बायकोच्या धाकात ?

संध्याकाळची वेळ झाली होती. रमाकाकू आतुरतेने नेहाची वाट बघत होत्या. त्यांची सून राधिका सकाळपासूनच त्यांची धावपळ बघत होती. शेवटी गाडीचा हॉर्न ऐकू आला तसा त्यांनी घाईनेच दरवाजा उघडला. आणि नेहा येताच तिला कडकडून मिठी मारली. कारण नेहा मागच्या एका वर्षांपासून माहेरी आलेली नव्हती. नेहाच्या नवऱ्याने मुंबईमध्ये नवीन बिझनेस सुरू केला होता आणि नेहासुद्धा अधून मधून … Read more

बेस्ट फ्रेंड ?

राजन आणि अनिल दोघेही लहानपणापासूनचे मित्र. दोघांच्या वयात फक्त एका महिन्याचे अंतर होते. बालवाडी पासून ते बारावी पर्यंत दोघेही सोबतच शिकले. दोघे मित्र कमी आणि भाऊ जास्त वाटायचे लोकांना. लहानपणापासूनच दोघेही सोबत अभ्यास करायचे. खेळायचे आणि जेवायचे देखील सोबतच. दोघांचाही शाळेत पहिल्या पाचात नंबर ठरलेलाच असायचा. एकमेकांचे चांगले मित्र आले तरीही दोघांचा स्वभाव मात्र एकमेकांपासून … Read more

त्यांना फक्त थोडे प्रेम हवे

   सखुआजी आता थोडी थकली होती. वयाने नाही तर मनाने. साठ वर्षांच्या आसपास होती ती. गावी आजी अन् आजोबा दोघच राहायचे. सखुआजीच्या नवऱ्याला सारा गाव नाथा आजोबा म्हणून ओळखत असे.    नाथा आजोबा म्हणजे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. अवघे आयुष्य नाकासमोर चाललेला माणूस. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. गावी त्यांची पाच एकर शेती होती. … Read more

सहचारिणी

तो इतरांपेक्षा वेगळा होता. त्याला समाजसेवेचे भारी वेड. इतरांच्या वेदना पाहून दुःखी होणारा तो.ती मात्र साधी सरळ. चारचौघां सारखी. आपण बरं नी आपलं जग बरं हे मानणारी.पण ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.तो तिच्या साधेपणाच्या प्रेमात आणि ती त्याच्या निरागस तेच्या प्रेमात. त्याच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हते.त्याची चाललेली समाजसेवा आणि त्याच्या साथीदाराची निवड.तो मात्र त्याच्या निर्णयापासून … Read more

मनोदीप उजळवणारी दिवाळी

गौरी एका लहान शहरात वाढलेली मुलगी. पाच महिन्यांपूर्वी साधना ताईंची सून बनून मुंबईला आली. मुंबईसारख्या शहरात राहून इथल्या चालीरीती शिकत होती. सर्वांशी जुळवून घेत होती. तिचा नवरा सर्वेश नोकरीनिमित्ताने सकाळीच घराबाहेर पडायचं आणि रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळत नसे. म्हणून साधनाताई स्वतः आवर्जून दोघांनाही रविवारी कुठेतरी बाहेर फिरायला पाठवत असे. … Read more

तू मला विसरून जा

“तुला किती दिवसांपासून सांगतेय प्रताप…अरे निदान आता तरी लग्न करून घे…चांगला 30 वर्षांचा झाला आहेस तू…” प्रतापची आई. “काय ग आई…आज सकाळी सकाळी तोच विषय पुन्हा…आपण नंतर बोलू ना यावर कधीतरी.” प्रताप आईला म्हणाला. “नंतर कधी बोलायचं… तुझ्यासोबतच्या सर्व मुलांची लग्न उरकली आहेत…आधी म्हणायचास आधी नोकरी लागू दे…आता तर चांगला साहेब झालास तू…मग काय हरकत … Read more

संपत्तीवर अधिकार कुणाचा ?

    चिंतामण काकांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. ते कालच हॉस्पिटल मधून घरी आले होते. चिंतामण काका एव्हाना बरेच थकलेले वाटत होते. तसे काका फक्त पंचावन्न वर्षांचे होते पण रमाकाकू गेल्यापासून त्यांच्या तब्येतीची जरा हेळसांड झाली.     त्यांना सुजय आणि सानिका अशी दोन मुले. दोघांचीही लग्न झालेली. सुजयचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र … Read more

हे काम फक्त बायकांचं आहे ?

       ” केदार, मी स्वयंपाक करतेय तोवर जरा बाळाला पाहशील का..?” पल्लवी ने किचनमधून केदार ला आवाज दिला.        ” मी जरा महत्त्वाच्या कामात आहे…आणि तसंही मुलांना सांभाळणे बायकांचं काम असतं…” केदार म्हणाला.        ” अरे पण मी कामातच आहे ना…हे एवढं झालं की घेतेय त्याला…बघ ना थोडा वेळ…” पल्लवी म्हणाली.        ” काय ग…एक … Read more

प्रेम नव्हे…ही तर विकृती

   ” तुला कितीदा सांगितलंय कीर्ती…असे कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलणे बरे नाही…बोलणे तर बोलणे…तू तर स्वतःची पूर्ण माहिती देऊन टाकते समोरच्याला…निदान बोलण्यापूर्वी थोडा तरी विचार करावा…” कीर्तीची आई कीर्तीला समजावत म्हणाली.    ” आई…तू पण ना…उगाच काळजी करतेस ग…आणि प्रत्येकाला संशयाच्या नजरेने बघणे काही बरे नाही…आणि की काय आता लहान आहे का…मला सर्व कळतं…सो यू … Read more

लक्ष्मी जेव्हा दुर्गा बनते

लक्ष्मीला उठायला आज थोडा उशीर झाला होता. तिची सासू उठली तरीही लक्ष्मी झोपलेलीच होती. हे पाहून तिच्या सासूचा पारा चढला. त्या हॉल मधून लक्ष्मीच्या नावाने  शिव्यांची लाखोली वाहत होत्या. सकाळी सकाळी देवाचे नामस्मरण करण्याच्या वयात त्या अगदी खालच्या थराला जाऊन शिव्या देत होत्या.      त्यांच्या आवाजाने लक्ष्मीची झोप उडाली. अजूनही तिचं डोकं ठणकत होतं. तिची … Read more