तिने आई मानलं पण तू सासुच राहिलीस…- भाग १

आज बाहेर घरातील सामानाच्या खरेदीसाठी गेलेली पल्लवी अगदी उत्साहात घरी आली होती. घरी आल्या आल्या तिने हातपाय धुतले आणि सरळ तिच्या पर्स मधील दागिना काढून देवासमोर ठेवला. आणि देवाला मनोभावे नमस्कार केला. त्यानंतर तिच्या सासूबाईंना नवीन दागिना दाखवायला घेऊन गेली. सासूबाईंच्या रूममध्ये जाऊन ती आनंदाने म्हणाली. ” आई…हे बघा…मला आज ह्यांनी हे मंगळसूत्र घेऊन दिलंय…सुंदर … Read more

दोघी – भाग २ (अंतिम भाग)

” अग ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी काय असेल…मी तर केव्हाचा तुला म्हणतोय चल म्हणून…पण तूच आपली पुढे ढकलत होतीस…अंतरा घरात नवीन आहे… तिला एकदा घरात रुळली की मग येईन म्हणत होतीस…पण आता एकदाचं तू ठरवलं आहेस ना…मग उशीर नको करायला…तू आजपासूनच तयारी कर…आपण सोमवारी सकाळी निघू घरून…” विराजस आनंदाने म्हणाला. भावना ला सुद्धा आनंद झाला.तिला … Read more

दोघी – भाग १

” वहिनी…मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे ऑफिस ला…माझा टिफीन उद्या लवकर तयार करून देशील…” मल्हार त्याच्या रूम मध्ये जाताना म्हणाला. ” हो भाऊजी…मी करेन लवकर तयार…तुम्ही काळजी करू नका…” भावना म्हणाली. मल्हार त्याच्या रूम मध्ये निघून गेल्यावर त्याची बायको अंतरा भावनाला म्हणाली… ” तू राहू दे ताई…उद्या सकाळी मीच ह्यांच्यासाठी टिफीन तयार करेन…” ” … Read more

पंढरीची वारी

नाम्या वारीला जायची तयारी करीत होता. तो अन् त्याची बायको दोघेही यंदा जोडीने वारीला जाणार होते. नाम्याची ही तिसरी वारी होती. अन् त्याच्या बायकोची म्हणजेच लक्ष्मीची ही पहिलीच वारी. नाम्या अन् लक्ष्मीचं यंदाच लग्न झालं होत. नाम्या च खरं नाव नामदेव. सखू अन् गणपत चा एकुलता एक मुलगा. त्याला सर्वजण प्रेमाने नाम्याच म्हणत. त्याच खर … Read more

लेक माहेराच सोनं – भाग १

” वसुधा…झाली का सगळी तयारी…पाहुणे यायची वेळ झाली असेल…” वसंतरावांनी हॉलमधून त्यांच्या पत्नीला आवाज दिला. ” हो…जवळपास सगळच झालंय…विविधा पण तयार आहे…” वसुधाताई म्हणाल्या. ” चला…सगळं काही व्यवस्थित पार पडलं म्हणजे झालं…तसा राजेश सांगत होता की मुलाकडचे खूप चांगले आहेत…मुलगा सुद्धा चांगल्या नोकरीला आहे…” वसंतराव कौतुकाने सांगत होते. वसंतरावांच्या मित्राने त्यांच्या मुलीसाठी त्यांना हे स्थळ … Read more

फिरून नवी जन्मेन मी – भाग ३ (अंतिम भाग)

आणि स्वाती पुढचे पंधरा वीस मिनिटे नुसते बोलत होती. अंकिता किती वाईट वागली आहे आणि तिने यापुढे कसे वागावे ह्याचे नुसते उपदेश देत होती. अंकिता मात्र तिच्याशी एक शब्द देखील बोलली नव्हती. आजवर ज्या बहिणीने तिला जे मागितलं ते दिलं तिच्याबद्दल काहीबाही बोलताना स्वातीला जराही वाईट वाटत नाही ह्याच अंकिता ला नवल वाटत होतं. पण … Read more

फिरून नवी जन्मेन मी – भाग २

ती दिवसभर घरकामाला हात लावायची नाही. भांडी घासायला तर बाई यायचीच पण स्वयंपाक, नाश्ता आणि साफसफाई अंकितालाच करावी लागायची. म्हणजे ती स्वतःहून ही सर्व कामे करायची. सुजाताला कधीच तिला कामात मदत करावी वाटली नाही. अंकिता सकाळी लवकर घरातील कामे करायची आणि ऑफिसला जायची. तिकडून आल्यावर पुन्हा रात्रीचा स्वयंपाक आणि सगळी आवराआवर करायची. तिचं आयुष्य असच … Read more

फिरून नवी जन्मेन मी – भाग १

  अंकिता विचार करत होती इतक्यात तिच्या गाडीचा एका बाईक ला धक्का लागला आणि ती भानावर आली. तिने लगेच तिची गाडी रस्त्याच्या एका कडेला उभी केली आणि त्या बाईक स्वाराला काही लागले तर नाही ना ह्याची चौकशी करायला पुढे सरसावली. ” खूप खूप सॉरी…तुम्हाला लागलं तर नाही ना…मला कळलंच नाही कसा तुम्हाला धक्का लागला ते…मी … Read more

तिच्या साधेपणातील सौंदर्य – भाग १

मधुराचे आई बाबा घरी आले तशी ती आनंदाने त्यांच्यासमोर गेली आणि तिने विचारले. ” आई…मला दाखव ना…माझ्यासाठी कुठला ड्रेस आणला आहेस तू…काव्याताईच्या लग्नात घालायला…?” तसा आईने तिच्यासाठी आणलेला ड्रेसचा कापड तिच्या हातात दिला. ड्रेसचा कापड पाहून मधुराने नाक मुरडले… ” काय आई…किती साधा ड्रेस आहे हा…आणि आजकाल असा पंजाबी ड्रेस घालून कोण जातं लग्नात… काव्या … Read more

अधिकार भाग २ (अंतिम भाग)

” बाबा…माझ्या मनात आहे की आपण आपल्या ह्या वाड्याचे रिनोवेशन करावे…” अनघाचे बोलणे ऐकून विनायक रावांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांना खूप आनंद झाला. वाड्याची डागडुजी करावी हा विचार अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात रेंगाळत होता. पण नवी पिढी ह्यात काही लक्ष घालत नसल्याने त्यांनी सुद्धा हा विचार मनातल्या मनातच ठेवला होता. ” हो बाबा…अनघा … Read more