Thursday, March 19, 2026
मितवा
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
मितवा
No Result
View All Result

तू आधी स्वतःला जप

Admin by Admin
September 2, 2020
in मितवा
0
0
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विभा एक गृहकृत्यदक्ष गृहिणी होती…तिच्या घरी तिचे सासू सासरे, नवरा, ती आणि तिचा चार वर्षांचा मुलगा सोहम असे छोटे कुटुंब एकत्रितपणे राहायचे…विभा प्रत्येक कामात निपुण होती…एक चांगली सून, चांगली आई आणि चांगली बायको होती…तिच्यात फक्त एकच वाईट सवय होती. ती म्हणजे ती स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायची नाही. घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची मात्र स्वतःकडे फार दुर्लक्ष करायची…


विभाच्या पोटात दोन दिवसांपासून दुखत होते. तरीही ती अंगावरचे दुखणे सहन करून घरातील कामे नेहमीप्रमाणेच करत होती. घरघुती उपायांनी ठीक होईल म्हणून अंगावर दुखणे काढत होती. मध्येमध्ये तिला बरं वाटायचं. आपोआप ठीक होईल म्हणून अशा छोट्या मोठ्या दुखण्यावर ती कायमच दुर्लक्ष करायची.


तिचा नवरा तिला सकाळीच म्हणाला की आज दिवसभर आराम कर. संध्याकाळपर्यंत बरं वाटलं नाही तर आपण दवाखान्यात जाऊन येऊ. पण विभा ने यावेळी सुद्धा त्याचे काही ऐकले नाही. मी ठीक आहे. मला थोड्या वेळात बरे वाटेल म्हणून पुन्हा घरच्या कामाला लागली होती.


आज सहज म्हणून तिच्या घरी तिची मैत्रीण पूनम आलेली होती. तिला पाहून विभाला आनंद झाला. ती म्हणाली…


” अग पुनम…आज खूप दिवसांनी आलीस बघ…तुला बघुन खूप आनंद झाला…”


” अग मलापण खूप दिवसांपासून यायचंच होतं इकडे…आज याच रस्त्याने शारदा काकूंच्या घरी जात होते…म्हटलं तुला भेटून जावं..” पूनम म्हणाली.


” शारदा काकूंकडे कशाला ग…आज काही विशेष आहे का..” विभाने विचारले.


” हो ग…त्यांच्या नातवाचा पहिला वाढदिवस होता आज म्हणून आले होते…”


” हो का…कशी आहे ग त्यांची नवी सूनबाई…त्यांच्या पहिल्या सूनेपासून सुद्धा त्यांचा एक नातू आहे ना…त्याला नीट वागवते का ग ती ?”


” नीट तर तेव्हाच वागवणार ना जेव्हा तो इथे राहत असेल…”


” म्हणजे…तो त्यांच्यासोबत राहत नाही का..?”

” अग त्यांची पहिली सून कांचन आजारपणात वारल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी त्यांच्या नातवाला त्यांच्या घरी घेऊन जायची तयारी दाखविली होती…पण शारदा काकू आणि त्यांच्या मुलाने त्यांना नकार दिला…म्हणाले होते की आमचा मुलगा आहे आम्ही व्यवस्थित सांभाळू…”


” हो ग…मी पण ऐकले होते कुणाकडून तरी…”

” त्यांची पहिली सून कांचन वारल्यानंतर मुलाचा सांभाळ करायला आई हवी म्हणून त्यांनी अवघ्या दोन महिन्यातच त्यांच्या मुलाचे लग्न लावून दिले होते. पण पुढे एका महिन्यातच शारदाकाकू त्यांच्या नातवाला घेऊन त्यांच्या गावाकडच्या घरी राहायला निघून गेल्या…त्यांच्या नवीन सुनेने त्या मुलाला सांभाळायला नकार दिला म्हणे…आणि त्यांचा मुलगा सुद्धा काहीच बोलला नाही…आता त्यांच्या दुसऱ्या सुनेला सुद्धा मुलगा झालाय आणि तो आता एक वर्षाचा सुद्धा झालाय…पण तरीही तो अजूनही त्याच्या आजीकडे गावीच राहतो…” पूनमने सांगितले.


” पण शारदा काकू त्यांच्या मुलाला सांगत का नाही की त्या मुलाला पण आई वडिलांचं प्रेम हवंय…त्याला सुद्धा इथेच शहरात त्यांच्याकडेच ठेवा म्हणून…” विभाने विचारले.


” शारदा काकूंनी त्याला बरेचदा म्हटले की माझ्याच्याने आता जास्त कामे होत नाहीत…तू यशला सुद्धा इथेच तुझ्याकडे ठेव तर तो टाळाटाळ करतो…आणि इतर कुणी विषय काढला तर सांगतो की शारदा काकूंना त्याचा लळा लागलाय म्हणूनच त्या पाठवत नाहीत त्याला शहरात म्हणून…” पूनम म्हणाली.


“अरे देवा…इतक्या लहान वयात त्या मुलाला काय काय सहन करावे लागत आहे ना…कांचन खूप छान होती…पण एका छोट्याशा आजारपणात ती अवघ्या सहा महिन्यांच्या यशला सोडून देवाघरी निघून गेली…आणि कांचनचा नवरा इतका बदलेल असे वाटले नव्हते…कांचन आणि यश वर खूप प्रेम करायचा ना तो…आणि आता स्वतःच्या इतक्या लहान मुलाला स्वतःपासून दूर ठेवतोय…खरंच किती लवकर बदलतात ना लोकं…” विभा म्हणाली.


” हो ग…आणि शेवटी आई ती आईच असते ग विभा…अगदी चार दिवसांच्या तापीमुळे गेली ग ती…सुरुवातीला साधी ताप होती…तिने दुर्लक्ष केले आणि ताप डोक्यात गेली…मग काही तिला वाचवता आले नाही…ती गेल्याने तिच्या नवऱ्याला आणि सासूला काही विशेष फरक पडला नाही…अगदी दोन महिन्यात त्यांनी दुसरी सून घरात आणली…पण कांचन मुलगा मात्र आईच्या प्रेमाला मुकला ग…” पूनम म्हणाली.


पूनमचे बोलणे ऐकून विभा विचारत पडली. विभा सुद्धा तब्येतीकडे दुर्लक्ष करायची. मात्र कांचनचा विचार करून विभाला तिची चूक कळली होती. पूनम थोड्या वेळाने तिच्या घरी निघून गेली पण विभा मात्र विचारातच होती.


संध्याकाळी विभाचा नवरा घरी आला. त्याला पाहताच विभा म्हणाली..


” अहो…मला जरा बरं वाटतं नाहीय…चला आपण दवाखान्यात जाऊन येऊ..”


एरव्ही तिला कितीही म्हटले तरी दवाखान्यात जायला टाळाटाळ करणारी विभा स्वतःहून दवाखान्यात जायचं म्हणतेय हे ऐकुन तिच्या नवऱ्याला नवल वाटले. पण विभाने मात्र ठरवले होते की यापुढे स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही. तिला कळून चुकले होते की तिच्या घरच्यांसोबत तिने स्वतःलाही जपायला हवे. ती जेव्हा स्वतः निरोगी असेल, आनंदी असेल आणि परिपूर्ण असेल तेव्हाच ती तिची कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडू शकेल.

क्रमशः

©आरती लोडम खरबडकर.

अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला फॉलो करा.

Tags: आरोग्याची काळजीगृहिणीमराठी कथासासू आणि सून
Previous Post

खरंच पैसा सर्वकाही असतो का ?

Next Post

सख्खे शेजारी

Admin

Admin

Next Post

सख्खे शेजारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

by alodam37
March 10, 2026
0

  साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि...

आईची ममता पैशांपेक्षा मोठी असते.

आईची ममता पैशांपेक्षा मोठी असते.

by alodam37
March 9, 2026
0

  राधा एका गरीब कुटुंबातील साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या आयुष्यात फार अपेक्षा नव्हत्या—फक्त शांत संसार, प्रेम करणारा...

तिची जबाबदारी

तिची जबाबदारी

by alodam37
February 27, 2026
0

मीनाक्षीला आज पार्लर चे काम संपवायला जरा उशीरच झाला होता. पार्लर चे काम आटोपून ती घाईघाईने ती हॉल मध्ये शिरली...

प्रायश्चित्त

प्रायश्चित्त

by alodam37
February 26, 2026
0

विश्वासरावांना दोन मुली. गायत्री आजी कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी आहे. गायत्री त्यांच्या...

आई होण्याची किंमत

आई होण्याची किंमत

by alodam37
February 24, 2026
0

  केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून...

मराठी कथा / वारस – भाग २

वेळीच थांबायला हवं

by alodam37
February 27, 2026
0

 अजय आणि विजय—एकाच छपराखाली वाढलेले, एकाच चुलीतले दोन भाऊ. वडील लवकर गेले आणि आईनेच त्यांना मोठं केलं. वडिलांच्या आठवणी कमी,...

मराठी कथा – इभ्रत

मराठी कथा – इभ्रत

by alodam37
July 15, 2025
0

  कावेरीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरू होती. कावेरीची मुलगी आनंदी सुद्धा खूप उत्साहात लग्नघरात बागडत होती. इतक्यात तिच्याकडून...

Load More
  • Home
  • About us
  • contact us
  • Disclaimer
  • Privacy Policy

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

error: Content is protected !!