माझी बायको नोकर नाही.

गिरिजा काकूंच्या दोन्ही मुलांची मल्हार आणि केदार ची लग्न एकाच दिवशी ठरवली होती. घरी पाहुण्यांचे आगमन झालेले होते. गिरिजा काकू स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होत्या. दोन्ही सुनांना द्यायचे कपडे, दागिने त्यांनी स्वतः पसंत केले होते. पण त्यांनी मुद्दामहून त्यांच्या मोठ्या सुनेसाठी हलक्या प्रतीच्या गोष्टी घेतल्या होत्या. त्यामानाने लहान सूनेसाठी सगळ्या महाग गोष्टी … Read more

सांग कधी कळणार तुला भाग -४ (अंतिम भाग)

पाहुणे निघून गेल्यावर जेव्हा सासुबाई किचन मध्ये आल्या तेव्हा प्रियाने विचारलेच.. ” आई…तुम्हाला माझे नोकरी करणे आवडत नाही का..?” ” आता माझी आवड असो वा नसो…त्याने काही फरक पडणार आहे का…?” सासुबाई म्हणाल्या. ” पण आई…मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना…आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी ह्यासाठी मी पण मोहित च्या बरोबरीने काम करते…घरची कामे … Read more

सांग कधी कळणार तुला भाग ३

सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर प्रिया स्वयंपाक खोली आवरून बेडरूम मध्ये गेली तेव्हा मोहित जागाच होता. प्रिया ला बघून तो म्हणाला. ” आज तुझा पगार झाला असेल ना…?” ” हो.” ” पैशाचं काय केलंस…?” ” माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये आहेत…” ” मग ते माझ्या अकाउंट वर ट्रान्स्फर कर.. मला आपल्यासाठी नवीन कार घ्यायची आहे…काही माझ्याकडे आहेत…आणखी काही … Read more

सांग कधी कळणार तुला भाग २

आज ऑफीस मधल्या मैत्रिणींनी प्रियाला लग्नाची पार्टी मागितली होती. म्हणून तिने ऑफिस सुटल्यावर सगळ्या मैत्रिणींना पाव भाजी ची पार्टी दिली. ह्या सर्वात आजही तिला घरी यायला अर्धा तास उशीर झाला. आज सासू तर रागात होतीच पण मोहित सुद्धा आज लवकर घरी आला होता. ” आज तुला घरी यायला पुन्हा उशीर झाला…” मोहित म्हणाला. ” ते … Read more

सांग कधी कळणार तुला भाग -१

सहा महिन्यांपूर्वीच नोकरीवर लागलेल्या प्रियासाठी आता स्थळं पाहायला सुरुवात झाली होती. प्रियाला मात्र इतक्यात लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण तिच्या आई बाबांना मात्र तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. म्हणून त्यांनी तिला कसेबसे तयार केले. प्रियाला सुद्धा आईवडिलांची काळजी कळत होती. आणि आई बाबा जे काही करत आहेत ते तिच्या भल्यासाठीच हे सुद्धा ती जाणून … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ९ ( अंतिम भाग )

पल्लवी चे बोलणे ऐकुन नणंद ने शरमेने मान खाली घातली. पल्लवी काहीच चुकीचं बोलली नव्हती. तिच्या नणंद जवळ बोलायला एक शब्द सुद्धा नव्हता. तिची सासू मात्र पंकजच्या मुलाच्या उल्लेखाने क्षणभर विचारात हरवली. आणि पल्लवीला म्हणाली. ” तू बघितलंस माझ्या पंकजच्या मुलाला…?” ” हो…एकदा नाही तर खूपदा…” पल्लवी म्हणाली. ” कसा दिसतो तो…” सासूबाईंनी विचारले. ” … Read more

एकाच ह्या जन्मी जणू भाग – ७

  ” हो…कारण मी तुझ्यापेक्षा चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले आहेत…तुला मागच्या काही दिवसात खूप दुःखांचा सामना करावा लागला हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार…पण आयुष्यात आपल्याला जराही सुख मिळत असेल तर ते ओंजळीत भरून घ्यावं…भूतकाळ कुरवाळत बसल्यापेक्षा तुझा भविष्यकाळ कसा सुखी होईल याकडे लक्ष द्यायला हवं…” आई म्हणाली. ” जे काही मी भोगलय त्यासाठी … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ६

” तुम्ही…तुम्ही इथे कशाला आलात…?” प्रीतीने विचारले. ” तुला आणि आपल्या मुलाला सोबत घेऊन जायला…” पंकज म्हणाला. ” तुम्हाला काय वाटतं…तुम्ही काहीही बोलाल आणि की तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या बरोबर येईल…?” प्रीतीने विचारले. ” मला माहिती आहे…मी तुझ्याशी ज्याप्रकारे वागलो ते पाहता ती माझ्याशी असेच वागणे अपेक्षित आहे…पण मला खरंच माझ्या चुकांची जाणीव झाली आहे…तू … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ४

आज जे झालं त्यामुळे प्रीती विचलित झाली होती. पंकज असे काही वागेल हे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. आधी त्याने तिची मागितलेली माफी आणि मग त्याची खराब तब्येत. आताच तर प्रीती थोडीफार सावरली होती पण तिचं आयुष्य एकाच दिवसात यु टर्न घ्यायला बघत होतं.   तसा पंकजच्या डोळ्यात पश्चात्ताप तिलाही दिसला होता. पण त्याच्यामुळे तिने जे … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ३

प्रीती फक्त बारावी पर्यंत शिकलेली होती आणि तिला घरकामा व्यतिरिक्त काही विशेष काम येत नव्हते. पण तिने आधी घरच्या शेतीत काम केले असल्याने तिला शेतीतील कामांची सवय होती. तिने शेतात मजुरीला जायचे ठरवले. लाडाकोडात वाढवलेली मुलगी तिच्या दोन वर्षाच्या बाळाला घरी ठेवून मजुरीला जाईल हे ऐकुन तिच्या आईचे काळीज तीळ तीळ तुटत होते. तिच्या आईने … Read more