग येऊ लागला होता. निशाच्या वागण्यावर विश्वास तर अजिबातच बसत नव्हता. अशातच एके दिवशी त्याच्या घरी डिव्होर्स नोटीस आली. त्यामध्ये निशाने त्याच्यावर बरेच … Read more

तुझ्याविना मी – भाग २

एवढ्याशा गोष्टीवर नाराज होऊन निशा माहेरी निघून गेली ह्याचे साकेतला नवल वाटत होते. पण साकेतच्या घरच्यांना मात्र ह्याचे खूप वाईट वाटत होते. त्यांच्या मते सुनेला नाराज करणे म्हणजे घरच्या लक्ष्मीचा अवमान करणे होते. शिवाय निशा सध्या घरात नवीन आहे म्हणून ती या घरात रुळेपर्यंत तरी तिला सांभाळून घेणे गरजेचे होते. त्यामुळे घरच्यांनी साकेतला निशाला समजावून … Read more

तुझ्याविना मी – भाग १

घराबाहेर गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. त्या सरशी आशाताईंनी किचन मधला खिडकीतून बाहेर पाहिले. वसंतरावांसोबत निशा सुद्धा आली होती. तिला पाहून आशाताईंना आता काळजी वाटायला लागली होती. एरव्ही निशा नेहमीच सासरहून भांडून माहेरी यायला लागली होती. आजही ती जरा धुसफूस करतच घरात आली. आशाताई दोघांसाठी पाणी घेऊन दिवाणखान्यात आल्या. निशाकडे पाहून म्हणाल्या. ” निशा…तू अशी … Read more

निर्णय ( मराठी कथा)- भाग ३० (अंतिम भाग)

दोघीही एकदमच गप्प झाल्या. नेमकं काय बोलावं हे दोघींनाही कळत नव्हते. मग नंदिनी ने स्वतःच हात पुढे केला आणि म्हणाली. ” हाय…” ” हॅलो… नाइस टू मीट यू…” सुजाता सुद्धा हात पुढे करत म्हणाली. घरच्यांना सुद्धा काय बोलावे आणि काय नको ते कळत नव्हते.   मग एकमेकांशी जुजबी बोलणी करून ते तिथून जायला निघाले. पण सुजाता … Read more

निर्णय (मराठी कथा)- भाग २९

दुकानाला चांगले दिवस आले होते. हळूहळू सुजाताच्या डिलिव्हरीची तारीख सुद्धा जवळ आली होती. सुजाताचे सासू सासरे आता खूपच उत्साहात होते आणि एके दिवशी अचानक सुजाताच्या पोटात दुखायला लागले. दिलेल्या तारखेच्या दहा दिवस आधीच सुजाता ने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळाला पाहून सुजाता आजवरच्या सगळ्या वेदना, सगळे दुःख विसरली. मातृत्वाने तिच्या … Read more