जिवलगा – भाग ११

” नाही आत्या…त्रास वगैरे नाही झाला…” राधा म्हणाली. ” जा मग किचन मध्ये…आणि स्वयंपाकाला सुरुवात कर…” सुलोचना ताई म्हणाल्या. तशी राधा किचन मध्ये जायला निघाली. तेवढ्यात मीनाक्षी ने मागून आवाज दिला आणि म्हणाली. ” आधी ती भांडी घासून घेशील…” ” हो…” एवढे बोलून राधा किचन मध्ये निघून गेली. मीनाक्षी स्वतःच्या हुशारी वर गालातल्या गालात हसत … Read more

जिवलगा – भाग ९

जिवलगा – भाग ९   ” माझ्या बाबांनी त्यांच्या मृत्युपत्रात असे स्पष्ट लिहिले आहे की त्यांची प्रॉपर्टी मला तेव्हाच मिळेल जेव्हा माझे लग्न होईल…” शनाया म्हणाली. ” काय…ही कसली अट…आणि ह्यात प्रॉब्लेम काय आहे…?”धीरजने विचारले. ” खूप मोठा प्रोब्लेम आहे…” शनाया म्हणाली. ” तो कोणता…?” धीरजने पुन्हा अधिरतेने विचारले. ” माझं तुझ्यावर प्रेम आहे…आणि तुझ्याशिवाय … Read more

जिवलगा – भाग ८

केशवरावांना गाडीबाहेर उतरताना पाहून सुलू ताई त्यांना म्हणाल्या. ” काय झालं हो तिकडे…धीरज आला का…?” केशवराव काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या पुन्हा म्हणाल्या. ” अहो सांगा ना तिकडे काय परिस्थिती आहे ते… राधाच्या काळजीने मला राहवत नाहीये इकडे…सोन्यासारखी पोर बिचारी आणि इतक्या लहान वयात काय काय सहन करावं लागत आहे तिला…आणि माझ्या भावावर सध्या … Read more

जिवलगा – भाग ७

सागरच्या स्थळाबद्दल ऐकून राधाची आई म्हणाली. ” नाही जाऊबाई…मला हे स्थळ माझ्या राधा साठी अजिबात मान्य नाही…त्यापेक्षा मी राधाला घरीच बसवून ठेवेल…” राधाच्या आईचे बोलणे ऐकून राधाच्या काकूला राग आला. त्या राधाच्या आईला म्हणाल्या. ” मान्य नाही म्हणजे काय…? इतकं सगळं झाल्यावर निदान मी एक मुलगा सुचवला हे कमी आहे का…? आता कोण होईल राधाशी … Read more

किंमत नात्यांची – भाग २(अंतिम भाग)

पण राधिकाने मात्र तिच्या सासरेबुवांना तिच्या सासूबाईंची सेवा करायला घरी येण्याची परवानगी मागितली. सासरेबुवांनी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला लागलीच घरी यायला सांगितले. आणि राजेश व राधिका पुन्हा घरी राहायला आले. राधिकाने अडगळीची खोली स्वतःसाठी तयार करून घेतली होती. ती घरातील कामे आणि सासूबाईंनी सेवा दोन्ही इमाने इतबारे करू लागली. सासूबाईंची हाक ऐकून अर्ध्या रात्रीसुद्धा … Read more

पारख – भाग २(अंतिम भाग)

” सगळं काही निभावून गेलं ह्यातच सगळं काही आलं…तसे माझ्याकडे जास्त पैसे जमा नव्हते पण वेळेवर सोय झाली पैशांची…” संजय म्हणाला. ” कशी काय…?” सुगंधा ने विचारले. ” अगं जवळचं सोनं गहाण ठेवलं आणि बाकीच्या पैशांची सोय केली…आता जसे पैसे येतील तसे सोडवून आणेल…” संजय म्हणाला. सोनं गहाण ठेवलं हे ऐकून दोन्ही मायलेकी एकदमच उडाल्या. … Read more

पारख – भाग १

सीमाच्या सासूबाईंची सरलाताईंची चिडचिड अखंड सुरूच होती. काय तर म्हणे आज सीमाने चहात आलं नाही टाकलं. सीमा मात्र सवयीप्रमाणे सासूबाईंचे सगळेच गपगुमान ऐकून घेत होती. आणि आपले काम करत होती. सासूबाईंनी चहा घेतला आणि त्या शेजारच्या विमल काकूंकडे गप्पा मारायला निघून गेल्या. विमल काकू भाज्या निवडत होत्या. त्यांना पाहून सरला ताई म्हणाल्या. ” काय ग…दिवसभर … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)

पण हा सगळा वाद होताना पाटील सरांनी वेळेचे गांभीर्य ओळखून सावीच्या वडिलांना सागरच्या येण्याचे फोन करून कळवले होते. सावीच्या वडिलांना ही सूचना मिळताच ते तडक सावीच्या भावाला घेऊन तिथे आले. त्यांना दुरूनच येताना पाहून सागर पटकन गाडीवर बसून निघून गेला. जास्त वाद वाढू नये म्हणून सावीच्या वडिलांनी त्याचा जास्त पाठलाग केला नाही. त्या दिवशी सावी … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ६

” माझ्यासमोर तोंड वर करून बोलण्याआधी तू हे लक्षात ठेव की कायद्याने तू अजूनही माझी बायको आहेस…त्यामुळे मी जे म्हणेल तुला तसेच करावे लागेल…” सागर म्हणाला. ” आज मी तुमचा माझा नवरा असण्याचा हक्क नाकारत आहे…शिवाय कायदेशीर रित्या सुद्धा लवकरच तो हक्क संपेल…पण माझ्या मनातून तुम्ही केव्हाच उतरले आहात…या आधी तुमचं सगळं काही निमूटपणे ऐकुन, … Read more

गोष्ट एका लग्नाची- भाग ५

आणि दुसऱ्या अपेक्षा तरी काय करायला पाहिजे होत्या सागरने. त्याच्या या प्रेमाचा पाया सुद्धा कुणालातरी फसवूनच रचला गेला होता. त्याने एका क्षणिक मोहाला बळी पडून, पुढचा मागचा काहीही विचार न करता आपल्या लग्नाच्या बायकोला सोडून दिले होते. ज्या बायकोने ह्याचे बाहेरचे प्रकरण घरी समजल्यावर देखील ह्याचा तिरस्कार न करता ह्याला प्रेमाने पुन्हा परत मिळवण्यासाठी प्रयत्न … Read more