जिवलगा – भाग ८

केशवरावांना गाडीबाहेर उतरताना पाहून सुलू ताई त्यांना म्हणाल्या. ” काय झालं हो तिकडे…धीरज आला का…?” केशवराव काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या पुन्हा म्हणाल्या. ” अहो सांगा ना तिकडे काय परिस्थिती आहे ते… राधाच्या काळजीने मला राहवत नाहीये इकडे…सोन्यासारखी पोर बिचारी आणि इतक्या लहान वयात काय काय सहन करावं लागत आहे तिला…आणि माझ्या भावावर सध्या … Read more

जिवलगा – भाग ७

सागरच्या स्थळाबद्दल ऐकून राधाची आई म्हणाली. ” नाही जाऊबाई…मला हे स्थळ माझ्या राधा साठी अजिबात मान्य नाही…त्यापेक्षा मी राधाला घरीच बसवून ठेवेल…” राधाच्या आईचे बोलणे ऐकून राधाच्या काकूला राग आला. त्या राधाच्या आईला म्हणाल्या. ” मान्य नाही म्हणजे काय…? इतकं सगळं झाल्यावर निदान मी एक मुलगा सुचवला हे कमी आहे का…? आता कोण होईल राधाशी … Read more

जिवलगा – भाग ६

राघवला पाहून राधाची आई पुढे आली आणि त्याला म्हणाली. ” राघव…तू यावेळेला इथे…आणि अशा अवतारात काय करत आहेस…तू तर वराती सोबत यायला पाहिजे होतं ना…लग्नाला वेळच काय उरलाय…” राघव काहीच बोलला नाही. नेमकं काय बोलावं आणि कसं बोलावं हे त्यालाही कळत नव्हतं. तो फक्त राधाच्या वडिलांकडे पाहत होता. त्याला पाहून राधा ची आई पुन्हा म्हणाली. … Read more

जिवलगा – भाग ५

राधाने बराच वेळ ती साडी घेऊन आरशात स्वतःला न्याहाळले. मोरपंखी रंग हा तिचा आवडीचा रंग होता. साखरपुड्यात नाहीतर पुन्हा कधीतरी ती साडी घालता येईलच ह्या विचाराने ती खुश झाली. तिने साडीला नीट कपाटात ठेवले. इकडे शनायाला धीरजच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते. आधी दिवसभर सोबत राहायचा तरीही संध्याकाळी घरी गेल्यापासून ते सकाळी पुन्हा ऑफिसला येईपर्यंत नुसते … Read more

जिवलगा – भाग ४

धीरजने राधाला घरी सोडले. त्या दिवशी राधाच्या घरच्यांनी राघव आणि धीरजला जेवल्याशिवाय सोडले नाही. राधाच्या घरच्यांचा आग्रह या दोघांकडून ही मोडवला नाही. दोघांनाही त्या दिवशी घरी निघायला रात्रच झाली होती. तसे पाहता दोघांचे गावही काही फार दूर नव्हते. दोघेही घरी जायला निघाले. घरी जायला निघाल्यावर राघवने धीरजला विचारले. ” काय झालं धीरज…मघाशी कुणाचा फोन आला … Read more

जिवलगा – भाग ३

” तुला माहिती नाही आहे पण मी ज्या कोणत्या कॉलेज ला जायचो तिथे मुली नुसत्या माझ्या मागे पुढे फिरायच्या. पण मी कधीच कुणाला भाव दिला नाही…मी ठरवलं होतं की जिच्याशी माझं लग्न होईल मी फक्त तिच्यावरच प्रेम करेल…आणि ती नशीबवान मुलगी तू आहेस… आय नो तुला असे वाटत असेल की मी तुलाच का पसंत केले…पण … Read more

जिवलगा – भाग २

धीरजच्या घरची मंडळी पोहचायची वेळ झाली होती. राधाच्या घरी सगळ्यांना वाटत होते की आपण आग्रहाने बोलावलंय म्हटल्यावर सुलूताई पाहुण्यांबरोबर नक्कीच येतील. इकडे सूलू ताईंच्या मिस्टरांनी म्हणजेच केशवरावांनी घरामध्ये येत सुलू ताईंना आवाज दिला. त्या समोर येताच ते म्हणाले. ” काय हे माधवच्या आई…तुम्ही अजूनही तयार झालेल्या नाही…अहो पाहुणे निघायची वेळ झालीय आता…” ” तुम्हीच जा … Read more

जिवलगा – भाग १

   राधा पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. घरच्यांनी तिच्या लग्नाचं मनावर घेतलं होतं.  सख्ख्या चुलत मिळून राधाच्या एकूण तीन बहिणी आणि दोन भाऊ होते. दोन बहिणींची लग्न आधीच उरकलेली. तिसरा नंबर राधाचा होता.     इतक्यात लग्न उरकायची तिची इच्छा नव्हती पण तिच्या काकांची मुलगी जीचा लग्नासाठी चौथा नंबर लागणार होता काकांनी तिच्यासाठी मुलगा बघून ठेवला … Read more

वर्चस्व – भाग १६ (अंतिम भाग)

बराच वेळ झाला तरीही सुमेधा काही घरी आलीच नाही. निशांत मात्र आता तिला भेटायला, तिची माफी मागायला उतावीळ झाला होता. त्याने आईला विचारले. ” आई…कधी येईल ग ही…?” ” अरे येईल ना…नाहीतर तू तिला फोन लावून स्वतःच विचारून घे ना…?” ” ठीक आहे…” असे म्हणून निशांत ने तिला फोन लावला. पण ती फोन सुद्धा उचलत … Read more

वर्चस्व – भाग १५

मनीषाचे कॉल पाहून निशांतला कल्पना आली होती की सुमेधा तिथेही नसेल. तरीही त्याने एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सुमेधा च्या फोन वरून मनिषाला कॉल केला. दुसरीकडून मनीषा म्हणाली. ” हॅलो…सुमेधा ताई…अहो काल परत जाताना आईंनी तुमच्यासाठी दिलेला लाडवांचा डबा घरीच विसरून आल्यात की तुम्ही…” निशांत ला काय बोलू आणि काय नको ते कळत नव्हते. तो … Read more