निर्णय – भाग १७

  दुसऱ्या दिवशी सकाळीच उषाताईंनी घरातील कामे आटोपली. स्वयंपाक वगैरे करून ठेवणीतील नवी साडी घालून तयार झाल्या. प्रकाशराव सुद्धा तयार झाले होते. त्यांची ही तयारी पाहून आजीला ह्याचं नेमकं काय चाललंय ते कळत नव्हते. एकतर प्रकाशराव इंदोरहून सरळ आपल्या घरी न येता उषाताईंना आणायला गेले होते. शालू ताईंनी सुद्धा झाल्या प्रकाराबद्दल त्यांच्या आईला काहीच सांगितले … Read more

निर्णय – भाग १३

    समोर रवीची आई उभी होती. त्यांना पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. ते शालू ताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.   मग शालूताई त्यांना म्हणाल्या.   ” अरे असा काय बघत आहेस??? मला इकडेच काम होतं आणि म्हटलं मी इकडे येत आहे तर तुलाही सोबत घेऊन यावं… शेवटी तुलाही कळायला हवं ना की तुझ्या बहिणीने तुझ्या … Read more

निर्णय – भाग १०

  सरलाताईंनी गरम गरम स्वयंपाक करून नंदिनीला वाढून दिले. सुरुवातीला संकोचणारी नंदिनी नंतर व्यवस्थित जेवली. उषाताईंनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन सरला ताईंना फोन लावला आणि नंदिनी ची चौकशी केली. सरला ताईंनी नंदिनी कडे फोन नेऊन दिला. उषाताईंनी तिला विचारले.     कशी आहेस बाळा…?     ठीक आहे आई…     आणि असे म्हणताच तिचा … Read more

बापमाणूस

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच तो इकडून तिकडे चकरा मारत होता. इतक्यात नर्स बाहेर आली आणि त्याला आनंदाची बातमी देत म्हणाली.   ” अभिनंदन…तुम्हाला मुलगी झाली आहे…”   हे ऐकून हरी आनंदाने वेडा झाला होता. “पारू, बघ ना…आपल्या घरी लक्ष्मी … Read more

एक अनोखे धोंडेजेवण

  सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती सावीच्या माहेरच्या तुलनेत बरी होती.   सावीचे वडील सरकारी कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरी करून निवृत्त झाले होते. मिळणाऱ्या पेन्शनवर आणि थोड्याफार बचतीवर त्यांचा संसार चालत … Read more

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली.   ” माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली…आणि वहिनी खूप जास्त आग्रह करत आहे की वैशालीला पण घेऊन ये…”   ” अहो ताई कशाला उगीच…तुम्ही जाऊन या ना…घरी पण कुणीतरी हवं ना…” वैशाली म्हणाली.   ” अगं आई आहेत ना घरी…तू चल माझ्यासोबत…वहिनी खूप आग्रह करत होती … Read more

चांगुलपणाचे ओझे

” वैशाली…जरा लवकर कर ना…दादा वहिनीला भूक लागली असेल अगं…” मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.   ” हो ताई…मी बस पोळ्या करते आता…मग लगेच जेवण वाढते…” वैशाली कामाचा वेग वाढवत म्हणाली.   तिने लगेच पोळ्या केल्या आणि पाहुण्यांना जेवायला बोलावले. मीनाच्या वहिनीला तिच्या हातची पुरणपोळी आवडते म्हणून आज तिने पुरणपोळ्या बनवल्या होत्या. सोबत आमटी, खीर, … Read more

हरवलेलं प्रेम – भाग ५

      लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.   हा तोच क्षण होता लग्नाचा…ज्या क्षणापासून ही कथा सुरू झाली होती. लग्नमंडप दिव्यांनी उजळून निघाला होता. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं होतं. पाहुण्यांची ये-जा सुरू होती. कुठे गप्पा, कुठे हशा, तर कुठे फोटो … Read more

हरवलेलं प्रेम – भाग ४

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   “तू… काय म्हणालास?”   मिलिंद शांतपणे म्हणाला,   “मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल… तर आपण लग्न करू शकतो.”   मेघनाच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं.   “बाळा… तू आम्हाला कोणत्या संकटात वाचवत आहेस ह्याची तुला कल्पना नाही..” त्या म्हणाल्या. मेघना अजूनही विचारात होती.   “पण… तुझं लग्न झालं होतं … Read more

हरवलेलं प्रेम – भाग ३

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो तिला भेटायला आला होता. ती हॉस्टेलच्या गेटपाशी उभी होती. मिलिंदकडे एक छत्री होती ती त्याने तिच्या डोक्यावर धरली. आणि तो तिच्यापासून दूर काही अंतरावर भिजत उभा राहिला.   “तुला सर्दी होईल. ही छत्री ठेव तुझ्याकडे.” … Read more