किंमत नात्यांची – भाग १

” अगं सरिता…अजून वेळ आहे लग्नाला…आताच जाण्याचा हट्ट का करत आहेस तू…” प्रभाकर सरिताला म्हणाला. ” अहो मला जायलाच हवं…दादाने दोनदा फोन केला मला… म्हणाला लग्नाच्या पंधरा दिवस आधी तरी ये म्हणून…” सरिता उत्साहाने म्हणाली. ” अगं पण मागच्या वेळेला काय झालं ते विसरलीस का तू…मला तरी वाटतं की तू लग्नाच्या एक दोन दिवस आधी … Read more

अविश्वास – भाग १

कल्याणी आणि कुणाल ह्यांच्या लग्नाला जवळपास महिना  झाला होता. कल्याणी अजूनही घरातल्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होती. सगळ्यांना काय हवं काय नको ते विचारत होती. कल्याणीच्या सासरी तिचे सासू सासरे, नवरा आणि ती असे एकूण चारच सदस्य होते. एक नणंद घराचा कारभार एकहाती सासूच्या ताब्यात होता. त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची जास्त हिम्मत होत नसे. अगदी कल्याणी … Read more

फिरून नवी जन्मेन मी – भाग ३ (अंतिम भाग)

आणि स्वाती पुढचे पंधरा वीस मिनिटे नुसते बोलत होती. अंकिता किती वाईट वागली आहे आणि तिने यापुढे कसे वागावे ह्याचे नुसते उपदेश देत होती. अंकिता मात्र तिच्याशी एक शब्द देखील बोलली नव्हती. आजवर ज्या बहिणीने तिला जे मागितलं ते दिलं तिच्याबद्दल काहीबाही बोलताना स्वातीला जराही वाईट वाटत नाही ह्याच अंकिता ला नवल वाटत होतं. पण … Read more

तिच्या साधेपणातील सौंदर्य – भाग १

मधुराचे आई बाबा घरी आले तशी ती आनंदाने त्यांच्यासमोर गेली आणि तिने विचारले. ” आई…मला दाखव ना…माझ्यासाठी कुठला ड्रेस आणला आहेस तू…काव्याताईच्या लग्नात घालायला…?” तसा आईने तिच्यासाठी आणलेला ड्रेसचा कापड तिच्या हातात दिला. ड्रेसचा कापड पाहून मधुराने नाक मुरडले… ” काय आई…किती साधा ड्रेस आहे हा…आणि आजकाल असा पंजाबी ड्रेस घालून कोण जातं लग्नात… काव्या … Read more

अधिकार

विनायकरावांच्या लहान मुलाचे आदित्यचे लग्न होऊन पंधरा दिवस झाले होते. लग्न मोठ्या थाटात पार पडलं होतं. लग्न झाल्यावर गोंधळ, सत्यनारायण सुद्धा थाटात पार पडला.   सगळे पाहुणे सुद्धा आपापल्या घरी निघून गेले. लहान मुलगा, सून बाहेरून फिरून सुद्धा आले. सगळं काही सुरळीत सुरू होतं. लहान सूनबाईचा स्वभाव सुद्धा चांगला वाटत होता. घरच्यांशी मिळून मिसळून वागायचा … Read more

माझी बायको नोकर नाही.

गिरिजा काकूंच्या दोन्ही मुलांची मल्हार आणि केदार ची लग्न एकाच दिवशी ठरवली होती. घरी पाहुण्यांचे आगमन झालेले होते. गिरिजा काकू स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होत्या. दोन्ही सुनांना द्यायचे कपडे, दागिने त्यांनी स्वतः पसंत केले होते. पण त्यांनी मुद्दामहून त्यांच्या मोठ्या सुनेसाठी हलक्या प्रतीच्या गोष्टी घेतल्या होत्या. त्यामानाने लहान सूनेसाठी सगळ्या महाग गोष्टी … Read more