अधिकार भाग २ (अंतिम भाग)

” बाबा…माझ्या मनात आहे की आपण आपल्या ह्या वाड्याचे रिनोवेशन करावे…” अनघाचे बोलणे ऐकून विनायक रावांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांना खूप आनंद झाला. वाड्याची डागडुजी करावी हा विचार अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात रेंगाळत होता. पण नवी पिढी ह्यात काही लक्ष घालत नसल्याने त्यांनी सुद्धा हा विचार मनातल्या मनातच ठेवला होता. ” हो बाबा…अनघा … Read more

वेळीच नाही म्हणायला शीक – भाग 2 (अंतिम भाग)

थोड्या वेळाने ती तिच्या रूम मध्ये गेली तेव्हा वृषभ आणि विवान दोघेही झोपी गेले होते. तिने ताप आणि अंगदुखीची गोळी घेतली आणि ती सुद्धा झोपी गेली. सकाळी ती लवकर उठली नाही तेव्हा वृषभ स्वतःहून तिला उठवायला गेला. तिला हात लावल्यावर त्याच्या लक्षात आले की तिला खूप ताप आला होता. त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला आणि … Read more

वेळीच नाही म्हणायला शीक – भाग १

कामे उरकून विशाखा नुकतीच आराम करायला रूममध्ये जाणार इतक्यात वृषभने हॉल मधून तिला आवाज दिला. ” विशाखा…विशाखा…अग बाहेर ये…हे बघ कोण आलंय…?” ती तशीच उठून बाहेर आली. अंगात कणकण होत होती. चालताना थकल्यासारखे होत होते. तिने आज सकाळीच दवाखान्यात जाऊन एक लस घेतली होती. त्यानंतर घरात बरीच कामे पुरली. तिच्या सासुबाई नेहमी प्रमाणे त्यांच्या भजनी … Read more

स्वीकार – भाग २ (अंतिम भाग)

ती पाणी घेऊन बाहेर आली. सर्वजण पाणी पिले. पण बोलायला कोणीच सुरुवात करत नव्हतं. म्हणून शेवटी जान्हवीनेच विषय काढला… ” तुम्ही इथे कसे काय येणे केले…?” ” बरं झालं तूच विचारलस…कारण नेमका विषय कुठून काढावा हे मला कळत नव्हतं…आम्ही आरुष बद्दल बोलायला आलो आहोत…” तिच्या सासुबाई म्हणाल्या. ” त्याचे नाव आरुष नाही आयुष आहे …आणि … Read more

स्वीकार

आज रविवार असल्याने जान्हवी जरा आरामात झोपेतून उठली. तिचा चार वर्षांचा मुलगा अजूनही झोपेतच होता. ती फ्रेश झाली आणि तिने स्वतःसाठी चहा केला. चहाचा कप घेऊन ती तिच्या बेडरूम मधल्या बाल्कनीत आली आणि आरामात बसून चहा प्यायला लागली.   रविवारी निवांत बाल्कनी मध्ये बसून चहा पिणे आणि आदेशच्या आठवणींमध्ये हरवून जाणे हा तिचा आवडता छंद. … Read more

काय भुललीस वरलीया रंगा – भाग २

त्याने तिच्याशी लग्न करायला होकार दिला तशी कावेरी खूप आनंदली. तिने त्याच्यासोबत पळून जायची तयारी केली. आधी पळून जाऊन लग्न करायचे आणि नंतर काही दिवसांनी अजय मुलांना सुद्धा त्यांच्याकडे घेऊन येणार असे त्या दोघांचे ठरले होते. ठरल्या दिवशी कावेरी घरून तिचे आणि तिच्या सासूचे दागिने घेऊन एका लग्नाला जायचे म्हणून बाहेर पडली होती. सोबत नुकतंच … Read more

तूच हृदयात अन् तूच श्वासात या – भाग १

त्या दिवशी पाऊस सुरू होता. तिने तिची स्कूटी ऑफिसच्या बाहेर उभी केली आणि ती ऑफिसमध्ये जाणार इतक्यात समोरून आलेल्या भरधाव बाईकने तिच्या कपड्यांवर रस्त्यावरचा चिखल उडवला.   तिच्या कपड्यांवर चिखल उडाला हे पाहून तो बाईक वरचा तरुण तिथेच थांबला आणि गाडी उभी करून तिला सॉरी म्हणायला गेला. ती आधीच खूप रागात होती. एकतर पावसामुळे ऑफिसला … Read more

सांग कधी कळणार तुला भाग -४ (अंतिम भाग)

पाहुणे निघून गेल्यावर जेव्हा सासुबाई किचन मध्ये आल्या तेव्हा प्रियाने विचारलेच.. ” आई…तुम्हाला माझे नोकरी करणे आवडत नाही का..?” ” आता माझी आवड असो वा नसो…त्याने काही फरक पडणार आहे का…?” सासुबाई म्हणाल्या. ” पण आई…मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना…आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी ह्यासाठी मी पण मोहित च्या बरोबरीने काम करते…घरची कामे … Read more

सांग कधी कळणार तुला भाग ३

सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर प्रिया स्वयंपाक खोली आवरून बेडरूम मध्ये गेली तेव्हा मोहित जागाच होता. प्रिया ला बघून तो म्हणाला. ” आज तुझा पगार झाला असेल ना…?” ” हो.” ” पैशाचं काय केलंस…?” ” माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये आहेत…” ” मग ते माझ्या अकाउंट वर ट्रान्स्फर कर.. मला आपल्यासाठी नवीन कार घ्यायची आहे…काही माझ्याकडे आहेत…आणखी काही … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग २

प्रितीच्या वडिलांना वाटायचे की प्रीतीने स्वतःहून तिच्या सासरी निघून जावे. कारण विवाहित मुलगी माहेरी राहणे त्यांना पटत नव्हते. लोक काय म्हणतील हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आणि ह्या विचाराने त्यांनी कधीच प्रितीच्या डोक्यावरून मायेचा हात सुद्धा फिरवला नाही. प्रीतीचा आधार आता फक्त तिची आई होती. तिला माहेरी येऊन सात महिने झाले तरीही पंकज … Read more