नेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आई, बाबा, नेहा आणि तिचा लहान भाऊ आकाश असं चौकोनी कुटुंब. नेहाचं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण झालं होत. नेहा शिवणकाम सुद्धा उत्तम करायची. तिला स्वतःच बुटिक सुरू करायचं होतं.
पण इतक्यात नेहाच्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या मुलासाठी नेहाला मागणी घातली. त्यांचा मुलगा प्रताप हा एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करायचा. घरीसुद्धा चांगला श्रीमंत होता. प्रताप त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता.
प्रतापचे वडील नेहाला लहानपणी पासून ओळखायचे. तिला आपली सून करून घ्यायचे त्यांनी आधीच ठरवले होते. आणि आता जेव्हा नेहाचे वडील नेहासाठी स्थळ पाहायला लागले तेव्हा आपणहून त्यांनी नेहा आणि प्रतापच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला.
नेहाच्या घरच्यांना प्रताप आवडला होता. नेहाला सुद्धा प्रताप आवडला. घरच्यांनी आपापसांत बोलणी करून साखरपुडा निश्चित केला. ठरलेल्या मुहूर्तावर प्रताप आणि नेहाचा साखरपुडा पार पडला. आणि महिन्याभराने लग्न पार पडले.
नेहा लग्न करून प्रतापच्या घरी आली होती. नेहा खूप खुश होती. तिला प्रतापसरखा कर्तृत्ववान नवरा मिळाला होता. शिवाय तिचे सासरे तिला अगदी मुलीप्रमाणे मानायचे. नेहाची सासू मात्र नेहापासून खुश नव्हती. आपल्या उच्चपदावर असलेल्या मुलासाठी एखादी श्रीमंत घराण्यातील आणि उच्चशिक्षित मुलगी त्यांना सून म्हणून हवी होती. मात्र प्रतापच्या वडीलांसमोर त्यांचे काही चालले नाही.
नेहाची सासू नेहाला सतत या ना त्या कारणावरून टोमणे मारायची. प्रताप संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला की सारख्या नेहाच्या तक्रारी करायची. प्रताप नेहावर रागवायचा. नेहा मात्र चुपचाप त्यांची बोलणी खायची. तिने कधीही कुणाला उलट उत्तर दिले नाही. मात्र तिच्या चूप राहण्याने तिच्या सासूबाई आणखी चिडायच्या.
नेहाला वाटायचे की आज ना उद्या सासूबाई सुद्धा बदलतील. आपल्या चांगल्या स्वभावाने ती त्यांचे मन जिंकेल अशी तिला खात्री होती. तिचे प्रतापवर खूप प्रेम होते. ती सतत त्याच्या मागेपुढे करायची. त्याला हवी असलेली वस्तू त्याने मागायच्या आधी त्याच्या हातात द्यायची. त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ तिने शिकून घेतले.
मात्र तिच्या सासूबाई नेहमी प्रतापकडे नेहाबद्दल तक्रार करायच्या. त्यामुळे प्रताप आणि नेहामध्ये सतत भांडणे व्हायला लागली. आपले लक्ष दुसरीकडे लावावे म्हणून नेहाने प्रतापला बुटीक सुरू करण्याची परवानगी मागितली. यावर प्रताप चिडला…
“तुला हवं ते सर्व मी आणून देतोच ना…मग कशाला तुला थोड्या पैशांसाठी ते शिवणकाम करायचे आहे..आपल्या घरात हे चालणार नाही…आईला तर अजिबात आवडणार नाही…”
नेहा हिरमुसली. पण उगीच वाद वाढायला नको म्हणून बूटिक काढायचा विचार तिने मनातून काढून टाकला. एक कुशल गृहिणी बनून ती संसारात रमली होती.
नेहा आणि प्रतापच्या लग्नाला सहा महिने झाले होते. आणि प्रतापला नोकरीत बढती मिळाली. नेहाला खूप आनंद झाला. पण तिची सासूबाई मात्र नेहाला आणखी घालून पाडून बोलू लागली. तू माझ्या प्रतापच्या लायकीची नाहीस. तुझ्या बापाने आमची श्रीमंती बघून तुला आमच्या गळ्यात बांधले वगैरे वगैरे. पण नेहा मात्र तरीही सर्व ऐकुन घ्यायची.
एके दिवशी नेहाने वडील तिला भेटायला तिच्या घरी आले. त्यांना पाहून नेहाच्या सासूबाईंनी बडबड करायला सुरुवात केली. उगाच आपल्यामुळे नेहाला त्रास नको म्हणून
नेहाने वडील दुःखी मनाने आल्या पाऊली परत जायला लागले. नेहाने त्यांना बघितले आणि धावत जाऊन त्यांना अडवले. दोघा बापलेकीची दारातच भेट झाली. नेहाची खुशाली विचारून ते निघून गेले.
संध्याकाळी प्रताप आल्यावर नेहाने त्याला घडलेला प्रकार सांगितला. प्रताप उलट नेहावरच चिडला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकुन प्रतापची आईदेखील तिथे आली.
भांडण आवरायचे सोडून त्या प्रतापला आणखी भडकवू लागल्या.
” मी काहीच बोलले नाही रे प्रताप…उलट नेहा आणि तिचे बाबाच मला उलटसुलट बोलले…”
” तुझी इतकी हिम्मत कशी झाली ?…तू माझ्याच आईला बोलतेस आणि उलट माझ्याशी खोटं बोलतेस…”
” मी असं काहीच बोलले नाही… माझं ऐकुन घ्या.”
मात्र तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच प्रतापने नेहाला एक थप्पड लगावली. आणि रागा रागाने रूमच्या बाहेर गेला. प्रतापच्या मागे त्याची आईसुद्धा निघून गेली.
मात्र तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच प्रतापने नेहाला एक थप्पड लगावली. आणि रागा रागाने रूमच्या बाहेर गेला. प्रतापच्या मागे त्याची आईसुद्धा निघून गेली.
प्रतापने तिचे काहीही ऐकुन न घेता तिला गुन्हेगार ठरवले होते. तिने इतके दिवस सासूबाईंना आपली आई म्हणून त्यांच्या प्रत्येक टोमण्याकडे दुर्लक्ष केले होते. तिने त्यांची मुलगी बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण त्या मात्र तिची आई होऊ शकल्या नाहीत. आणि आज प्रताप ने तिचं मन दुखावलं होतं. सासूचे सततचे टोमणे, तिच्या माहेरच्या परिस्थिती बद्दल सतत होणारे भाष्य, आज तिच्या वडिलांचा झालेला अपमान आणि प्रतापने मारलेली थप्पड हे सर्व आठवून नेहा निराश झाली होती. तिच्या मनात नकारात्मक विचारांनी घर केले.
आता पुढे रश्मी काय करेल…तिच्या सासूबाईंना त्यांची चूक लक्षात येईल का… प्रतापला त्याच्या वागणुकीचा पश्चात्ताप होईल का हे बघुया पुढील भागात…
अग्गबाई सासूबाई – भाग २ इथे वाचा. 👇
अग्गबाई सासूबाई – भाग २
Nice story
thank you