गोष्ट एका लग्नाची – भाग २

दोघांची मैत्री प्रेमात कधी बदलली आणि त्या प्रेमाचे पर्यावसान अनैतिक नात्यात कधी झाले हे त्यांचे त्यांना देखील कळले नव्हते. सागरच्या बदललेल्या वागणुकी कडे सावी त्याछावर कामाचा ताण असेल म्हणून दुर्लक्ष करायची. पण हळूहळू सावीच्या लक्षात यायला लागले होते. आणि आता सागरला सुद्धा सावी सोबत राहायची इच्छा नव्हती. त्याला आता श्वेता सोबत लग्न करायचं होतं. दोघांनीही … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग १

” काय आहे हे…अशी असते का भाजी…साधी भाजी कशी करावी हे सुधा कळत नाही का तुला…तुझ्या हाताला चवच नाही… हाताला काय तुझ्या कोणत्याच गोष्टीला चव नाही…मूर्ख कुठली…” सागर ओरडला आणि तसाच न जेवता जेवणाच्या ताटावरून उठून गेला. सावीला खूप वाईट वाटले. आजकाल हे नेहमीचेच झाले होते. सागरला सावीची कुठलीच गोष्ट आवडत नव्हती. सुरुवातीला हे प्रमाण … Read more

माझिया माहेरा

वैशाली बस मधून उतरली आणि तिच्या मुलाला सार्थकला कडेवर घेऊन खाली मानेने एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होते की दरवेळी प्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली आहे तिला. जुनाट साडी, हाती सामानाची लहानशी बॅग, अंगभर … Read more

किंमत नात्यांची – भाग २ ( अंतिम भाग)

भाग २- किंमत नात्यांची भावाने घरच्या कामात मदत व्हावी म्हणूनच तिला आग्रहाने पंधरा दिवस आधी बोलावून घेतले होते. आणि म्हणूनच वहिनी सुद्धा कधी नव्हते इतकी गोड वागत होती तिच्याशी. त्या दिवशी सरिता खूपच उदास झाली होती. तरीपण जड मनाने ती दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून लग्नात जायला तयार झाली. मुलांना सुद्धा तयार केले. प्रभाकर घरूनच लग्नाच्या … Read more

किंमत नात्यांची – भाग १

” अगं सरिता…अजून वेळ आहे लग्नाला…आताच जाण्याचा हट्ट का करत आहेस तू…” प्रभाकर सरिताला म्हणाला. ” अहो मला जायलाच हवं…दादाने दोनदा फोन केला मला… म्हणाला लग्नाच्या पंधरा दिवस आधी तरी ये म्हणून…” सरिता उत्साहाने म्हणाली. ” अगं पण मागच्या वेळेला काय झालं ते विसरलीस का तू…मला तरी वाटतं की तू लग्नाच्या एक दोन दिवस आधी … Read more

तुझ्याविना – भाग २ (अंतिम भाग)

लवकरच दोघांचाही घट’स्फो’ट झाला. ह्या धक्क्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. मीराला त्या अवस्थेत पाहून माधवच्या आईला खूप वाईट वाटत होते. मीराच्या वडिलांनी जरी माधव आणि मीराच्या लग्नाला नकार दिलेला असला तरी यात मीराची काहीच  नाही हे माधवची आई जाणून होती. आणि म्हणूनच आपला आधीचा अपमान विसरून माधवच्या आईने पुन्हा एकदा मीराच्या आईजवळ माधव आणि … Read more

तूच आहेस तुझी खरी सोबती

सुजयला जाऊन पंधरा दिवस झाले होते. सुरेखा अजूनही सावरली नव्हती. सुजय आता या जगात नाही हे अजूनही तिने स्वीकारलं नव्हतं. तिची नऊ वर्षांची मुलगी स्वरा देखील या सर्वांमुळे खूप कावरीबावरी झालेली होती. आधी वडिलांचे या जगातून जाणे आणि आईची अवस्था सुद्धा खूप बिकट होती. घरी आलेले पाहुणे निघून जात होते. तिने तिच्या दादा आणि वहिनीला … Read more