तुझ्याविना – भाग २ (अंतिम भाग)

लवकरच दोघांचाही घट’स्फो’ट झाला. ह्या धक्क्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. मीराला त्या अवस्थेत पाहून माधवच्या आईला खूप वाईट वाटत होते. मीराच्या वडिलांनी जरी माधव आणि मीराच्या लग्नाला नकार दिलेला असला तरी यात मीराची काहीच  नाही हे माधवची आई जाणून होती. आणि म्हणूनच आपला आधीचा अपमान विसरून माधवच्या आईने पुन्हा एकदा मीराच्या आईजवळ माधव आणि … Read more

तुझ्याविना – भाग १

माधवची आई नुकतीच घरी आली होती. माधवने आईला पाहिले आणि तिला विचारले. ” काय गं आई…यावेळेला जरा जास्तच राहिलीस मामाकडे…” ” हो रे…दादा काळजीत होता यावेळी…म्हणून दोन दिवस जरा जास्त राहिले तिथे…” आई म्हणाली. ” काय ग आई…काय झालंय…सगळं ठीक आहे ना मामाकडे…” माधव म्हणाला. ” मीराच्या घरी जरा प्रॉब्लेम सुरू आहे रे…तिचा नवरा तिला … Read more

सासुबाई नव्हे आईच !

नुकतीच कपडे वाळत घालून आलेली स्नेहल किचन मध्ये आली आणि तिने सासूबाईंना विचारले. ” माझे कपडे वाळू घालून झालेत सासुबाई…आता काय करू…?” ” मी पुरण पोळ्या केल्यात…आता तू या साध्या पोळ्या टाकून घे…तोवर मी तळणाची तयारी करते…” सासुबाई म्हणाल्या. ” ठीक आहे…” स्नेहल म्हणाली. आणि पोळ्या करायला सुरुवात केली. आज दिवाळीचा दिवस असल्याने दोन्ही सासू … Read more

समाधानातील सुख

सुहास बऱ्याच दिवसांनी आज त्याच्या गावातील घरी आला होता. तीन खोल्यांचे लहानसे घर होते. सरळ रांगेत तीन खोल्या आणि मागे न्हाणी. कौलारू पण मजबूत. अजूनही चांगल्या स्थितीत होतं. फक्त थोडी साफसफाई आणि रंग दिला की झालं. त्याने घर नीट पाहून घेतले आणि घराबाहेर निघून मनातल्या मनात कसलातरी हिशेब करत होता. इतक्यातच त्याच्या घराच्या बाजूला एका … Read more

पैशांनी सगळंच मिळत नाही.

” हे काय वृषाली…नाही नाही म्हणत आठ महिने झाले आहेत आपल्या लग्नाला…पण अजूनही तू माझ्यासोबत माझ्या नोकरीच्या ठिकाणी राहायला आलेली नाहीस…मी कंटाळलो आहे आता बाहेरचं जेवून…” अजित काहीशा रागानेच म्हणाला. ” मला कळतंय रे…तुलाही वाटतच असेल ना मी तुझ्यासोबत असावं म्हणून…पण तू समजुन घे ना…आईंची तब्येत अशी असताना मी तुझ्यासोबत येणं बरोबर आहे का…?” वृषाली … Read more

तू चाल पुढे – भाग २ (अंतिम भाग)

भाग २ – मोहन आणि राधा माहेरी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नव्हती. जिथे आधी राधा च्या नवऱ्याच सगळ्यांना कौतुक होतं तिथे आता त्याच्या नावाने सुद्धा लोक नाक मुरडत. राधा इतक्या दिवसात फक्त एकदाच तिच्या माहेरी गेली होती पण तिथे सगळ्यांनीच तिला वाईट वागणूक दिली. आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला दिल्या घरी सुखी राहा असाच सल्ला … Read more

तू चाल पुढे – भाग १

( सत्यघटनेपासून प्रेरित ) मोहन सोबत राधाचं लग्न झालं अन् ती गावातून शहरात राहायला आली. आधी फक्त कधीतरी ती शहरात यायची. बारावीपर्यंत शिक्षणाची सोय गावातच होती. म्हणून शहराशी संबंध हा फक्त कामापुरताच होता. पण राधाला शहराच आधीपासूनच खूप आकर्षण होतं. मोहनच चहाचं दुकान होतं. बऱ्यापैकी चालायचं. म्हणजे तसं चालायला तर चांगलंच चालायचं. पण मोहनच लक्ष … Read more

आनंदी आनंद गडे – भाग २ (अंतिम भाग)

वेगळे राहणार याचा समिधाला खूप आनंद झाला. तिला वाटले की तिच्या मागणीपुढे सुबोध झुकला. आणि यामुळेच तिचा अहंकार खूप सुखावला. पण त्याला वेगळे राहायला नीलीमाताईंनी तयार केले असेल हे तिच्या ध्यानीमनी देखील नव्हते. सुबोध आणि समिधा जवळच दुसरे घर भाड्याने घेऊन वेगळे राहू लागले. इथे सुद्धा सगळी कामे समिधालाच करावी लागत असे. पण आता तिला … Read more

आनंदी आनंद गडे – भाग १

समिधा आणि सुबोधच लग्न होऊन फक्त पाच महिनेच झाले होते. घरातील सगळेच लोक खुप चांगले होते. सासुबाई आणि नणंद कल्याणी तर तिला कुठल्याच कामाला हात लावू द्यायच्या नाहीत. नवीन सुनेचं सगळ्यांनाच खूप कौतुक होतं. सुबोध सोबत बाहेर फिरायला जाणे तर रोजचेच झाले होते. सासूबाईंनी म्हणजेच नीलिमाताईंनी सुद्धा समिधाचे सगळेच लाड पुरवले, मग ते खाण्या पिण्याच्या … Read more

जगण्याचा अधिकार तिलाही आहे.

आपल्या मुलाला ट्युशनला सोडायला गेलेली वसुधा घरी परतत होती. कॉलनीमधील पार्कमध्ये बसून बायका गोष्टी करत होत्या.  वसुधाला सुद्धा त्यांनी हाक मारली. तशी वसुधा त्यांच्याजवळ गेली. तिला पाहून वंदना काकू म्हणाल्या. ” अग वसुधा.. आम्ही सगळ्या जणी विचार करतोय की एकदा रोहिणीला भेटून येऊ म्हणून…” ” बिचारी कशी जगत असेल काय माहिती…अजुन दुःखातून सावरली सुद्धा नसेल…” … Read more