सूर तेच छेडीता..!

   वृंदा हातात भलीमोठी बॅग घेऊन घराबाहेर निघत होती. तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने विनयकडे पाहिले. तो मात्र तिच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. कारण तिच्या नजरेत त्याच्यासाठी असंख्य प्रश्न होते. आणि विनयकडे तिच्या प्रश्नांना ना उत्तरे होती ना तिच्यासाठी दोन धीराचे शब्द.    आज पहिल्यांदा असे झाले … Read more

तूच आहेस तुझी खरी सोबती

सुजयला जाऊन पंधरा दिवस झाले होते. सुरेखा अजूनही सावरली नव्हती. सुजय आता या जगात नाही हे अजूनही तिने स्वीकारलं नव्हतं. तिची नऊ वर्षांची मुलगी स्वरा देखील या सर्वांमुळे खूप कावरीबावरी झालेली होती. आधी वडिलांचे या जगातून जाणे आणि आईची अवस्था सुद्धा खूप बिकट होती. घरी आलेले पाहुणे निघून जात होते. तिने तिच्या दादा आणि वहिनीला … Read more

खरंच प्रेम आंधळं असावं का ?

अंजु सतरा वर्षांची एक चुणचुणीत मुलगी. नुकतीच वयात आलेली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपल्या आईवडिलांसह आनंदाने राहत होती. घरात आईवडील, एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. छोटे पण सुखी कुटुंब. घरात सुख नांदत होते. पण त्यांच्या या सुखी कुटुंबाला कुणाची तरी नजर लागणार होती. भविष्यात त्यांच्यापुढे काहीतरी अनपेक्षित घडणार होते. आणि ह्याला कारण ठरली अंजु. … Read more

खरी संपत्ती

  सदा स्वतःशीच बडबड करायचा. मिळेल ते काम करायचा. मिळेल ते खायचा. कसली तक्रार नाही की कसला त्रास नाही. मध्येच देवाचं नाव घ्यायचा. पाहणाऱ्याला एखाद्या अवलिया सारखा वाटायचा तो. पण तो एक सांसारिक व्यक्ती होता. चारचौघां सारखा त्याचा देखील संसार होता. बायको अन् दोन मुलं.   घरची परिस्थिती फारशी वाईट नव्हती. घरी बऱ्यापैकी जमीन होती. … Read more

लेकी बोले सुने लागे

” प्रिया…हे काय घातलस तू… अगं नवीन लग्न झालंय ना तुझं…आजूबाजूचे लोक पाहतील तर काय म्हणतील…आणि तसंही आपल्या घरी नाही चालत असा पंजाबी ड्रेस घातलेला…तू घरी साडीच घालत जा… तसंही साडी खूप शोभते हो तुला…” शोभाताई आपल्या सूनबाई ला म्हणाल्या. तसा प्रियाचा चेहरा उतरला. दीड महिन्यांपूर्वी शोभाताईंच्या घरी सून म्हणून आलेली प्रिया आजवर साडीतच वावरत … Read more

शालू – एक अविस्मणीय भेट

“अरे सुयश…अजुन तयार सुद्धा झाला नाहीस…खरेदीला जायला उशीर होतोय आपल्याला… मुलीकडच्यांची तयारी सुद्धा झाली असेल…आपण उशिरा जाणे बरे दिसणार नाही…” वृंदा काकू सुयशला आवाज देत म्हणाल्या. ” हो आई…मी तयारच होत आहे…दहा मिनिटात आवरून खाली येईल…” सुयश म्हणाला. इतक्यात त्यांची मोठी सून पल्लवी आवरून हॉल मध्ये आली आणि म्हणाली… ” आई…तसा आपल्याला फारसा उशीर झालेला … Read more

प्रेम व्यक्त करणं सुद्धा गरजेचं असतं.

नचिकेतला सकाळी उठायला जरा उशीरच झाला. आज त्याचा वाढदिवस होता आणि रात्री येणाऱ्या शुभेच्छांच्या मेसेजेस ला रिप्लाय दिल्याने त्याला झोपेतून उठायला उशीर झाला होता. नंदिनी रोजप्रमाणे पहाटेच उठून तिच्या नेहमीच्या कामामध्ये व्यस्त होती.    नचिकेत पटापट फ्रेश होऊन किचन मध्ये आला. आणि नंदिनीला म्हणाला…   ” गुड मॉर्निंग…”   ” गुड मॉर्निंग…आज काय चक्क सकाळी … Read more

गोष्ट एका साडीची

सुविधा लग्न करून इनामदारांच्या घरी सून बनून आली आणि तिने हळूहळू सर्वांची मने जिंकायला सुरुवात केली. सुविधा स्वयंपाकात हुशार होती. बोलण्यात मधुर होती. सर्वांना आपलेसे करण्याची जादू होती तिच्या बोलण्यात. फक्त थोडासा बालिशपणा होता. घरात सासू, सासरे, तिचा नवरा सुयश आणि ती असे चार जण. नणंद दिव्या विवाहित होती आणि तिचे सासर अगदी दहा मिनिटांच्या … Read more

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग २

इकडे किसन विचार करून बेजार झाला होता. त्याने जर रावसाहेबांना नकार दिला तर सरिताचा संसार तुटेल आणि तिला कायमचे माहेरी येऊन राहावे लागेल. आणि जर लग्नाला होकार दिला तर दोन्ही बहिणी एकमेकींच्या सवती बनतील. त्या रात्री किसनला झोप आली नाही. बापाच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून धाकट्या मुलीने अंजुने शेवटी न राहवून त्याला त्याच्या काळजीचे कारण विचारले. … Read more

घटस्फोट – आयुष्याचा शेवट की नवीन सुरुवात ?

  ” ह्या तुमच्या लेकीला अगदी कशाचेही वळण नाही…हिला चारचौघांत न्यायची सुद्धा लाज वाटते मला…मी हिला वागवणार नाही म्हणजे नाही…” अजय तावातावाने बोलत होता.    स्वाती मात्र त्या बैठकीत एका कोपऱ्यात भीतीने थरथरत उभी होती. तिची आई तिला सावरत होती पण मनाने स्वातीची आई देखील खूप घाबरली होती. फक्त त्यांना भीती चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती … Read more