माझिया माहेरा

वैशाली बस मधून उतरली आणि तिच्या मुलाला सार्थकला कडेवर घेऊन खाली मानेने एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होते की दरवेळी प्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली आहे तिला. जुनाट साडी, हाती सामानाची लहानशी बॅग, अंगभर … Read more

प्रेमाची परिभाषा

ऋषिकेश ऑफिस साठी निघणार इतक्यातच त्याच्या आईने त्याला हाक मारली आणि म्हणाली. ” ऋषी…सुशांत च्या लग्नाला आता फक्त 10-12 दिवस उरलेत…आणि तू अजूनही ऑफिसमधून सुट्टी घेतलेली नाही…” ” अगं पण आई अजुन बराच वेळ आहे…लग्नाला चार पाच दिवस राहिले की घेईल सुट्टी…तसेही लग्नाची तयारी तर बऱ्यापैकी झालेली आहे…तू आणि मीनल स्वतः सगळ्या तयारी करत आहात…शिवाय … Read more

रंग माळीयेला – भाग २(अंतिम भाग)

अमृताच्या वडिलांनी लवकरच अमृतासाठी एक त्यांच्या तोलामोलाचा मुलगा पसंत केला. मुलगा घरी चांगलाच श्रीमंत होता. नोकरी सुद्धा चांगली होती. मुलाने पहिल्या भेटीतच अमृताला पसंत केले. आणि लग्नाचा मुहूर्त सुद्धा लवकरच काढला होता. अमृताच्या होकाराचा तर प्रश्नच येत नव्हता. घरच्यांनी अमृताचे लग्न ठरवले आणि लग्नाच्या तयारीला लागले. लग्न अगदीच थाटामाटात करायचे ठरवले होते. अमृता उदास मनाने … Read more

रंग माळीयेला – भाग १

अमृताच्या लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करून घरी यायला सगळ्यांना बराच उशीर झाला होता. सगळेच थकलेले होते. पण शरीराने. ह्या सगळ्यांपासून वेगळी अमृता मनाने थकली होती. ती खूप उदास होती. घरात लग्नाच्या जोरदार तयारी चाललेल्या होत्या. पण ही मात्र मनाने कुठेतरी दूर हरवलेली होती. हिला काहीच करायची इच्छा नव्हती. तिला राहून राहून वाटत होते की हे लग्न … Read more

ती सुद्धा आईच आहे…!

” अग ए शालू…पोरगा केव्हापासून रडतोय…पहिल्यांदा याला बघ…राहू दे घरातली कामं…” शकू आत्याने शालूला आवाज दिला. तेव्हा शालू जरा तणतणतच बाळा जवळ आली आणि बाळा ला जवळ घेतले आणि मनातल्या मनातच म्हणाली. ‘पोरगा लहान आहे तर रडणारच ना…आताच दूध पाजून गेली आहे…ह्यांना काय कळणार म्हणा…ह्यांना कुठे मुलबाळ आहे…ह्यांनी थोडा वेळ बाळाकडे बघितलं असतं तर काय … Read more

तिला समजून घेताना – भाग २ (अंतिम भाग)

कार्तिक संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला घर खूप सूने वाटत होते. रोज घरी आल्यावर मयुरी त्याला त्याच्या आवडीचा गरमागरम चहा करून द्यायची आणि दिवसभरात काय घडलं ह्याची विचारपूस करायची. त्यावेळी मात्र कार्तिक चिडून “तुला काय त्याचं ?” असे म्हणायचा. तरीही त्याच्यावर रागवायचे सोडून ती दुसऱ्या दिवशी प्रेमाने पुन्हा तीच चौकशी करायची. आज मात्र त्याला खूप … Read more

तिला समजून घेताना – भाग १

कार्तिक आणि मयुरी घरी आले आणि कार्तिकने रागातच स्वतःचा कोट काढून सोफ्यावर भिरकावून दिला. त्यासरशी मयुरी जरा घाबरलीच. कार्तिक मोठ्याने तिला म्हणाला. ” काय ग…एवढीही अक्कल नाही का तुला की पार्टीत जाताना कोणते कपडे घालावेत…गावंढळ कुठली…” ” मला खरंच माहिती नव्हतं की सगळ्या जणी पार्टीत वन पिस घालून येणार आहेत…म्हणून मी साडी घातली…” मयुरीने कसेबसे … Read more

शापित सौंदर्य

आम्हाला नवीन क्वार्टर मध्ये शिफ्ट होऊन महिना झाला होता. एव्हाना आजूबाजूच्या दोन चार घरांशी चांगली ओळख सुद्धा झाली होती. कधीतरी दिसल्यावर बोलणं व्हायचं. मुलगा सुद्धा इतर मुलांसोबत खेळायला जात होता. पण एकाच बिल्डिंग मध्ये अगदी दारासमोर दार असणाऱ्या तिच्याशी अजुन एकदाही बोलणं झालेलं नव्हतं. तशी बोलायला ती नेहमी नेहमी दिसायची सुद्धा नाही. कधीतरी बाहेरचा पॅसेज … Read more

किंमत नात्यांची – भाग २ ( अंतिम भाग)

भाग २- किंमत नात्यांची भावाने घरच्या कामात मदत व्हावी म्हणूनच तिला आग्रहाने पंधरा दिवस आधी बोलावून घेतले होते. आणि म्हणूनच वहिनी सुद्धा कधी नव्हते इतकी गोड वागत होती तिच्याशी. त्या दिवशी सरिता खूपच उदास झाली होती. तरीपण जड मनाने ती दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून लग्नात जायला तयार झाली. मुलांना सुद्धा तयार केले. प्रभाकर घरूनच लग्नाच्या … Read more

किंमत नात्यांची – भाग १

” अगं सरिता…अजून वेळ आहे लग्नाला…आताच जाण्याचा हट्ट का करत आहेस तू…” प्रभाकर सरिताला म्हणाला. ” अहो मला जायलाच हवं…दादाने दोनदा फोन केला मला… म्हणाला लग्नाच्या पंधरा दिवस आधी तरी ये म्हणून…” सरिता उत्साहाने म्हणाली. ” अगं पण मागच्या वेळेला काय झालं ते विसरलीस का तू…मला तरी वाटतं की तू लग्नाच्या एक दोन दिवस आधी … Read more