मदर्स डे

आज सईला खूप ताप आला होता. तरीही ती स्वयंपाकघरात उभी राहून पोळ्या करत होती. अरविंदला जाणीव होती की तिला बरे नाही. तरीही तिची चौकशी न करता अरविंदने तिला फक्त एवढंच विचारलं,   “ माझा डबा तयार झाला का?” त्याचे बोलणे ऐकून सईच्या डोक्यात पाणी आले. पोरकेपणाची भावना अजून गडद झाली. अरविंद तिच्याशी कायम तुटक वागायचा. … Read more

शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

  साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि त्यांचा मुलगा रोहन. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात मायेची उब भरपूर होती.   गणेशराव गावातल्या सहकारी बँकेत कारकून म्हणून काम करत होते. रोज सकाळी सातला उठायचे, चहा घ्यायचे आणि सायकलवरून बँकेत जायचे. सुमित्राताई घरकाम … Read more

आईची ममता पैशांपेक्षा मोठी असते.

  राधा एका गरीब कुटुंबातील साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या आयुष्यात फार अपेक्षा नव्हत्या—फक्त शांत संसार, प्रेम करणारा नवरा आणि दोन वेळचे सुखाचे जेवण. तिचे लग्न शिरीषशी झाले तेव्हा तिला वाटले की तिचे आयुष्य स्थिर झाले.   शिरीष मध्यमवर्गीय कुटुंबातील धाकटा मुलगा होता. तो एका छोट्या कंपनीत नोकरी करायचा. पगार फार मोठा नव्हता, … Read more

प्रायश्चित्त

विश्वासरावांना दोन मुली. गायत्री आजी कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी आहे. गायत्री त्यांच्या एका मित्राची मुलगी होती. तिच्या आईवडिलांच्या अपघाती जाण्याने गायत्री पोरकी झाली होती. तेव्हा विश्वासरावांनी स्वतःहून गायत्रीची जबाबदारी स्वीकारली आणि तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे लग्नाचे मोठे केले. कल्याणी सुद्धा गायत्री लहान बहिण मानायची. पण विश्वासरावांची बायको विनिताताई … Read more

आई होण्याची किंमत

  केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून हात फिरवत तिने खोल श्वास घेतला. आत बाळाची हलकीशी हालचाल जाणवली आणि क्षणभर तिच्या ओठांवर हसू उमटलं. “तू आहेस ना… एवढंच पुरेसं आहे,” ती स्वतःशीच पुटपुटली.   केतकी आणि केदारचं लग्न होऊन आता एक वर्ष … Read more

मराठी कथा – इभ्रत

  कावेरीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरू होती. कावेरीची मुलगी आनंदी सुद्धा खूप उत्साहात लग्नघरात बागडत होती. इतक्यात तिच्याकडून चुकून तिच्या मावशीला धक्का लागला आणि तिच्या अंगावर चहा सांडला. तर मावशी लगेच आनंदीला ओरडून म्हणाली. ” काय गं…जरा पाहून चालत जा ना…आजी नुसती धावत का आहेस इकडून तिकडे…एका जागी शांत बस ना…” तिचे ओरडणे … Read more

एक चुकलेला निर्णय – भाग १

” किती निर्लज्ज बायका असतात ना…आधी माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद केलं आणि आता पुन्हा बोहल्यावर चढणार आहे मेली…” शारदाताई बडबडत होत्या. त्यांना असे बोलताना पाहून नितीन ने त्यांना विचारले. ” काय झाले आई…कसला त्रागा करत आहेस…आणि कोण चढतय पुन्हा बोहल्यावर..?” ” तुझी बायको मीनाक्षी… तिचं दुसरं लग्न ठरलंय…” आईने त्राग्यानेच उत्तर दिले. ” काय…?” नितीन … Read more

चुकलेली पारख

  ” आई…मला प्रीती खूप आवडते गं…माझं खूप प्रेम आहे तिच्यावर…आणि मी तिला आजच नाही ओळखत… मागच्या सात वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो…ती खरंच खूप चांगली मुलगी आहे…” ऋषी आईला समजावत म्हणाला. ” अरे तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी…मी चांगलीच ओळखते अशा मुलींना…आपलं घर पाहून भाळली असेल तुझ्यावर…नाहीतर तिचं घर बघितलंस का…? किती लहान आहे…अन् तिच्या … Read more

अधिकार – भाग २(अंतिम भाग)

तसेच समर्थ ने सुद्धा आजी म्हणून त्यांना मान द्यायला हवा, त्यांच्या मागेपुढे करायला हवं असं त्यांना वाटायचं. समर्थ नुसता आई आई करतो हे त्यांना आधी जरा खटकायचं. पण जेव्हापासून त्या त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन आल्या तेव्हापासून त्यांना वाटत होतं की त्यांच्या बहिणीची नातवंडं जशी आईपेक्षा आजीच्या जवळ जास्त राहतात तसं समर्थने सुद्धा राहावं. शाळेतून आला … Read more

मराठी कथा – अधिकार

सुरेखाताई जरा तणतणतच घरात आल्या आणि सोफ्यावर येऊन बसल्या. चार दिवसांसाठी म्हणून बहिणीच्या घरी राहायला निघाल्या तेव्हा त्या खूपच उत्साहात होत्या. पण आता मात्र त्यांचा मूड काही ठीक वाटत नव्हता. सुहासने त्यांची बॅग त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. मंजिरीने त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि लगेच त्यांना नेऊन दिला. सुरेखाताईंनी काहीही न बोलता मंजिरीच्या हातून चहा घेतला. त्यांचं … Read more