एकाच ह्या जन्मी जणू – भाग १

प्रीती तिच्या आई बाबांची लाडकी होती. दोन भावांच्या प्रेमाच्या सावलीत वाढलेली होती. मागच्या वर्षीच तिच्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते. वहिनी सुद्धा प्रितीचे खूप लाड करायची. तिला हवं नको ते विचारायची. प्रीती सुद्धा वहिनीला खूप मान द्यायची. प्रीती नुकतीच बारावी पास झाली होती. शिक्षणात तिची फारशी प्रगती नसल्याने आणि तिला पुढे शिकण्यात फार रस नसल्याने … Read more

वैदेही

वैदेहीने तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. आणि तिच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी व्हायला लागली. वैदेही आठव्या वर्गात असेल तेव्हाच तिची आई हे जग सोडून गेली होती. तेव्हापासून आपसूकच तिच्यावर सर्व घराची जबाबदारी येऊन पडली.   तिच्या घरी ती, तिचा मोठा भाऊ सागर, आणि तिचे बाबा एवढे तिघेच होते. शिक्षणात बऱ्यापैकी हुशार असणारी वैदेही … Read more

बायको माझी नवसाची

” काय मग पिंटू… काल मुलगी पाहायला गेला होता असं ऐकलं होतं…ठरलं का काही…?” पारावर बसलेल्या सदा काकाने समोरून येणाऱ्या पिंटू ला विचारले. ” अजुन काही ठरलं नाही…?” पिंटू त्यांना टाळत म्हणाला. ” अरे अजुन किती उशीर करणार आहेस…तुझ्या बरोबरच्या मुलांना दोन दोन मुलं आहेत… अन् तू आपला नुसत्या मुली पाहत आहेस…उरकून टाक लवकर…” सदा … Read more

अहंकार

आज दिनकर काका आणि सरला काकूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचा मोठा मुलगा प्रशांत आज शासकीय सेवेत मोठ्या पदावर रुजू झाला होता. गावातील लोक सकाळपासून घरी या दोघांचेही अभिनंदन करायला येतच होती. आणि गावातील लोकांना प्रशांतचा आजवरचा संघर्ष सांगताना काका काकूंचा उर अभिमानाने भरून येत होता. काका आणि काकू दोघेही साधे माणसं. त्यांच्याकडे शेतीचा … Read more

वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग २

दिवसामागून दिवस जात होते. पण राजेशच्या तब्येतीत काही विशेष सुधारणा दिसत नव्हती. राधाचे देवाला साकडे घाल नेणे सुरूच होते. दोन महिने निघून गेले पण राधाला मात्र हे दोन महिने खूप कठीण गेले. या दोन महिन्यात तिच्या मनाची नुसती घालमेल होत होती. तिला सारखी राजेशला भेटायची इच्छा व्हायची पण कुणी तिचे काही ऐकायला तयार नव्हते. घरची … Read more

वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग १

   ” ह्या मुलाशी राधाचं लग्न झालं तर ती आयुष्यभर सुखात नांदेल…आयुष्यभर शोधत बसाल तरीही इतकं चांगलं स्थळ मिळणार नाही पोरीला…” गोदाक्का राधाच्या वडिलांना सांगत होत्या.      ” पण त्या पोराचं हे दुसरं लग्न आहे…अन् तो वयाने पण मोठा आहे राधापेक्षा…राधा नुकतीच एकोणविस वर्षांची झालीय…मला वाटतं इतक्यात तिचं लग्न केलं तर घाई होणार ना ती…” … Read more

खरंच प्रेम आंधळं असावं का ?

अंजु सतरा वर्षांची एक चुणचुणीत मुलगी. नुकतीच वयात आलेली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपल्या आईवडिलांसह आनंदाने राहत होती. घरात आईवडील, एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. छोटे पण सुखी कुटुंब. घरात सुख नांदत होते. पण त्यांच्या या सुखी कुटुंबाला कुणाची तरी नजर लागणार होती. भविष्यात त्यांच्यापुढे काहीतरी अनपेक्षित घडणार होते. आणि ह्याला कारण ठरली अंजु. … Read more

सासूबाईंचा बदललेला स्वभाव

  ” आई…डॉक्टरांनी मेघाला आराम घ्यायला सांगितला आहे…डॉक्टर म्हणाल्या की जास्त हालचाल करणे सध्या मेघा आणि बाळासाठी चांगले नाही…” मिलिंद आईला समजावत म्हणाला.   ” अरे डॉक्टर असेच सांगतात…आराम करायला सांगतात आणि मग नॉर्मल डिलीव्हरी होत नाही…तसेही आजकाल सगळ्या गोष्टींसाठी यंत्र वापरतात…आम्ही तर गावी असायचो तेव्हा आम्हाला सडा, सारवण करायला लागायचे…बाहेरून पाणी आणावे लागत होते…पण … Read more

सावळा गं रंग तुझा

” पण बाबा… मला चांगली शिकलेली मुलगी हवीय…नोकरी करणारी नसेल तर निदान चारचौघात आत्मविश्वासाने वावरणारी हवी…शहरात वाढलेली आणि चांगलं राहणीमान असणारी मुलगी हवीय…आणि मला तुम्ही त्या गावात राहणाऱ्या बारावी पास मुलीबरोबर लग्न करायला सांगताय…काय म्हणे तर मुलगी खेळामध्ये करियर करणार आहे…इतकं सोप्पं असतं का ते…प्रत्येकाला नाही जमत…” निषाद काहीसा चिडून म्हणाला. ” आम्ही त्या मुलीला … Read more

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग १

” आम्ही नाही वागवू शकत तुमच्या मुलीला आता…आम्हालाही नातवंडं पाहिजेत…लग्नाला सहा वर्षे झालीत पण अजूनही गोड बातमी नाही…शेवटी वाट तरी किती पाहायची…कितीतरी दवाखाने केले…देवांना नवस केले पण तरीही काही उपयोग नाही…” रामराव त्यांच्या सूनबाईच्या वडिलांना म्हणाले. ” अहो पण पोरीचा इतक्या वर्षाचा संसार नका मोडू हो…तिचा बी जीव तुटतो लेकरासाठी…पण देवाने तिच्या पदरात लेकराच दान … Read more