फरक – भाग २ (अंतिम भाग)

” आई…पूजेत बसल्याने खरंच कुणी थकत असतं का…आणि मी दिवसभर सांभाळले ना सगळे काही… जशी ती थकते तशीच मीही थकतेच ना…मग आज जर माझी तब्येत बरी नाही तर तुम्ही किंवा विशाखा ने केला एक दिवस स्वयंपाक तर काही बिघडणार का…?” राधा म्हणाली. आता मात्र सासूबाईंचा पारा चढला. त्या रागानेच राघवकडे पाहत म्हणाल्या. ” बघितले तुझ्या … Read more

फरक – भाग १

राघव नुकताच घरी आला होता. आज घरचे दुकान जरा उशीराच बंद केले होते. नवीन मालाची तपासणी करताना आधीच राघवला उशीर झाला होता. तितक्यात घराच्या दारात पाय ठेवताच त्याची आई त्याला म्हणाली. ” राघव…जरा चौकातून आइस्क्रीम घेऊन येतोय का…? विभासला आईस्क्रीम खायची आहे पण फ्रीज मधली संपलीय…” ” हो आई…” राघव म्हणाला. पण आता यावेळी त्याची … Read more

रक्षण नात्याचे बंधन प्रेमाचे – भाग २ (अंतिम भाग)

राधिकाचा मुलगा श्लोक थोडा मोठा झाल्यावर मात्र तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. प्रायव्हेट नोकरी मिळाली सुद्धा. पगार कमी होता पण काम चांगले होते. राधिका आता आर्थिक रित्या सक्षम होत होती. तिच्या पैशातून घराला हातभारच लावत असल्याने तिच्या सासूने ही तिच्या नोकरी करण्याला विरोध केला नाही. आणि राधिकाच्या नवऱ्याला सुद्धा चांगला पगार होता. शिवाय सासरेबुवांची पेंशन … Read more

रक्षण नात्याचे बंधन प्रेमाचे – भाग १

राधिका ऑफिसमधून घरी आली आणि तिचा लहानगा श्लोक आई आई करत तिला जाऊन बिलगला. राधिकाने सुद्धा त्याला प्रेमाने मिठीत घेतले आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. मायलेकाच हे रोजचंच होतं. श्लोक रोज संध्याकाळी आईची वाट पहायचा आणि आई दिसताच तिला जाऊन मिठी मारायचा आणि आज दिवसभर शाळेत काय घेडके आणि काय नाही ते तिला सांगायचा. त्यानंतर … Read more

जगावेगळे नाते आपुले – भाग ३ ( अंतिम भाग)

मयंक मात्र तोवर जर्मनीला निघून गेला होता. मधुरा मात्र अजूनही तिच्या सासू सासर्यांकडेच राहत होती. कारण ती ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेच्या परीक्षा आता जवळ आलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने स्वतःचे दुःख न कुरवाळता मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे ठरवले होते. मयंकने वसंतराव आणि नीलिमा ताईंना त्यांची मन शरमेने खाली … Read more

जगावेगळे नाते आपुले – भाग २

तेव्हा मात्र वसंतरावांनी मयंककडे मधुराला सोबत नेण्याबद्दल पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर मात्र मयंकने त्यांच्याशी बोलणे थोडे कमी केले असल्याचे त्यांना जाणवले. मधुरा सुद्धा मयंक ची खूप आतुरतेने वाट पाहत होती. हो नाही करत शेवटी लग्नाला दहा महिने झाले तेव्हा मयंक भारतात परतला. घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मधुराला तर जणू पंखच लागले होते. तिच्या चेहऱ्यावरील … Read more

जगावेगळे नाते आपुले – भाग १

आज देशमुखांच्या घरात पूजा होती. त्यानिमित्ताने सगळी साग्रसंगीत तयारी केलेली दिसत होती. सोसायटी मधील महिला आणि दूरचे नातेवाईक एक एक करून येत होते. पूजेला सुरुवातच होणार होती. बायका आपापसात कुजबुज करत होत्या. बाजूच्या सामंत काकू म्हणाल्या. ” ह्याचं पण भलतंच काहीतरी सुरू असतं हा…पूजा करतायेत ते ठीक आहे एकवेळ…पण त्या निमित्ताने घराची सजावट काय केलीय…आणि … Read more

लग्न झालं की सुधारेल ? – भाग २ (अंतिम भाग)

” अग लग्न मोडल्याचा पुरुषांवर काहीच परिणाम होत नाही…त्यांना तर आरामात दुसरी बायको मिळते…कठीण असतं ते बायकांसाठी…त्यांना समाजाचे दूषण मिळतात…” काकू म्हणाल्या. ” नाही काकू…आजकाल जग बदलतंय…आधी पुरुषाचे दुसरे लग्न असेल तरीही त्याला आरामात मुलगी मिळायची लग्नाला…पण आता मात्र मुलीकडचे खूप चौकशी करतात…आधीच लग्न का मोडल…वगैरे वगैरे…आणि डिव्होर्स घेणे हा काही अपराध नाही ज्यामुळे घटस्फोटित … Read more

लग्न झालं की सुधारेल ? – भाग १

नेहा सहजीवन सोसायटी मध्ये राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. निशांत ऑफिस मध्ये गेल्यावर दिवसभर नेहा एकटीच घरी राहायची. नवीन सोसायटी असल्याने अजून तिची इथे फारशी ओळख सुद्धा झालेली नव्हती. पण शेजारच्या मीना काकू मात्र तिच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या. मीना काकू पहिल्या दिवशीच नेहाची विचारपूस करायला तिच्याकडे आल्या होत्या. आणि तेव्हापासून त्यांचे नेहाच्या … Read more

नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग २ (अंतिम भाग )

” कधी सांगणार आहेस… तुझं लग्न झाल्यावर…अरे तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या घरच्यांना आपल्याबद्दल सगळं सांगितलं होतं…आता कोणत्या तोंडाने मी त्यांना सांगू की आदित्यच्या लग्नासाठी मुली पाहणं सुरू झाल्या आहेत म्हणून…कसं सांगू की आदित्य ने त्यांच्या बोलण्याला अजिबात सीरिअसली घेतलेलं नाही म्हणून…?” रेवती म्हणाली. ” अगं इतकी मोठी गोष्ट सुद्धा नाही बघ ही…आता फक्त सुरूच … Read more