वर्चस्व – भाग १०

मनिषाचा प्रश्न ऐकून सुमेधा एकदमच गप्प झाली. कारण तिने अजूनतरी दुसऱ्या लग्नाचा विचारही केलेला नव्हता. आयुष्याने इतक्या कमी दिवसात इतके काही दाखवले होते की आता पुन्हा लग्न , पुन्हा संसार हा विचारही करणे दुरापास्त होते तिच्यासाठी. पण आयुष्य म्हटलं की दुनियादारी आलीच. तिने म्हटलं की मला दुसरं लग्न नाही करायचं आणि घरच्यांनी पण तिचे ऐकून … Read more

वर्चस्व – भाग ९

सुमेधाने मनिषाला वाचवण्यासाठी तिला सुधीरच्या दिशेला ढकलले पण तिला स्वतःला मात्र एवढा वेळ मिळाला नाही की ती सुद्धा तिथून दूर जाऊ शकेल. वेगाने येणारी गाडी आणि त्या गाडीसमोर सुमेधाला पाहून सगळ्यांच्याच तोंडून किंकाळी बाहेर पडली. एक क्षण तर काय झाले ते कळलेच नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या लक्षात आले की सुमेधाच्या जवळ येताच गाडीने करकचून … Read more

वर्चस्व – भाग ८

निशांत मनापासून वाट पाहत होता सुमेधाच्या घरी येण्याची. सुमेधाचा राग सुद्धा हळूहळू शांत होत होता. तिच्या मनात यायचे की सगळे काही विसरून पुन्हा एकदा निशांतच्या घरी जावे. पण वृंदाताई तिला नेहमीच म्हणायच्या की इतके दिवस वाट पाहिली आहेस तर दोन चार दिवस आणखी वाट पहा. निशांतराव सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करतील म्हणून. अशातच सुमेधाला तिसरा … Read more

वर्चस्व – भाग ७

मग सुमेधा सुद्धा मुद्दाम निशांत घरी येण्याच्या वेळेला घरातील काम करायला बसायची. तिच्या सासूबाईंना वाटायचे की सुमेधा हळूहळू काम शिकत आहे म्हणून कधीकधी किचन मध्ये येत असावी. पण सुमेधाच्या मनात मात्र वेगळेच विचार असायचे. रात्री सुद्धा खोलीत गेल्यावर त्याला सांगायची की आज दिवसभर खूप कामे केलीत म्हणून थकले आहे. निशांत तिच्या हो ला हो लावायचा. … Read more

वर्चस्व – भाग ६

” मी सगळच ऐकलं आहे सुमेधा…अगदी पहिल्यापासून…” सुधीर खिन्न पणे म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून आई आणि सुमेधाला धक्काच बसला. त्या दोघीही काहीच बोलल्या नाहीत. सुधीर पुढे म्हणाला. ” मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती आई… अगं सगळं काही सुरळीत सुरू असताना सगळ्यांच्या नजरेतून मनिषाला पडायची काय गरज होती…तिने कधी काही त्रास दिला नाही ना आपल्याला…कुठल्याही … Read more

वर्चस्व – भाग ५

ठरल्याप्रमाणे मनीषाचे आईवडिल अगदीच घाईघाईत मनिषाच्या सासरी यायला निघाले देखील. पण त्यांना खूपच काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी मनिषाला फोन केला. पण मनिषाचा फोन त्यावेळी व्यस्त असल्याने तिचा फोन लागला नाही. आणि मनिषाला सुद्धा आई बाबांचा फोन आलेला कळला नाही. मग काळजीने मनिषाच्या वडिलांनी सुधीरला फोन केला. तेव्हा सुधीरने त्यांचा फोन उचलला. मनिषाचे वडील सुधीरला … Read more

वर्चस्व – भाग १

” काय करताय सुधिरची आई…” साठे काकू दारातून आत येत म्हणाल्या. ” काही नाही हो…आज जरा बरं वाटत नाही आहे…म्हणून म्हटलं थोडा आराम करावा…” वृंदाताई म्हणजेच मनिषाच्या सासुबाई म्हणाल्या. ” आता या वयात इतकी कामे कराल तर तब्येत तर बिघडणारच ना…” साठे काकू मनीषा कडे तिरकस पाहत बोलल्या. तसे मनिषाच्या सासूबाईंनी तिला किचन मध्ये जाऊन … Read more

किंमत नात्यांची – भाग १

घरी महेशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. राजेश आणि त्याची बायको राधिका घरातील प्रत्येक कामात जातीने लक्ष देत होते. सगळं काही ऐन भरात सुरू असताना राजेशच्या आई वडिलांनी राजेश आणि राधिकासाठी एक अनपेक्षित घोषणा केली. राजेशचे वडील त्याला म्हणाले. ” हे बघ राजेश…आता महेशचे लग्न होणार आहे…तुला तर माहिती आहे आपल्या घरी फक्त एकच चांगली … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)

पण हा सगळा वाद होताना पाटील सरांनी वेळेचे गांभीर्य ओळखून सावीच्या वडिलांना सागरच्या येण्याचे फोन करून कळवले होते. सावीच्या वडिलांना ही सूचना मिळताच ते तडक सावीच्या भावाला घेऊन तिथे आले. त्यांना दुरूनच येताना पाहून सागर पटकन गाडीवर बसून निघून गेला. जास्त वाद वाढू नये म्हणून सावीच्या वडिलांनी त्याचा जास्त पाठलाग केला नाही. त्या दिवशी सावी … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ६

” माझ्यासमोर तोंड वर करून बोलण्याआधी तू हे लक्षात ठेव की कायद्याने तू अजूनही माझी बायको आहेस…त्यामुळे मी जे म्हणेल तुला तसेच करावे लागेल…” सागर म्हणाला. ” आज मी तुमचा माझा नवरा असण्याचा हक्क नाकारत आहे…शिवाय कायदेशीर रित्या सुद्धा लवकरच तो हक्क संपेल…पण माझ्या मनातून तुम्ही केव्हाच उतरले आहात…या आधी तुमचं सगळं काही निमूटपणे ऐकुन, … Read more