वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग १

   ” ह्या मुलाशी राधाचं लग्न झालं तर ती आयुष्यभर सुखात नांदेल…आयुष्यभर शोधत बसाल तरीही इतकं चांगलं स्थळ मिळणार नाही पोरीला…” गोदाक्का राधाच्या वडिलांना सांगत होत्या.      ” पण त्या पोराचं हे दुसरं लग्न आहे…अन् तो वयाने पण मोठा आहे राधापेक्षा…राधा नुकतीच एकोणविस वर्षांची झालीय…मला वाटतं इतक्यात तिचं लग्न केलं तर घाई होणार ना ती…” … Read more

सूर तेच छेडीता..!

   वृंदा हातात भलीमोठी बॅग घेऊन घराबाहेर निघत होती. तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने विनयकडे पाहिले. तो मात्र तिच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. कारण तिच्या नजरेत त्याच्यासाठी असंख्य प्रश्न होते. आणि विनयकडे तिच्या प्रश्नांना ना उत्तरे होती ना तिच्यासाठी दोन धीराचे शब्द.    आज पहिल्यांदा असे झाले … Read more

तूच आहेस तुझी खरी सोबती

सुजयला जाऊन पंधरा दिवस झाले होते. सुरेखा अजूनही सावरली नव्हती. सुजय आता या जगात नाही हे अजूनही तिने स्वीकारलं नव्हतं. तिची नऊ वर्षांची मुलगी स्वरा देखील या सर्वांमुळे खूप कावरीबावरी झालेली होती. आधी वडिलांचे या जगातून जाणे आणि आईची अवस्था सुद्धा खूप बिकट होती. घरी आलेले पाहुणे निघून जात होते. तिने तिच्या दादा आणि वहिनीला … Read more

खरंच प्रेम आंधळं असावं का ?

अंजु सतरा वर्षांची एक चुणचुणीत मुलगी. नुकतीच वयात आलेली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपल्या आईवडिलांसह आनंदाने राहत होती. घरात आईवडील, एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. छोटे पण सुखी कुटुंब. घरात सुख नांदत होते. पण त्यांच्या या सुखी कुटुंबाला कुणाची तरी नजर लागणार होती. भविष्यात त्यांच्यापुढे काहीतरी अनपेक्षित घडणार होते. आणि ह्याला कारण ठरली अंजु. … Read more

खरी संपत्ती

  सदा स्वतःशीच बडबड करायचा. मिळेल ते काम करायचा. मिळेल ते खायचा. कसली तक्रार नाही की कसला त्रास नाही. मध्येच देवाचं नाव घ्यायचा. पाहणाऱ्याला एखाद्या अवलिया सारखा वाटायचा तो. पण तो एक सांसारिक व्यक्ती होता. चारचौघां सारखा त्याचा देखील संसार होता. बायको अन् दोन मुलं.   घरची परिस्थिती फारशी वाईट नव्हती. घरी बऱ्यापैकी जमीन होती. … Read more

लेकी बोले सुने लागे

” प्रिया…हे काय घातलस तू… अगं नवीन लग्न झालंय ना तुझं…आजूबाजूचे लोक पाहतील तर काय म्हणतील…आणि तसंही आपल्या घरी नाही चालत असा पंजाबी ड्रेस घातलेला…तू घरी साडीच घालत जा… तसंही साडी खूप शोभते हो तुला…” शोभाताई आपल्या सूनबाई ला म्हणाल्या. तसा प्रियाचा चेहरा उतरला. दीड महिन्यांपूर्वी शोभाताईंच्या घरी सून म्हणून आलेली प्रिया आजवर साडीतच वावरत … Read more

शालू – एक अविस्मणीय भेट

“अरे सुयश…अजुन तयार सुद्धा झाला नाहीस…खरेदीला जायला उशीर होतोय आपल्याला… मुलीकडच्यांची तयारी सुद्धा झाली असेल…आपण उशिरा जाणे बरे दिसणार नाही…” वृंदा काकू सुयशला आवाज देत म्हणाल्या. ” हो आई…मी तयारच होत आहे…दहा मिनिटात आवरून खाली येईल…” सुयश म्हणाला. इतक्यात त्यांची मोठी सून पल्लवी आवरून हॉल मध्ये आली आणि म्हणाली… ” आई…तसा आपल्याला फारसा उशीर झालेला … Read more

सासूबाईंचा बदललेला स्वभाव

  ” आई…डॉक्टरांनी मेघाला आराम घ्यायला सांगितला आहे…डॉक्टर म्हणाल्या की जास्त हालचाल करणे सध्या मेघा आणि बाळासाठी चांगले नाही…” मिलिंद आईला समजावत म्हणाला.   ” अरे डॉक्टर असेच सांगतात…आराम करायला सांगतात आणि मग नॉर्मल डिलीव्हरी होत नाही…तसेही आजकाल सगळ्या गोष्टींसाठी यंत्र वापरतात…आम्ही तर गावी असायचो तेव्हा आम्हाला सडा, सारवण करायला लागायचे…बाहेरून पाणी आणावे लागत होते…पण … Read more

प्रेम व्यक्त करणं सुद्धा गरजेचं असतं.

नचिकेतला सकाळी उठायला जरा उशीरच झाला. आज त्याचा वाढदिवस होता आणि रात्री येणाऱ्या शुभेच्छांच्या मेसेजेस ला रिप्लाय दिल्याने त्याला झोपेतून उठायला उशीर झाला होता. नंदिनी रोजप्रमाणे पहाटेच उठून तिच्या नेहमीच्या कामामध्ये व्यस्त होती.    नचिकेत पटापट फ्रेश होऊन किचन मध्ये आला. आणि नंदिनीला म्हणाला…   ” गुड मॉर्निंग…”   ” गुड मॉर्निंग…आज काय चक्क सकाळी … Read more

सावळा गं रंग तुझा

” पण बाबा… मला चांगली शिकलेली मुलगी हवीय…नोकरी करणारी नसेल तर निदान चारचौघात आत्मविश्वासाने वावरणारी हवी…शहरात वाढलेली आणि चांगलं राहणीमान असणारी मुलगी हवीय…आणि मला तुम्ही त्या गावात राहणाऱ्या बारावी पास मुलीबरोबर लग्न करायला सांगताय…काय म्हणे तर मुलगी खेळामध्ये करियर करणार आहे…इतकं सोप्पं असतं का ते…प्रत्येकाला नाही जमत…” निषाद काहीसा चिडून म्हणाला. ” आम्ही त्या मुलीला … Read more