वास्तू – भाग २ (अंतिम भाग)

” विशेष असे काहीही झाले नाही…फक्त आपण ज्या घरात इतकी वर्षे राहीलो आहोत ते घर सोडवत नाहीय हो…” कावेरी ताई म्हणाल्या. पण कावेरीताईंच्या अशा अचानक बदललेल्या निर्णया मागे हे कारण निश्चितच नाहीय हे सुधाकररावांना मनोमन कळले होते. पण त्यांनी ते कारण त्यांना सगळ्यांसमोर विचारले नाही. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. त्यानंतर सुधीर म्हणाला. ” … Read more

वास्तू – भाग १

रविवार असल्याने सुधीर आणि सुजाता बाहेर फिरायला गेले होते. घरी कावेरीताई आणि सुधाकरराव दोघेच होते. तसेही त्यांना आता या एकटेपणाची बऱ्यापैकी सवय झालेली होती. आधी नोकरीच्या निमित्ताने दोघेही सतत माणसांच्या गर्दीत असायचे. कावेरी ताई सरकारी इस्पितळात नर्स होत्या तर सुधाकरराव जिल्हा परिषदेत क्लर्क होते. पण आता मात्र रिटायरमेंट नंतर दोघेही एकमेकांच्या सोबतीने स्वतःचे एकटेपण दूर … Read more

अविश्वास – भाग ३

” मग आता तुला कसं कळलं की तुला गैरसमज झाला होता…?” आई ने विचारले. ” तो नंबर सीमा ताईचा होता… आताच ताईचा कॉल येऊन गेला आणि मला कळलं की माझ्या हातून खूप मोठी चूक झालीय…मी लगेच तिची माफी मागतो जाऊन…आणि तिला परत घेऊन येतो…” असे म्हणून कुणाल पुन्हा चावी शोधू लागला. त्याची आई मात्र विचारात … Read more

अविश्वास – भाग २

” तुमच्या मुलीच्या प्रियकराचा फोन आला होता…तिचं काहीतरी प्रकरण सुरू आहे बाहेर…” कुणाल दात खाऊन बोलला. ” असं नाही असू शकत…तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कुणालराव…माझी कल्याणी अशी नाहीच…” कल्याणीचे वडील काकुळतीला येऊन म्हणाले. ” तुम्ही तर असेच म्हणणार ना…पण मी तुमच्या बोलण्यात येणार नाही…घ्या तुमच्या लेकीला आणि चालते व्हा येथून…” कुणाल म्हणाला. ” हे काय … Read more

अविश्वास – भाग १

कल्याणी आणि कुणाल ह्यांच्या लग्नाला जवळपास महिना  झाला होता. कल्याणी अजूनही घरातल्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होती. सगळ्यांना काय हवं काय नको ते विचारत होती. कल्याणीच्या सासरी तिचे सासू सासरे, नवरा आणि ती असे एकूण चारच सदस्य होते. एक नणंद घराचा कारभार एकहाती सासूच्या ताब्यात होता. त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची जास्त हिम्मत होत नसे. अगदी कल्याणी … Read more

स्वतःची चूक लवकर लक्षात येत नाही.

अमित कालपासून खूप आनंदात होता. त्याची लाडकी बहीण अवनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने काल घरी आली होती. अवनी अमितपेक्षा लहान पण दोघा बहीण भावांचे खूप पटायचे. दोन वर्षांपूर्वी अवनीचे लग्न राहुल सोबत झाले होते. राहुलचे शहर त्यांच्या शहरापासून चार तासांच्या अंतरावर होते. पण मुलगा चांगला आहे हे पाहून अवनीच्या आईवडिलांनी तिचं सासर दूर होईल ह्याचा जास्त विचारच … Read more

अपेक्षा – भाग २

अपेक्षा – भाग २ हिच्या एक दोन मैत्रिणींचे लग्न झाले होते. आणि लग्नानंतर घराची जबाबदारी आल्याने त्यांचं मैत्रिणींशी संपर्क कमी झाला होता. काय तर वेळच मिळत नाही म्हणून. निशाला वाटायचे की एकत्र कुटुंबात लग्न केलं तर आपलीही हीच गत होईल. तिची एक मैत्रीण रिमा चांगल्या श्रीमंत घरची सून बनली होती. दर आठवड्याला तिचे चांगले चांगले … Read more

अपेक्षा – भाग १

आज निशाचे मामा अचानक तिच्या घरी आले होते. निषाचे मामा त्याच शहरात राहायचे पण कामानिमित्ताने जाणे येणे जरा कमीच व्हायचे. त्यांना पाहून निशाच्या आईला खूप आनंद झाला. निशाचे बाबा त्यांना म्हणाले. ” काय दिवाकर आज अचानक आलास… आताच माझं जेवण झालं बघ…आधी सांगितले असते तर सोबतच जेवलो असतो…” ” इथे जवळच काम होते मला…एका मित्राच्या … Read more

न्याय – भाग २ (अंतिम भाग)

भाग २ सासुबाई श्रेया ला प्रत्येक बाबतीत टोकायची. तिने घातलेल्या कपड्यांवरून. तिच्या जेवणाच्या पद्धती वरून. तर कधी त्यांना तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या आवडायच्या नाहीत. मग तिच्या मैत्रिणींसमोरच त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. श्रेयाला आजीचे हे वागणे अजिबात आवडत नसे. पण आईने सक्त ताकीद दिलेली होती की आजीला कधीही उलटून बोलायचे नाही म्हणून ती नाईलाजाने गप्प … Read more

न्याय – भाग १

प्रतिभा आणि प्रकाशराव यांना घरी यायला थोडा उशीरच झाला होता. एव्हाना जवळचे सगळेच नातेवाईक प्रतिभाच्या आईकडून प्रतिभाची वहिनी म्हणजेच सुषमा शी भांडायला जमले सुद्धा होते. एखाद्या चांगल्या कामांसाठी भलेही थोडा उशीर होईल पण अशा न्याय निवाड्याच्या बैठकीला मात्र कुणी सहसा उशीर करत नाही. पण यात मुख्य भूमिका होती ती म्हणजे प्रतिभा आणि प्रकाशरावांची. कारण आपल्या … Read more