पारख – भाग २(अंतिम भाग)

” सगळं काही निभावून गेलं ह्यातच सगळं काही आलं…तसे माझ्याकडे जास्त पैसे जमा नव्हते पण वेळेवर सोय झाली पैशांची…” संजय म्हणाला. ” कशी काय…?” सुगंधा ने विचारले. ” अगं जवळचं सोनं गहाण ठेवलं आणि बाकीच्या पैशांची सोय केली…आता जसे पैसे येतील तसे सोडवून आणेल…” संजय म्हणाला. सोनं गहाण ठेवलं हे ऐकून दोन्ही मायलेकी एकदमच उडाल्या. … Read more

फसवणूक – भाग १

माहेरी लाडाकोडात वाढलेली. चांगली शिकलेली आणि घरकामात निपुण. एका खाजगी ऑफिस मध्येच काम करायची पण कामात चोख होती. मित्र मैत्रिणीं मध्ये रमणारी. चंचल, अवखळ, बोलकी मधुरा आज लग्न होऊन सासरी पहिले पाऊल ठेवत होती. सासरी आल्यावर सुद्धा तिचे खूप कौतुक झाले. तिचं सासर तिच्या माहेरा पासून जरा लांब असलं तरी मागच्या चार महिन्यांपासून ती महेश … Read more

तिने आई मानलं पण तू सासुच राहिलीस…- भाग १

आज बाहेर घरातील सामानाच्या खरेदीसाठी गेलेली पल्लवी अगदी उत्साहात घरी आली होती. घरी आल्या आल्या तिने हातपाय धुतले आणि सरळ तिच्या पर्स मधील दागिना काढून देवासमोर ठेवला. आणि देवाला मनोभावे नमस्कार केला. त्यानंतर तिच्या सासूबाईंना नवीन दागिना दाखवायला घेऊन गेली. सासूबाईंच्या रूममध्ये जाऊन ती आनंदाने म्हणाली. ” आई…हे बघा…मला आज ह्यांनी हे मंगळसूत्र घेऊन दिलंय…सुंदर … Read more

तिच्या साधेपणातील सौंदर्य – भाग २ (अंतिम भाग)

सर्वजण गप्पा मारत असताना मधुरा मात्र किचन मध्ये सर्वांसाठी गरमागरम पोळ्या करत होती. सतरा वर्षांची अल्लड मधुरा आज एखाद्या मुरलेल्या गृहिणी सारखी धावपळ करून कामे करत होती. सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केल्यावर मधुराने सर्वांना जेवण वाढले. सर्वांनी जेवणाची स्तुती केल्यावर आत्या म्हणाली… ” आज काव्या ने सकाळपासून खूप मदत केली हो मला स्वयंपाकात…तुम्ही येणार म्हणून … Read more

स्वीकार – भाग २ (अंतिम भाग)

ती पाणी घेऊन बाहेर आली. सर्वजण पाणी पिले. पण बोलायला कोणीच सुरुवात करत नव्हतं. म्हणून शेवटी जान्हवीनेच विषय काढला… ” तुम्ही इथे कसे काय येणे केले…?” ” बरं झालं तूच विचारलस…कारण नेमका विषय कुठून काढावा हे मला कळत नव्हतं…आम्ही आरुष बद्दल बोलायला आलो आहोत…” तिच्या सासुबाई म्हणाल्या. ” त्याचे नाव आरुष नाही आयुष आहे …आणि … Read more

स्वीकार

आज रविवार असल्याने जान्हवी जरा आरामात झोपेतून उठली. तिचा चार वर्षांचा मुलगा अजूनही झोपेतच होता. ती फ्रेश झाली आणि तिने स्वतःसाठी चहा केला. चहाचा कप घेऊन ती तिच्या बेडरूम मधल्या बाल्कनीत आली आणि आरामात बसून चहा प्यायला लागली.   रविवारी निवांत बाल्कनी मध्ये बसून चहा पिणे आणि आदेशच्या आठवणींमध्ये हरवून जाणे हा तिचा आवडता छंद. … Read more

मला आई हवी – भाग २ (अंतिम भाग )

आपल्याच जगात रमणाऱ्या राजेश आणि राजश्री ला राजेशची आई आता भार वाटायला लागली होती. आणि राजेशच्या आईची मात्र एकाकीपणा मुळे तब्येत खालावत जात होती. आजारी आईची सेवा करणे दोघांनाही जमत नव्हते. त्यांनी चोवीस तास एका नर्सला त्यांची काळजी घेण्यासाठी नेमले होते. पण राजेशच्या आईला सतत राजेशची आठवण यायची आणि नर्स वारंवार राजेशला कॉल करायची की … Read more

मला आई हवी – भाग १

” अहो…बाहेर कुणीतरी आलंय तुम्हाला भेटायला…” बायकोने राजेशला आवाज दिला. मोबाईल मध्ये मघापासून डोकं खुपसून बसलेला राजेश थोड्या त्रासिक आवाजात म्हणाला. ” त्यांना दोन मिनिटे बाहेर थांबायला सांग…मी आलोच…” एवढे बोलून राजेश पुन्हा मोबाईल मध्ये डोकावला. पाच मिनिटे झाल्यावर पुन्हा राजश्रीने त्याला आवाज दिला. आता मात्र त्याने मोबाईल बाजूला ठेवला. रविवारी सुद्धा स्वस्थ बसू देत … Read more

वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग २

दिवसामागून दिवस जात होते. पण राजेशच्या तब्येतीत काही विशेष सुधारणा दिसत नव्हती. राधाचे देवाला साकडे घाल नेणे सुरूच होते. दोन महिने निघून गेले पण राधाला मात्र हे दोन महिने खूप कठीण गेले. या दोन महिन्यात तिच्या मनाची नुसती घालमेल होत होती. तिला सारखी राजेशला भेटायची इच्छा व्हायची पण कुणी तिचे काही ऐकायला तयार नव्हते. घरची … Read more

तूच आहेस तुझी खरी सोबती

सुजयला जाऊन पंधरा दिवस झाले होते. सुरेखा अजूनही सावरली नव्हती. सुजय आता या जगात नाही हे अजूनही तिने स्वीकारलं नव्हतं. तिची नऊ वर्षांची मुलगी स्वरा देखील या सर्वांमुळे खूप कावरीबावरी झालेली होती. आधी वडिलांचे या जगातून जाणे आणि आईची अवस्था सुद्धा खूप बिकट होती. घरी आलेले पाहुणे निघून जात होते. तिने तिच्या दादा आणि वहिनीला … Read more