सासुबाई नव्हे आईच !

नुकतीच कपडे वाळत घालून आलेली स्नेहल किचन मध्ये आली आणि तिने सासूबाईंना विचारले. ” माझे कपडे वाळू घालून झालेत सासुबाई…आता काय करू…?” ” मी पुरण पोळ्या केल्यात…आता तू या साध्या पोळ्या टाकून घे…तोवर मी तळणाची तयारी करते…” सासुबाई म्हणाल्या. ” ठीक आहे…” स्नेहल म्हणाली. आणि पोळ्या करायला सुरुवात केली. आज दिवाळीचा दिवस असल्याने दोन्ही सासू … Read more

समाधानातील सुख

सुहास बऱ्याच दिवसांनी आज त्याच्या गावातील घरी आला होता. तीन खोल्यांचे लहानसे घर होते. सरळ रांगेत तीन खोल्या आणि मागे न्हाणी. कौलारू पण मजबूत. अजूनही चांगल्या स्थितीत होतं. फक्त थोडी साफसफाई आणि रंग दिला की झालं. त्याने घर नीट पाहून घेतले आणि घराबाहेर निघून मनातल्या मनात कसलातरी हिशेब करत होता. इतक्यातच त्याच्या घराच्या बाजूला एका … Read more

पैशांनी सगळंच मिळत नाही.

” हे काय वृषाली…नाही नाही म्हणत आठ महिने झाले आहेत आपल्या लग्नाला…पण अजूनही तू माझ्यासोबत माझ्या नोकरीच्या ठिकाणी राहायला आलेली नाहीस…मी कंटाळलो आहे आता बाहेरचं जेवून…” अजित काहीशा रागानेच म्हणाला. ” मला कळतंय रे…तुलाही वाटतच असेल ना मी तुझ्यासोबत असावं म्हणून…पण तू समजुन घे ना…आईंची तब्येत अशी असताना मी तुझ्यासोबत येणं बरोबर आहे का…?” वृषाली … Read more

तू चाल पुढे – भाग २ (अंतिम भाग)

भाग २ – मोहन आणि राधा माहेरी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नव्हती. जिथे आधी राधा च्या नवऱ्याच सगळ्यांना कौतुक होतं तिथे आता त्याच्या नावाने सुद्धा लोक नाक मुरडत. राधा इतक्या दिवसात फक्त एकदाच तिच्या माहेरी गेली होती पण तिथे सगळ्यांनीच तिला वाईट वागणूक दिली. आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला दिल्या घरी सुखी राहा असाच सल्ला … Read more

तू चाल पुढे – भाग १

( सत्यघटनेपासून प्रेरित ) मोहन सोबत राधाचं लग्न झालं अन् ती गावातून शहरात राहायला आली. आधी फक्त कधीतरी ती शहरात यायची. बारावीपर्यंत शिक्षणाची सोय गावातच होती. म्हणून शहराशी संबंध हा फक्त कामापुरताच होता. पण राधाला शहराच आधीपासूनच खूप आकर्षण होतं. मोहनच चहाचं दुकान होतं. बऱ्यापैकी चालायचं. म्हणजे तसं चालायला तर चांगलंच चालायचं. पण मोहनच लक्ष … Read more

आनंदी आनंद गडे – भाग १

समिधा आणि सुबोधच लग्न होऊन फक्त पाच महिनेच झाले होते. घरातील सगळेच लोक खुप चांगले होते. सासुबाई आणि नणंद कल्याणी तर तिला कुठल्याच कामाला हात लावू द्यायच्या नाहीत. नवीन सुनेचं सगळ्यांनाच खूप कौतुक होतं. सुबोध सोबत बाहेर फिरायला जाणे तर रोजचेच झाले होते. सासूबाईंनी म्हणजेच नीलिमाताईंनी सुद्धा समिधाचे सगळेच लाड पुरवले, मग ते खाण्या पिण्याच्या … Read more

जगण्याचा अधिकार तिलाही आहे.

आपल्या मुलाला ट्युशनला सोडायला गेलेली वसुधा घरी परतत होती. कॉलनीमधील पार्कमध्ये बसून बायका गोष्टी करत होत्या.  वसुधाला सुद्धा त्यांनी हाक मारली. तशी वसुधा त्यांच्याजवळ गेली. तिला पाहून वंदना काकू म्हणाल्या. ” अग वसुधा.. आम्ही सगळ्या जणी विचार करतोय की एकदा रोहिणीला भेटून येऊ म्हणून…” ” बिचारी कशी जगत असेल काय माहिती…अजुन दुःखातून सावरली सुद्धा नसेल…” … Read more

जगण्याचा संघर्ष – भाग १

अभयचे आजी आजोबा नुकतेच घरी आले होते. आज त्यांची पेन्शन काढायला ते तालुक्याला गेले होते. एका सरकारी योजनेतून आजोबा आणि आजीला दर महिन्याला दोन दोन हजारांची पेंशन मिळायची. त्यावर घर कसतरी चालायचं. नेहमीप्रमाणे आज सुद्धा घरी आल्यावर त्यांनी अभयला आवाज दिला आणि त्याच्या हातावर कागदात बांधलेला जिलबीचा पुडा दिला. आणि म्हणाले. ” घे बाळ…तुला आवडते … Read more

तिचा सन्मान जपायलाच हवा – भाग २ (अंतिम भाग )

शेवटी मंदारने एके ठिकाणी गाडी थांबवली आणि म्हणाला. ” हे बघ…किती सुंदर वातावरण आहे…आणि तुझी सोबत असल्याने हे सगळं आणखीनच सुंदर वाटत आहे…” एवढे बोलून तो तिच्या जवळ गेला. आणि हलकेच तिच्या मानेवर किस केला. आणि ती घाबरून लांब पळाली. इतक्यात तो म्हणाला. ” अगं यात घाबरण्या सारखं काय आहे…की तुझा होणारा नवरा आहे…आणि माझा … Read more

तिचा सन्मान जपायलाच हवा- भाग १

मनस्वीला पाहायला पाहुणे आले आणि एका भेटीतच त्यांनी मनस्वी ला पसंत केले. खरंतर इतक्या लवकर पसंती वगैरे होईल ह्याची कल्पना नसल्याने मनस्वीच्या वडिलांची अजुन मनाची तयारी सुद्धा झाली नव्हती. पण त्यांच्या मोठ्या मुलीच्या सुहासीच्या सासरच्यांनी हे स्थळ सुचवले म्हणून ते पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाले होते. पण मुलाकडच्यांनि मनस्वीला पाहताच होकार दिला. मनस्वीच्या बाबांनी स्वतःची पसंती … Read more