वर्चस्व – भाग ५

ठरल्याप्रमाणे मनीषाचे आईवडिल अगदीच घाईघाईत मनिषाच्या सासरी यायला निघाले देखील. पण त्यांना खूपच काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी मनिषाला फोन केला. पण मनिषाचा फोन त्यावेळी व्यस्त असल्याने तिचा फोन लागला नाही. आणि मनिषाला सुद्धा आई बाबांचा फोन आलेला कळला नाही. मग काळजीने मनिषाच्या वडिलांनी सुधीरला फोन केला. तेव्हा सुधीरने त्यांचा फोन उचलला. मनिषाचे वडील सुधीरला … Read more

वर्चस्व – भाग ४

थोड्याच वेळात मनीषाने दरवाजा उघडला आणि सुमेधा दात ओठ खात तिला म्हणाली. ” काय ग वहिनी…तुला काही वाटत नाही आहे का…माझ्या आईचं वय बघ काय आहे…आणि या वयात तिला काम करावं लागत आहे…आणि तू दिवसभर नुसती लोळत बसली आहेस…फोनवर गप्पा काय मारत आहेस…बाहेरून नाश्ता काय मागवते आहेस…आपली म्हातारी सासू काम करत आहे हे तुझ्याच्याने पाहवते … Read more

वर्चस्व – भाग ३

त्या दिवशी मनिषाला रात्रभर झोप आली नाही.रात्रभर ती कुस बदलत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला तिच्या नवऱ्याचा रोष सहन करावा लागत होता. तिने सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला आणि मनातल्या मनात एक निर्धार केला.आज ती उपाशीच असल्याने तिला झोप येत नव्हती. तिने विचार केला की जे काही घडून गेलय किंवा घडत आहे ह्यात आपली … Read more

वर्चस्व – भाग २

मनीषा घरी आली. तिने घरी आल्यावर कपडे बदलले आणि पुन्हा रात्रीचा स्वयंपाक करायचा म्हणून स्वयंपाकघरात गेली. सासुबाई हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यांनी मनिषाकडे पाहिले पण मनीषाने मात्र त्यांच्याकडे पाहिलेच नाही. काम करताना सुद्धा मनिषाच्या मनात साठे काकूंचे बोलणे घुमत होते. मनीषा अगदीच रडवेली झाली होती. आपण सगळ्यांची इतकी सेवा करतो. कधीच कुठल्या तक्रारीला जागा ठेवली नाही. … Read more

वर्चस्व – भाग १

” काय करताय सुधिरची आई…” साठे काकू दारातून आत येत म्हणाल्या. ” काही नाही हो…आज जरा बरं वाटत नाही आहे…म्हणून म्हटलं थोडा आराम करावा…” वृंदाताई म्हणजेच मनिषाच्या सासुबाई म्हणाल्या. ” आता या वयात इतकी कामे कराल तर तब्येत तर बिघडणारच ना…” साठे काकू मनीषा कडे तिरकस पाहत बोलल्या. तसे मनिषाच्या सासूबाईंनी तिला किचन मध्ये जाऊन … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)

पण हा सगळा वाद होताना पाटील सरांनी वेळेचे गांभीर्य ओळखून सावीच्या वडिलांना सागरच्या येण्याचे फोन करून कळवले होते. सावीच्या वडिलांना ही सूचना मिळताच ते तडक सावीच्या भावाला घेऊन तिथे आले. त्यांना दुरूनच येताना पाहून सागर पटकन गाडीवर बसून निघून गेला. जास्त वाद वाढू नये म्हणून सावीच्या वडिलांनी त्याचा जास्त पाठलाग केला नाही. त्या दिवशी सावी … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ६

” माझ्यासमोर तोंड वर करून बोलण्याआधी तू हे लक्षात ठेव की कायद्याने तू अजूनही माझी बायको आहेस…त्यामुळे मी जे म्हणेल तुला तसेच करावे लागेल…” सागर म्हणाला. ” आज मी तुमचा माझा नवरा असण्याचा हक्क नाकारत आहे…शिवाय कायदेशीर रित्या सुद्धा लवकरच तो हक्क संपेल…पण माझ्या मनातून तुम्ही केव्हाच उतरले आहात…या आधी तुमचं सगळं काही निमूटपणे ऐकुन, … Read more

गोष्ट एका लग्नाची- भाग ५

आणि दुसऱ्या अपेक्षा तरी काय करायला पाहिजे होत्या सागरने. त्याच्या या प्रेमाचा पाया सुद्धा कुणालातरी फसवूनच रचला गेला होता. त्याने एका क्षणिक मोहाला बळी पडून, पुढचा मागचा काहीही विचार न करता आपल्या लग्नाच्या बायकोला सोडून दिले होते. ज्या बायकोने ह्याचे बाहेरचे प्रकरण घरी समजल्यावर देखील ह्याचा तिरस्कार न करता ह्याला प्रेमाने पुन्हा परत मिळवण्यासाठी प्रयत्न … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ४

” तुला काय वाटतं…असा कफल्लक झालेला तू मला तरी माझ्या आयुष्यात हवा असणार आहेस का…आणि तू काय मला सोडशील… मी स्वतःच तुला सोडतेय…म्हणूनच तर आज हे सगळं तुझ्यासमोर बोलून दाखवलं ना…आणि फसवणुकीची भाषा तू तरी न केलेलीच बरी… स्वतःच लग्न झालेलं असताना बायकोला फसवून बाहेर अफेयर करताना कुठे गेला होता तुझा सच्चेपणा…तुझ्या बायकोला जेव्हा माझ्यासाठी … Read more

गोष्ट एका लग्नाची – भाग ३

त्यामुळे त्या दिवशी सगळेजण घरी निघून गेले. कोर्टाने पुन्हा दोन महिन्या नंतरची तारीख दिली होती. कोर्टात हजर राहायच्या आदल्या दिवशी सागरच्या दुचाकीला अपघात झाला होता. आणि त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. म्हणून त्याचा नाईलाज झाला त्या दिवशी. आणि तो कोर्टात हजर नाही राहू शकला. घटस्फोट पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे तो मनातल्या मनात बराच चरफडला. पण … Read more