बापमाणूस

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच तो इकडून तिकडे चकरा मारत होता. इतक्यात नर्स बाहेर आली आणि त्याला आनंदाची बातमी देत म्हणाली.   ” अभिनंदन…तुम्हाला मुलगी झाली आहे…”   हे ऐकून हरी आनंदाने वेडा झाला होता. “पारू, बघ ना…आपल्या घरी लक्ष्मी … Read more

माझिया माहेरा

वैशाली बस मधून उतरली आणि तिच्या मुलाला सार्थकला कडेवर घेऊन खाली मानेने एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होते की दरवेळी प्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली आहे तिला. जुनाट साडी, हाती सामानाची लहानशी बॅग, अंगभर … Read more

समाधानातील सुख

सुहास बऱ्याच दिवसांनी आज त्याच्या गावातील घरी आला होता. तीन खोल्यांचे लहानसे घर होते. सरळ रांगेत तीन खोल्या आणि मागे न्हाणी. कौलारू पण मजबूत. अजूनही चांगल्या स्थितीत होतं. फक्त थोडी साफसफाई आणि रंग दिला की झालं. त्याने घर नीट पाहून घेतले आणि घराबाहेर निघून मनातल्या मनात कसलातरी हिशेब करत होता. इतक्यातच त्याच्या घराच्या बाजूला एका … Read more

तिने आई मानलं पण तू सासूच राहिलीस – भाग २ (अंतिम भाग)

आईचे बोलणे ऐकून पराग ला जरा आश्चर्यच वाटले. कारण आईला ह्याचे सुद्धा वाईट वाटू शकते ह्याचा विचार त्याने केलाच नव्हता. परागला वाटले की आपण पल्लवी साठी नवीन मंगळसूत्र केल्याचा आईला आनंदच होईल. ” मी तिच्यासाठी नवीन मंगळसूत्र घेणार हे तिलाही माहिती नव्हतं आई…मला तुला सरप्राइज द्यायचं म्हणून मी ऐन वेळेला दुकानात गेल्यावर सांगितले तिला…” पराग … Read more

तिने आई मानलं पण तू सासुच राहिलीस…- भाग १

आज बाहेर घरातील सामानाच्या खरेदीसाठी गेलेली पल्लवी अगदी उत्साहात घरी आली होती. घरी आल्या आल्या तिने हातपाय धुतले आणि सरळ तिच्या पर्स मधील दागिना काढून देवासमोर ठेवला. आणि देवाला मनोभावे नमस्कार केला. त्यानंतर तिच्या सासूबाईंना नवीन दागिना दाखवायला घेऊन गेली. सासूबाईंच्या रूममध्ये जाऊन ती आनंदाने म्हणाली. ” आई…हे बघा…मला आज ह्यांनी हे मंगळसूत्र घेऊन दिलंय…सुंदर … Read more