अशातच एके दिवशी अविनाशची आई शालिनीच्या माहेरी गेली. आणि शालिनीला घरी चल म्हणून विनवू लागली. शालिनी ला सुद्धा तेच पाहिजे होते. पण शालिनी उगाच स्वतःच्या अटी घालत होती. शेवटी अविनाशच्या आईने तिला घरी येण्यासाठी राजी केलेच. शालिनी अर्जुनला घेऊन पुन्हा घरी करत आली. संध्याकाळी अविनाश ऑफिस मधून घरी आला तेव्हा त्याने बघितले की शालिनी घरी परतली आहे. त्याला वाटले शालिनी ला तिच्या चुकांची जाणीव झाली असावी. शालिनी आणि अविनाश चा संसार पुन्हा पूर्ववत झाला.
अविनाशच्या आईचा नातवावर विशेष जीव होता. त्याचा किती लाड करू आणि किती नाही असे व्हायचे त्यांना. पण शालिनी मात्र अर्जुनला आजीशी बोलायला मनाई करायची. म्हणून मग अर्जुन सुद्धा आजिशी कमीच बोलायचा.
पण आई मात्र आता हरवलेली वाटत होती. बरेचदा ती जेवण स्वतःच्या खोलीतच मागवून घ्यायची. घरी करमल नाही तर जवळच्या मंदिरातच जाऊन तासनतास बसायची. आई हळूहळू अबोल होत होती. आईची परिस्थिती अविनाश ला कळत होती. पण आई मात्र स्वतःहून कधी बोलायची नाही म्हणून त्याचाही नाईलाज होता. तो मात्र ऑफिस मधून घरी आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी आईला भरपूर वेळ द्यायचा. कधी आईला मंदिरात घेऊन जायचा तर कधी एखाद्या नातेवाईकाला भेटायला न्यायचा.
असेच दिवस जात होते. अर्जुन आता बावीस वर्षांचा झाला होता. शालिनी घराची मालकीण झाली होती आणि आईची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. एव्हाना तिची तब्येत सतत खराब राहायची. कधीकधी तर तिला काही आठवायचे देखील नाही. त्यामुळे बरेचदा अंथरुणात असायची. शालिनी तिच्याशी कामाशिवाय बोलतही नसे.
एके दिवशी शालिनी अविनाश जवळ आली आणि म्हणाली.
” अहो… ऐकताय का…?”
” हा…बोल…” अविनाश म्हणाला.
” माझ्या विजुदादाची मुलगी साक्षी आहे ना तिला याच शहरातील कॉलेज मध्ये एडमिशन मिळाली आहे…मी असा विचार करत होते की ती आपल्याच घरी राहिली तर..” शालिनी म्हणाली.
” माझी काही हरकत नाही…पण तुला तर माहिती आहे ना आपल्या इथे रूम नाहीये शिल्लक…एका रूम मध्ये आपण दोघे राहतो…एका रूम मध्ये अर्जुन आणि एका रूम मध्ये आई…मग ती कुठे राहणार..?” अविनाश म्हणाला.
” आईंच्या रूम मध्ये राहू शकते ना ती…” शालिनी म्हणाली.
” आईंसोबत राहू शकेल का ती…म्हणजे आई बरेचदा आजारी असते म्हणून विचारतो आहे…” अविनाश म्हणाला.
” तेच मला म्हणायचं आहे की आई आता म्हाताऱ्या झाल्या आहेत…त्यांना कशाला हवी स्पेशल रूम…त्यापेक्षा आपल्या घराच्या स्टोअर रूम मध्ये थोडीशी सफाई करून त्यांच्यासाठी एखादा पलंग टाकून देऊ आपण…” शालिनी म्हणाली.
” तू काय बोलत आहेस तुला कळतंय का…माझ्या आईला स्टोअर रूम मध्ये ठेवशील तू…असा विचार तरी कसा करू शकतेस तू…?” अविनाश रागात म्हणाला.
” नाहीतर काय…म्हाताऱ्या झाल्या आहेत त्या आता…त्यांना कशाला हवी स्वतःची रूम…घरातल्या एखाद्या कोपऱ्यात राहतील की त्या देवाचं नाव घेत…आणि मी चांगली आहे म्हणून इतकी वर्षे सांभाळलं त्यांना…माझ्या जागी दुसरी कुणी असते तर केव्हाच एखाद्या वृद्धाश्रमात रवानगी झाली असती त्यांची…” शालिनी म्हणाली.
” तोंड सांभाळून बोल शालिनी…ती माझी आई आहे…आणि हे घर तिचं आहे…ती कुठेच जाणार नाही…” अविनाश खूप रागात म्हणाला.
शालिनी काही बोलणार इतक्यातच अर्जुन तिथे आला आणि अविनाशला म्हणाला.
” बाबा…आईला कशाला बोलत आहात…आई बरोबरच बोलत आहे…नाहीतरी आजी म्हातारीच आहे…सतत घरभर फिरत असते…बरेचदा अंथरूण सुद्धा ओलं करते…मला नाही आवडत ती…तुम्ही तिला एखाद्या वृद्धाश्रमात का नाही पाठवत…”
” तुझी आजी तुझ्यावर इतकं प्रेम करत आलीय आणि तिच्याबद्दल तू असा बोलतो आहेस…अरे माय बाप म्हातारे झाले…काही काम करत नसले म्हणून काय त्यांना अडगळ समजून घराच्या बाहेर काढून देत असतात का…उद्या तुझी आई म्हातारी होईल तेव्हा तू तिला पण एखाद्या वृद्धाश्रमात पाठवशील का…?” अविनाश अर्जुनला म्हणाला.
यावर मात्र अर्जुन गप्प बसला. अर्जुन च्या वागणुकीतून शालीनीची शिकवण दिसून येत होती. आजीला वृद्धाश्रमात पाठवा हे सुद्धा त्याच्या मनात शालिनी नेच भरून दिले होते. अविनाश मात्र मुलाचे बोलणे ऐकून हतबल झाला होता. शालिनी आणि अर्जुन तिथून निघून गेले पण अविनाश मात्र विचारांच्या खोल गर्तेत सापडला होता.
त्यानंतर रोज शालिनी अविनाश जवळ आईची खोली रिकामी करा म्हणून तगादा लावत होती. अर्जुन चा सुद्धा तुला पाठिंबा होता. आडून आडून आईला वृद्धाश्रमात ठेवा हे सुद्धा सुचवत होती. अविनाश मात्र काहीच बोलत नव्हता. तो नुसता विचार करत होता.
शेवटी एके दिवशी सकाळीच अविनाश आईला सोबत घेऊन बाहेर निघाला. सोबत दोन मोठ्या बॅग्स सुद्धा होत्या. शालिनी ने अविनाश आणि सासुबाई ना बाहेर जाताना पाहिले आणि तिची कळी खुलली. कधी नव्हे ती सासूच्या आधाराला समोर आली आणि अविनाशच्या हातातील एक बॅग घेऊन बाहेर न्यायला मदत करू लागली.
बॅग बरीच जड होती हे तिच्या लक्षात आले. सासूबाईंकडे असे काही विशेष सामान नव्हते हे तिला माहिती होते. एक लहानशी बॅग सुद्धा पुरेशी झाली असती. पण या दोन मोठमोठ्या बॅगमध्ये नेमकं काय आहे हे तिला कळत नव्हते. तिने अविनाश ला विचारले.
” ह्या दोन मोठ्या बॅगमध्ये काय आहे…म्हणजे आईंचे कपडे तर एकाच बॅग मध्ये गेले असते…तिकडे वृद्धाश्रमात जास्त काही सामान न्यायची गरज नसते…” शालिनी म्हणाली.
” एका बॅगेत आईचं सामान आहे…आणि दुसऱ्या बॅगेत माझं…?” अविनाश शालिनिकडे पाहत म्हणाला.
” तुमचं सामान…पण तुम्ही कुठे जाणार आहात…आईसोबत वृद्धाश्रमात जाणार आहात का…?” शालिनी म्हणाली.
” नाही…ना मी वृद्धाश्रमात जाणार आहे ना आई…मी आमच्या दोघांसाठी माझ्या ऑफिसच्या जवळच एक घर घेतलं आहे भाड्याने…आता आम्ही दोघेही तिथेच राहू…आईसाठी मी एक नर्स ठेवणार आहे जी माझ्या ऑफिस हून करत येईपर्यंत आईची काळजी घेईल…आणि नंतर मी आहेच आईची काळजी करायला…आता हे घर तुझंच आहे…तुला जी खोली हवी ती वापर…” अविनाश म्हणाला.
” पण तुम्ही असे कसे आम्हाला सोडून जाणार…मला आणि अर्जुनला तुमची गरज आहे…” शालिनी म्हणाली.
” जशी तुम्हा दोघांना माझी गरज आहे तशीच आईलाही आहे…आई हल्ली आजारी असते…आणि अशा दिवसात तिला मी एकटं नाही सोडू शकत…तू माझ्या आईला सांभाळायला असमर्थता दाखवली म्हणून मला आज हे घर सोडून जायचं निर्णय घ्यावा लागत आहे…नाहीतर एकत्र कुटुंबात आनंदाने राहायला कुणाला आवडणार नाही ग…पण माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवा असा माझ्या मागे तगादा लावताना तुझ्या मनात एकदा तरी हा विचार आला का की उद्या तू सुद्धा म्हातारी होणार आहेस…तुला अर्जुन ने वृद्धाश्रमात पाठवले तर…नाहीतरी असे वागून तू त्याच्यावर काही चांगले संस्कार करत नाही आहेस…तू अशी वागू शकतेस पण मी नाही वागू शकत…मला माझ्या आईने घडवलं आहे आणि की तिला कधीच एकटं सोडणार नाही…म्हणून मी हा निर्णय घेतला…पण तू काळजी नको करुस…तुला आणि अर्जुनला मी कधीच काही कमी पडू देणार नाही…येतो मी…” अविनाश म्हणाला.
आणि आईचं सामान कार मध्ये ठेवून आईला घेऊन निघाला. शालिनी त्याला नुसती बघतच होती. कारण बोलायला तिच्याजवळ शब्दच नव्हते. तिच्या आततायीपणा मुळे आज ती तिच्या नवऱ्याच्या मनातून पुरती उतरली होती. दोघा मायलेकांना बाहेर जाताना पाहून तिच्याही डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले होते.
समाप्त.
©® आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका
खूप छान कथा 👌
अविनाश ने आईची बाजू घेऊन अगदी योग्य पाऊल उचलल